शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण, भयंकर, भयावह! रशियाचा युक्रेनवर मोठा ड्रोन अटॅक; ४ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी
2
"साताऱ्यातील आरोपीला गोळ्या घाला"; आरजी कर प्रकरणातील पीडितेच्या वडिलांची मोठी मागणी
3
बाईक घसरली, रायडरचा मृत्यू, बसला आग... एक नव्हे दोन अपघात; कुर्नूलमध्ये नेमकं काय घडलं?
4
निवडणूक झाली की लगेच निकाल, तिन्हींची एकत्र मतमोजणी अशक्य; ईव्हीएम सांभाळून ठेवणे जिकिरीचे
5
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - २६ ऑक्टोबर २०२५; प्रत्येक कामात यश, अचानक धनलाभ होईल
6
"भाजपचे नेते काहीही बोलून जातात", बाहेरच्यांना आवरा, आम्ही शहर सांभाळतो : प्रताप सरनाईक
7
IND W vs BAN W Live Streaming : कुठं आणि कसा पाहाल भारत-बांगलादेश यांच्यातील सामना?
8
कर्जमाफी मागणाऱ्या शेतकऱ्यांना अजित पवारांनी दिला हिशेब, म्हणाले, "जरा सबुरीने घ्या..."
9
'मॅडम फिट प्रमाणपत्र द्या', पोलिसांचा सर्वत्र दबाव, पाच महिने 'ती' मागत होती न्याय; खासदार व पीएचाही उल्लेख
10
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी बलात्काराचा आरोप असलेला PSI गोपाळ बदने अखेर पोलिसांना शरण
11
पुढील आठवडा पुन्हा पावसाचा; कोकण किनारपट्टीसह मराठवाडा, विदर्भाला इशारा
12
'तक्रार केल्याने दिला जास्त त्रास'; महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी पीएसआय बदने, बनकर अटकेत
13
पबमध्ये ओळख, कॉलवरून वाद; तरुणीला नेले फरफटत! बोरिवलीतील पबसमोरील थरारक घटना
14
१० ते १५ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; एसआयआरचा पहिला टप्पा पुढील आठवड्यात सुरू
15
धार्मिक द्वेषाचा अजेंडा राबवण्याचा डाव, सणातही समाजामध्ये द्वेष पसरविण्याचे काम : वर्षा गायकवाड
16
जर शांतता करार झाला नाही तर थेट युद्ध होईल; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांची अफगाणिस्तानला धमकी
17
ज्या सिरपनं घेतला २६ मुलांचा जीव, 'त्या' औषध कंपनीनं भाजपाला दिले ९४५ कोटी?; काँग्रेस नेत्याचा दावा
18
पूर्ववैमनस्यातून कराडच्या नांदलापूर येथे युवकाचा खून; ५ जणांनी केला तलवार, कोयत्याने वार
19
वादग्रस्त प्रतिभा टॉवरच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाचा स्थगितीस नकार, निर्णयाने दिलासा
20
भारतासाठी धोका! 'चिकन नेक'जवळ चीन घुसण्याच्या तयारीत?; बांगलादेशी समर्थक रस्त्यावर उतरले

हुरहुर वाढली, उद्या मतदान; कोल्हापूर जिल्ह्यातील उमेदवारांचे भवितव्य ३३ लाख मतदारांच्या हातात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2024 12:02 IST

सर्वाधिक मतदार दक्षिणमध्ये

कोल्हापूर : प्रत्येकाच्या मनातील हुरहुर शिगेला पोहोचली आहे.. गेल्या महिन्याभरापासून उमेदवार, नेत्यांसह तमाम कोल्हापूरवासीयांसाठी बहुप्रतिक्षित असलेला तो दिवस आता जवळ आला आहे. जिल्ह्याच्या राजकीय भवितव्याला दिशा देणारी जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघांसाठी उद्या, बुधवारी अत्यंत चुरशीने मतदान होत आहे. जिल्ह्यात १२१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून, त्यांचे भवितव्य ३३ लाखांवर मतदारांच्या हाती आहे.

उद्या, बुधवारी सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत ३ हजार ४५२ केंद्रांवर मतदान होईल. शनिवारी (दि.२३) सकाळी आठ वाजता ज्या-त्या तालुक्याच्या ठिकाणी मतमोजणी होणार असून, दुपारी १२ वाजेपर्यंत गुलालाचे मानकरी ठरतील.दर पाच वर्षांनी होणारी विधानसभा निवडणूक यंदा मागील अडीच वर्षांतील सत्तानाट्यामुळे अधिकच अटीतटीची व रंगतदार बनली. गेल्या पंधरा दिवसांत उडालेला प्रचाराचा धुरळा साेमवारी सायंकाळी खाली बसला. निवडणूक विभागाने पारदर्शीपणे निवडणुकीची तयारी केली आहे. जिल्ह्यातील दहाही मतदारसंघांच्या ठिकाणी जिल्हा प्रशासनाच्या स्ट्रॉंगरुममध्ये ईव्हीएम मशीन मतदानासाठी सज्ज आहेत.

