शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
2
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
3
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
4
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
6
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
7
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
8
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
9
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
10
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
11
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
12
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
13
‘जन्माधारित नागरिकत्व’चा ट्रम्प यांचा निर्णय कोर्टाकडून स्थगित; अमेरिकेतील भारतीयांना दिलासा
14
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष
15
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
16
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
17
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
18
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
19
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
20
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या

Kolhapur politics: पन्हाळ्यातून विनय कोरे, चंद्रदीप नरकेंची विधिमंडळात वर्णी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2024 16:32 IST

सरदार चौगुले पोर्ले तर्फ ठाणे : विधानसभेच्या मतदारसंघ रचनेत कासारी नदीच्या सीमारेषेवरून दुभंगलेल्या पन्हाळा तालुक्याला आमदार विनय कोरे आणि ...

सरदार चौगुलेपोर्ले तर्फ ठाणे : विधानसभेच्या मतदारसंघ रचनेत कासारी नदीच्या सीमारेषेवरून दुभंगलेल्या पन्हाळा तालुक्याला आमदार विनय कोरे आणि आमदार चंद्रदीप नरके यांना आमदार करण्याचे भाग्य मिळाले. कोरे आणि नरके यांना तालुक्यातील जनतेने मताधिक्य देऊन मतदारसंघावर प्राबल्य मिळाले आहे.शाहूवाडीतून सत्यजित पाटील यांच्या बरोबरीने कोरे यांनी मतदान घेतल्याने शाहूवाडीतच सत्यजित पाटील यांच्या पराभवावर शिक्कामोर्तब झाले होते. कोरेंचे होमपिच असणाऱ्या पन्हाळ्यात सहानुभूतीऐवजी मतदारांनी विकासकामाला प्राधान्य दिल्याने प्रत्येकवेळी तालुक्यात कोरेंना मताधिक्य मिळाले आहे. कोरेंना शाहूवाडीत फोडाफोडीचं राजकारण करून सरूडकरांची दमछाक केली तसे सरूडकरांना गेल्या वीस वर्षांत पन्हाळ्यात फोडाफोडीचे राजकारण करता आले नाही. पन्हाळ्यातील गावागावांत कोरेंचा परस्पर विरोधी गट असला तरी तेच गट निवडणुकीत कोरेंसाठी एकदिलाने राबतात. कोरेंनी तालुक्यात उभे केलेले सहकाराचे जाळे त्यांची राजकीय ताकद बनल्याने त्यांचा विजय सोपा झाला. कोरेंनी ही निवडणूक एकतर्फी करून दाखवली आणि पाचव्यांदा आमदार होण्याची किमया केली. कोरेंना पन्हाळ्यातून ‘गोकुळ’चे संचालक अमर पाटील आणि मित्रपक्ष भाजपची मोलाची साथ मिळाली आहे.गत निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी नरकेंनी पन्हाळ्यातील होमपिचवर पाच वर्षे तयारी केली होती. म्हणून गत निवडणुकीतील पराभव विसरून त्यांना नव्या दमाने संपर्क वाढवत मतदारसंघात त्यांनी “घरचा माणूस” अशी निर्माण केलेली ओळख काटावरच्या लढतीसाठी भरवशाची ठरली. राहुल पाटील यांच्याकडे सहानुभूती असली तर विकासकामे आणि कार्यकर्त्यांसाठी झटणारा नेता म्हणून नरकेंची जमेची बाजू होती. नरकेंची काम करण्याची पद्धत, विकासकामे, जनसंपर्क, आश्वासक चेहरा म्हणून जनतेत त्यांची क्रेझ आहे.

पन्हाळ्यातून मताधिक्य मिळाले असले तरी जुन्या करवीरचा हात त्यांच्या पाठीशी शेवटपर्यंत राहिल्याने त्यांना विजयाच्या समीप राहता आले. निवडणुकीत जनसुराज्य पक्षाचे उमेदवार संताजी घोरपडे यांनी अपेक्षित मतदान न घेतल्याने त्यांच्या मताची विभागणी कोणाच्या पथ्यावर पडली. याबाबत तालुक्यात राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. नरकेंच्या विजयात त्यांचे बंधू ‘गोकुळ’चे संचालक अजित नरके, कुंभी कारखान्याचे संचालक, अजित पवार गटाचे कार्यकर्ते, भाजपचे पदाधिकारी यांचा सिंहाचा वाटा आहे.अटीतटीची लढतकोरेंना एकतर्फी विजय मिळवून शाहूवाडी-पन्हाळ्याचा वाघ कोरेच असल्याचे सिद्ध केले तर शेवटच्या मतापर्यंत विजयाची वाट पाहायला लावणारा निकाल नरकेंच्या राजकारणाला कलाटणी देणार ठरणारा आहे. आश्वासक चेहरा, वाढता जनसंपर्क आणि कामाची हमी देणारे नेते म्हणून गेल्या पाच वर्षांत कोरे आणि नरके तयार केलेल्या ‘क्रेझ’चा त्याचा फायदा त्यांना झाला.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Vinay Koreविनय कोरेShiv Senaशिवसेनाshahuwadi-acशाहूवाडीkarvir-acकरवीरwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024