शहरं
Join us  
Trending Stories
1
'वीर सावरकर पुरस्कार' नाकारला! काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी HRDS इंडियाचा प्रस्ताव फेटाळला; 'सहमतीशिवाय घोषणा केल्याने' वाद
2
मालवणीतील वादाप्रकरणी मंत्री मंगलप्रभात लोढा आणि आमदार अस्लम शेख यांच्यात शाब्दिक चकमक
3
उगाच नाही पुतिन भारतात आले! रशिया-भारत शस्त्रास्त्र उत्पादक कंपन्यांची मोठी बैठक; कामालाही झाली सुरुवात
4
Kangana Ranaut : "त्या व्यक्तीत काहीच दम नाही..."; जर्मनी दौऱ्यावरून कंगना राणौतने राहुल गांधींना डिवचलं
5
Social Media Ban: आता १६ वर्षांखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी, जगातील ऐतिहासिक निर्णय!
6
कृतिका कामराने कन्फर्म केलं रिलेशनशिप, 'या' प्रसिद्ध क्रिकेट होस्टला डेट करतीये अभिनेत्री
7
"आमचे मंत्री गुगली टाकण्यात मास्टर..."; शिंदेसेनेच्या आमदाराचा घरचा आहेर, विधानसभेत काय घडलं?
8
लवकर श्रीमंत व्हायचंय? मग एसआयपी नाही तर 'स्टेप-अप SIP' करा; बघा ११ कोटींचा फंड कसा जमा होईल
9
सोने व्यापाऱ्याचा डोळा लागला अन्...!  ‘सिद्धेश्वर एक्स्प्रेस’च्या एसी कोचमधून ₹५.५ कोटींचे दागिने चोरीला
10
हायवेवर कारमध्ये रोमान्स करणाऱ्या जोडप्याची CCTV फुटेजमधून बनवली व्हिडीओ क्लिप, त्यानंतर...  
11
२०२६ मध्ये इलॉन मस्क यांच्या कंपनीचा आयपीओ येणार; रेकॉर्ड ब्रेकिंग असणार किंमत
12
‎११ जहाल माओवाद्यांचे शस्त्रांसह आत्मसमर्पण, महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या उपस्थितीत टाकले शस्त्र, ८२ लाखांचे होते इनाम ‎ ‎ ‎
13
पुतीन येऊन जाताच अमेरिकेने भारतावर राग काढला; H-1B व्हिसाच्या मुलाखती थांबविल्या, ८५,००० हून अधिक व्हिसा रद्द
14
Video - अरे बापरे! स्विगी इन्स्टामार्टवरून ऑर्डर केलं सोन्याचं नाणं; पॅकेटमध्ये निघाला १ रुपया
15
Suryakumar Yadav : सूर्यानं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम; असा पराक्रम करून दाखवणारा ठरला जगातील पहिला कर्णधार
16
थायलंड-कंबोडिया संघर्षात डोनाल्ड ट्रम्प यांची उडी, भारत-पाकिस्तानचा उल्लेख; म्हणाले, "आम्ही ताकदीबरोबर..."
17
डिजिटल गोल्डची मागणी ४७% ने कोसळली! सेबीच्या 'या' इशाऱ्याने गुंतवणूकदारांची धाकधूक वाढली
18
गुगलचा 'हा' मेसेज दिसताच समजून जा तुमचं 'Gmail' आलंय धोक्यात! वेळ न घालवता करा 'हे' उपाय
19
२०२५ मध्ये अभिषेक शर्माला सर्वाधिक गुगल सर्च करत राहिले पाकिस्तानी...; आशिया कपमध्ये धुळधाण उडविलेली...
20
"साहेब, मी कचोरी विकून कुटुंबाचं पोट...", १५०० कोटींची फसवणूक करणाऱ्या सोनीची नवी 'चाल'
Daily Top 2Weekly Top 5

वस्त्रोद्योगाला सोलर सिटी बनवणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2024 13:39 IST

