शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan Sabha Election 2024: ठेकेदारांवरील प्रेम, कुणाचा करणार गेम; प्रचारात मुद्दा केंद्रस्थानी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2024 14:17 IST

जनतेच्या विकासापेक्षा ठराविक लोकांचेच भले झाल्याचा आरोप

कोल्हापूर : काही वर्षांपूर्वी एक काळ असा होता की, प्रामुख्याने बांधकाम ठेकेदार हे राजकीय नेत्यांना अगदी गरज असेल तेव्हा पडद्यामागे राहायचे आणि आर्थिक रसद पुरवायचे. परंतु काळ बदलला आणि ठेकेदारच इतके मातब्बर झाले की, ते नेत्यांनाही भारी पडू लागले. सध्या जिल्ह्यातील काही विधानसभा मतदारसंघांमध्ये या ठेकेदारांचीच चर्चा जोरात सुरू आहे. ठेकेदारांवरील प्रेम हाच काही मतदारसंघात प्रचाराचा प्रमुख मुद्दा बनला आहे. मतदारसंघाचा नव्हे तर सरकारच्या तिजोरीतून ठेकेदारांचेच भले झाल्याचा आरोप काही ठिकाणी प्रचाराच्या केंद्रस्थानी आला आहे.वीस वर्षांपूर्वी ठेकेदार सर्रास नेत्यांसोबत फिरताना दिसत नसत. विकासकामाचे भूमिपूजन करताना आणि नंतर उद्घाटनावेळी ठेकेदार दिसायचे. लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका लागल्या की हे ठेकेदार संबंधित नेत्यांना आर्थिक मदत करायचे. त्याचा फारसा गाजावाजाही होत नसे. कारण एकतर यंत्रणा आणून कामे करणारे ठेकेदारही मर्यादित होते आणि त्यांचाही बडेजाव नसायचा.

परिस्थिती बदलू लागली. राज्याचा अर्थसंकल्प वाढायला लागला. योजना वाढल्या. साहजिकच ठेकेदारांची संख्याही वाढली. ‘साहेबांच्या’ ठेकेदारांची मुलेही सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर होऊन बाजारात उतरली. पूर्वी जो ठेकेदार निवडणुकीला आतून मदत करायचा त्यालाच जिल्हा परिषद, पंचायत समितीचा सदस्य होण्याची स्वप्ने पडू लागली. मग तोदेखील जोडण्या लावू लागला. एकतर कामे वाढल्यामुळे खासदार, आमदारही आपल्या स्वीय सहायकासह प्रमुख तीन, चार ठेकेदारांवर अवलंबून राहू लागले. इतरांनाही कामाचे वाटप करायची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात येऊ लागली.कामे ‘मॅनेज’ होऊ लागली. यातून ज्यांना कामे मिळत नव्हती असे छोटे ठेकेदार टक्केवारीची बाहेर चर्चा करू लागले. खासदार, आमदारांची आणि बांधकाम विभागाच्या शिपायापासून अधिकाऱ्यांपर्यंतच्या टक्केवारीचे दरपत्रकच चर्चेत येऊ लागले. कोट्यवधींच्या योजना आणायच्या आणि त्या आपल्या पद्धतीने करायची नवी पद्धत सुरू झाली. त्याच्या दर्जाबाबत फारसे कोणी आग्रही राहिनासे झाले. चुकून एखादा अधिकारी अधिक चौकशी करू लागला तर त्यालाही दाबण्याची भाषा होऊ लागली. यातूनच मग ठेकेदार इतके मोठे झाले की नेत्यांच्या सभांना लोक आणण्यापासून ते त्यांचा अर्ज भरण्यापर्यंतच्या गर्दीत ठेकेदार दिसू लागले. निवडणुकीची बरीच यंत्रणाही ठेकेदारच हलवू लागले आहेत.

बहुतांशी बडे ठेकेदार नेत्यांचे कारभारीसध्या जिल्ह्यातील अनेक उमेदवारांची यंत्रणा राबविण्यात ठेकेदारच अग्रभागी आहेत. या योगदानाच्या बळावरच त्यांची पुढची कंत्राटे निश्चित होत असल्याने अनेकांनी पडद्यामाागे न राहता थेट व्यासपीठावरून भाषणे ठोकायलाच सुरुवात केली आहे. त्यातल्या त्यात कागल, चंदगड, भुदरगड, शाहुवाडी तालुक्यातील ठेकेदारांचा मुद्दा ऐरणीवर येऊ लागला आहे. यातूनच मग आपल्याला काम न देणाऱ्या नेत्याच्याविरोधात जिल्हा परिषदेच्या समोर उभे राहून बोलण्याची हिंमत हे ठेकेदार दाखवू लागले आहेत.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४western maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024