शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
2
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
3
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
4
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
5
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
6
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
7
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
8
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
9
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
10
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
11
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
12
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
13
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
14
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
15
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
16
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा
17
'सैयारा'साठी 'या' रिअल लाईफ जोडीला होती ऑफर, मोहित सूरींनी बदलला निर्णय; कारण...
18
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
19
"तुझे ओठ सेक्सी आहेत, किस करू?", असित मोदींवर TMKOC फेम अभिनेत्रीचे गंभीर आरोप
20
"तो मला टॉर्चर करतोय"; पत्नीच्या पोलीस तक्रारीनंतर पती घरातून पळाला, पण त्यानंतर जे घडलं...

बंटी पाटील खुनशी, मित्रपक्षांना संपवतात; धनंजय महाडिक यांचा आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2024 12:09 IST

मुन्ना महाडिक यांचा भांग विस्कटणारा या पृथ्वीतलावर जन्माला यायचा आहे

कोल्हापूर : काँग्रेसचे नेते विश्वजीत कदम यांनी बंटी पाटील यांच्यासारखे वागलो, तर मित्रपक्ष शिल्लक राहणार नाहीत, असे म्हटले आहे. यावरून बंटी पाटील यांचे राजकारण खुनशी असल्याचे स्पष्ट होते. ते मित्र पक्षांना संपवतात, असा घणाघाती आरोप खासदार धनंजय महाडिक यांनी केला. चार आमदार असूनही त्यांनी विकास केला नाही. आयआरबी कंपनीला आणून टोल लादला होता. मुद्दाम टोलची पावती फाडली होती, अशी बोचरी टीकाही त्यांनी केली. तपोवन मैदानात महायुती उमेदवारांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभेत ते बोलत होते.ते म्हणाले, अडीच वर्षांत थेट पाइपलाइन योजना पूर्ण झाली नाही, तर निवडणूक लढवणार नाही, अशी घोषणा केली होती. पण, त्यांनी पुन्हा निवडणूक लढवली. थेट पाइपलाइनच्या पाण्यात अभ्यंगस्नान केले. पण, अजूनही शहराला पाणीपुरवठा होत नाही. त्यांनी छत्रपती घराण्यातील सूनेचा अवमान केला, असे बंटी पाटील माझ्यावर महिलांचा अवमान करतो, असे आरोप करतात. महायुतीचे सरकार आल्यावर कोल्हापूर विमानतळ, रेल्वे स्टेशनला भरीव निधी मिळाला. वंदे मातरम रेल्वे मिळाली. महामार्गचे काम गतीने होत आहे. मात्र, काॅंग्रेसकडे कोणतेही सांगण्यासारखे विकासाचे काम नसल्याने ते खोटे आरोप करीत आहेत.अमल महाडिक म्हणाले, दक्षिण-उत्तरसह युतीच्या सर्व जागा निवडून येणार याची खात्री आहे. मी कमी बोलत असलो, तरी समोर बसलेली जनता हाच माझा खरा आवाज आहे. याच जोरावर दक्षिणमध्ये कमळ फुलवणार आहे. मतदारसंघाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण मला विजयी करा. मी तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही.उमेदवार राजेश क्षीरसागर म्हणाले, महायुतीच्या सरकारने शहरातील रस्त्यांसाठी शंभर कोटींचा निधी दिला आहे. याची वर्क ऑर्डर झाली नसल्याचे सिद्ध केल्यास मी राजकारणातून संन्यास घेतो. खासदार धैर्यशील माने म्हणाले, लोकसभा निवडणुकीसाठी माझ्या प्रचारासाठी योगी आदित्यनाथ आले. त्यामुळे मला एका शहरातून ४० हजारांचे मताधिक्य मिळाले. आता दक्षिणमधून अमल महाडिक, उत्तरमधून राजेश क्षीरसागर, करवीरमधून चंद्रदीप नरके यांचा विजय निश्चित आहे.

चंद्रदीप नरके म्हणाले, महायुतीच्या सरकारने अनेक विकासकामे केली. यामुळे महायुतीचे सर्व उमेदवार निवडून येणार आणि काॅंग्रेसच्या नेत्याची दहशत संपणार आहे. जनसुराज्य शक्ती पक्षाचे समित कदम, भाजपचे जिल्हाअध्यक्ष विजय जाधव, राहुल चिक्कोडे, उत्तम कांबळे, संतोष उर्फ बाळ महाराज, महेश जााधव, प्रा. मच्छिंद्र सकटे यांची भाषणे झाली. मेळाव्यास उमेदवार अशोकराव माने, सुजीत चव्हाण, राजवर्धन निंबाळकर, नाथाजी पाटील आदी उपस्थित होते.

भांग विस्कटणारा जन्माला यायचा आहे : महाडिकफुलेवाडी येथील मेळाव्यात मी लाडकी बहीण योजनेबद्दल बोललो, त्याचा काँग्रेसने विपर्यास केला. राज्यभर माझ्या विरोधात गरळ ओकली. उद्धव ठाकरे यांनीही जाहीर सभेत हातपाय मोडण्याची भाषा केली. पण, मुन्ना महाडिक यांचा भांग विस्कटणारा या पृथ्वीतलावर जन्माला यायचा आहे, असे आव्हान खासदार महाडिक यांनी दिले.

त्या थांबत नाहीत..अमल महाडिक कमी बोलतात आणि शौमिका महाडिक थांबत नाही. त्या रणरागिणीसारख्या दक्षिणचा विजय खेचून आणतील, असे खासदार माने म्हणताच प्रेक्षकांतून दाद मिळाली.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Dhananjay Bhimrao Mahadikधनंजय भीमराव महाडिकSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024