शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात राहुल गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरेंच्या तोफा धडाडणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2024 13:57 IST

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे नारळ फुटले असून, प्रचाराने गती घेतली आहे. राजकीय पक्षांनी आपापल्या स्टार प्रचारकांच्या सभांचे नियोजन ...

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे नारळ फुटले असून, प्रचाराने गती घेतली आहे. राजकीय पक्षांनी आपापल्या स्टार प्रचारकांच्या सभांचे नियोजन केले आहे. साधारणत: सोमवार (दि. ११) पासून या सभा सुरू होणार असून, शेवटच्या आठवड्यात काँग्रेसचे नेते राहुल गांधी, ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार अमोल काेल्हे, उद्धवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यासह स्टार प्रचारक महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी मैदानात उतरणार आहेत.राज्य व राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांच्या सभांचे नियोजन उमेदवारांकडून सुरू झाले आहे. कोणत्या भागात कोणत्या नेत्यांचा प्रभाव पडू शकतो, याचा अंदाज घेऊन त्या नेत्यांना प्रचार सभेसाठी आणण्याचे नियोजन केले आहे. काॅंग्रेसकडून राष्ट्रीय नेते राहुल गांधी, राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या सभांचे नियोजन केले आहे. पण अद्याप प्रदेश काँग्रेसकडून अधिकृत सांगण्यात आलेले नाही.राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून पक्षाध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे यांच्या सभा होणार आहेत. उद्धवसेनेकडून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, माजी मंत्री भास्करराव जाधव, सुषमा अंधारे, नितीन बानुगडे-पाटील यांच्या सभांचे नियोजन केले आहे.

बानुगडे-पाटील, अंधारे, कोल्हेंना मागणीमहाविकास आघाडीतील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांकडून उद्धवसेनेचे उपनेते नितीन बानुगडे-पाटील, सुषमा अंधारे व खासदार अमोल कोल्हे यांना मागणी अधिक आहे. या स्टार प्रचारकांच्या सभा पुढील आठवड्यातच जिल्ह्यात होणार आहेत.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४kolhapur-north-acकोल्हापूर उत्तरSharad Pawarशरद पवारRahul Gandhiराहुल गांधीUddhav Thackerayउद्धव ठाकरेMahavikas Aghadiमहाविकास आघाडीwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024