घरगुती वीज बिलात लवकरच ३० टक्के कपात केली जाईल

इचलकरंजी : आपले सरकार आल्यावर आम्ही वस्त्रोद्योगाला सोलर सिटी बनवून वीज बिलमुक्त करणार आहे. त्यामुळे वीज बिलाचा प्रश्न संपेल आणि आपल्या उत्पादन खर्चात कपात होईल. त्यातून वस्त्रोद्योगाला उभारी मिळेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. महायुतीमधील भाजपचे उमेदवार राहुल आवाडे यांची ‘विजय निर्धार सभा’ थोरात चौकात झाली. त्यावेळी ते बोलत होते.फडणवीस म्हणाले, शेतकऱ्यांना वीज बिल माफ केले आहे. येणाऱ्या काळात त्यांच्यासाठीही सोलर योजना राबविणार आहे. तसेच घरगुती वीज बिलात लवकरच ३० टक्के कपात केली जाईल. इचलकरंजी शहराला आवश्यक असलेल्या पाणी योजनेत मी स्वत: पुढाकार घेऊन त्यातून योग्य मार्ग काढून शहरवासीयांना आठवड्याचे सातही दिवस २४ तास पाणी देईन. ज्यांनी आपल्याला विरोध केला, ते राम-कृष्ण म्हणत आहेत. त्यातूनच भगव्याची जादू चालू झाल्याचे दिसते. जनतेने खरे साधू कोण आहेत आणि संधीसाधू कोण आहेत, हे ओळखावे. आता आवाडे आणि हाळवणकर एकत्र आले आहेत. म्हणजे मताधिक्याचे रेकॉर्ड ब्रेक होणार, असा विश्वास व्यक्त केला.राहुल आवाडे म्हणाले, वीज सवलतीमुळे ९२ कोटी रुपये आम्हाला दिले. विकासासाठी सव्वाशे कोटी रुपये दिले. आता पुढे सुळकूड योजना आम्हाला पाहिजे. तुम्ही मदत करून त्यात पुढाकार घेतला पाहिजे.आमदार प्रकाश आवाडे म्हणाले, यंत्रमागासाठी मी जी योजना आणली त्याचा लाभ विरोध करणाऱ्या लोकांनीही घेतला. आता विरोधक फक्त माझ्या कुटुंबाला शिव्या देत आहेत. आम्हालाही गंमतशीर बोलता येते; पण आम्ही मर्यादा पाळतोय. शिव्या घालून विकास होत नाही.सुरेश हाळवणकर, अनिल डाळ्या, मिश्रीलाल जाजू, बाळ महाराज, अशोक स्वामी यांची भाषणे झाली. यावेळी प्रकाश दत्तवाडे, रवींद्र माने, अमृत भोसले, स्वप्निल आवाडे, सावकार मादनाईक, आदी उपस्थित होते.

मराठा समाजाचा पाठिंबाशहरातील मराठा समाजाने राहुल आवाडे यांना पाठिंबा दिला. त्यासंदर्भातील पत्रही त्यांनी फडणवीस यांना दिले. याचा राहुल यांनी आपल्या भाषणात उल्लेख केला.लाव रे तो व्हिडीओफडणवीस यांचे भाषण सुरू असताना त्यांनी आपले भाषण मध्येच थांबवून सज्जाद नोमानी यांचा व्हिडीओ लावण्याचे आवाहन केले. तो व्हिडीओ संपल्यानंतर या समाजाने महाविकास आघाडीला १७ मागण्यांचे पत्र दिले. त्याला त्यांनी मान्यता दिली, याचा उल्लेख करत चांगलाच समाचार घेतला. तसेच यांना रोखण्यासाठी मताचे धर्मयुद्ध करावे लागेल; अन्यथा पुढील पिढी माफ करणार नाही, असे सांगितले.मतांचा पाऊसआम्हाला काही लोक सांगतात, पावसात भिजलो की, आता निवडून येणार. मी त्यांना सांगतो की, निवडून येण्याकरिता मतांचा पाऊस लागतो. येथे कुठल्याही बाजूला माझी नजर गेली तर मला लोकच लोक दिसत आहेत. सर्वांत जास्त लाडक्या बहिणी दिसत आहेत. या मतांचा पाऊस पडणार.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ichalkaranji-acइचलकरंजीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024