  • मतदान : उद्या, बुधवार २० नोव्हेंबर
  • वेळ : सकाळी ७ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत
  • एकूण केंद्रे : ३४५२
  • एकूण उमेदवार : १२१

साहित्याचे आज वाटपमतदारसंघनिहाय निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आज, मंगळवारी सकाळी आठ वाजल्यापासून बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट, व्हीव्हीपॅट हा ईव्हीएम मशीनचा संच, शाई, सिलिंगचे साहित्य, वह्या, मतदार यादी, रजिस्टर अशा सर्व साहित्यांचे वाटप केले जाणार आहे. हे साहित्य घेऊन केंद्राध्यक्षांसह सर्व कर्मचाऱ्यांनी मतदान केंद्रांवर राहायला जायचे आहे. फक्त महिला कर्मचाऱ्यांना सूट असून, त्या घरी जाऊ शकतात. मात्र, पहाटे त्यांनी केंद्रावर उपस्थित असले पाहिजे. उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोर मॉकपोल झाल्यानंतर सकाळी सात वाजल्यापासून प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात होईल.

जिल्ह्यात १०, महिला, १० दिव्यांग केंद्रेनिवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रत्येक मतदारसंघात एक याप्रमाणे १० पिंक मतदान केंद्रे आहेत. या केंद्रांवर सर्व अधिकारी, कर्मचारी महिला असतील. तसेच १० दिव्यांग केंद्रे आहेत. एकूण १६ हजार २३७ अधिकारी, कर्मचारी निवडणूक प्रक्रियेत आहेत.

  • जिल्ह्यातील एकूण मतदार : ३३ लाख ०५ हजार ०९८
  • पुरुष मतदार : १६ लाख ६९ हजार २७०
  • महिला मतदार : १६ लाख ३५ हजार ६४२
  • तृतीयपंथी : १८६

सर्वाधिक मतदार दक्षिणमध्येजिल्ह्यात सर्वाधिक ३ लाख ७२ हजार ६८४ मतदार कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात आहेत. सर्वात कमी मतदार कोल्हापूर उत्तरमध्ये ३ लाख १ हजार ७४३ आहेत.चंदगड, कागल आणि कोल्हापूर उत्तरमध्ये पुरुषांच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या जास्त आहे.

५० टक्के केंद्रांवर वेबकास्टिंगजिल्ह्यात ३ हजार ४५२ मतदान केंद्रे असून, त्यापैकी महापालिका क्षेत्रातील सर्व व ग्रामीणमधील ५० टक्के अशारितीने २ हजार ९० मतदान केंद्रांचे वेबकास्टिंग होणार आहे.

जिल्ह्यात १४३ थिमॅटिक मतदान केंद्रमतदान टक्केवारी वाढीसाठी विविध संकल्पना घेऊन १४३ थिमॅटिक मतदान केंद्र साकारले जाणार आहेत. कुस्तीपंढरी, प्लास्टिक बंदी, लेक वाचवा, रेशीम उद्योग, स्थानिक पर्यटन स्थळे, लोककला, सेंद्रिय शेती अशा विविध विषयांच्या थीमवर आधारित ही केंद्रे असणार आहेत.

कोल्हापूर जिल्हा एकूण उमेदवार कोल्हापूर : एकूण जागा - १०पक्ष उमेदवारांची संख्या : ५६महाविकास आघाडीकाँग्रेस-०४शरदचंद्र पवार पक्ष-०३उद्धवसेना-०२काँग्रेस पुरस्कृत : ०१

महायुतीशिंदेसेना - ०३भाजप - ०२अजित पवार गट - ०२जनसुराज्य- ०४शिंदेसेना पुरस्कृत- ०१

बहुजन समाज पक्ष : १०वंचित बहुजन आघाडी : ०५मनसे : ०५राष्ट्रीय समाज पक्ष : ०३स्वाभिमानी पक्ष : ०३रिपब्लिकन पार्टी-ए : ०३संभाजी ब्रिगेड पार्टी : ०२लोकराज्य जनता पार्टी : ०१रिपब्लिकन सेना : ०१देशजनहित पार्टी : ०१अपक्ष : ६५उमेदवारांत महिला किती : ०८सर्व दहा मतदारसंघातील एकूण उमेदवार : १२१

मावळत्या सभागृहातील बलाबलमहायुती : ०६महाविकास आघाडी : ०४

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४kolhapur-north-acकोल्हापूर उत्तरkagal-acकागलwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024