शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan Sabha Election 2024: चंदगडचे अपक्ष आमदार शिवाजीराव पाटील यांचा 'भाजप'ला पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2024 15:14 IST

राम मगदूम  गडहिंग्लज: चंदगड विधानसभा मतदारसंघातील अपक्ष आमदार शिवाजीराव पाटील यांनी भारतीय जनता पक्षाला बिनशर्त पाठिंबा दिला. मंत्रालयात उपमुख्यमंत्री ...

राम मगदूम गडहिंग्लज: चंदगड विधानसभा मतदारसंघातील अपक्ष आमदार शिवाजीराव पाटील यांनी भारतीय जनता पक्षाला बिनशर्त पाठिंबा दिला. मंत्रालयात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्यांनी पाठिंब्याचे पत्र सुपूर्द केले. यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, 'कोल्हापूर दक्षिण'चे आमदार अमल महाडिक उपस्थित होते.'महायुती'तील राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट)विद्यमान आमदार राजेश पाटील यांचा त्यांनी तब्बल २४ हजाराच्या मताधिक्याने पराभव केला आहे. त्यानंतर कोल्हापूर जिल्हयातील महायुतीच्या आमदारांसोबतच ते खास विमानाने मुंबईला जाऊन त्यांनी आपल्या पाठिंब्याचे पत्र उपमुख्यमंत्री फडणवीस यांना दिले. विजयाबद्दल आमदार पाटील यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व पाठिंब्याबदल आभार मानले.गेल्यावेळीही त्यांनी 'भाजप-सेनायुती'तील शिवसेनेचे उमेदवार संग्रामसिंह कुपेकर यांच्याविरूद्ध बंडखोरी केली होती. परंतु, त्यांचा आमदार राजेश पाटील यांच्याकडून थोडक्यात पराभव झाला होता. मात्र, पराभवानंतरही  जनसंपर्काबरोबरच पक्ष बांधणीच्या कामात व्यस्त राहिले. म्हणूनच, पक्षाने त्यांच्यावर चंदगड मतदार संघाच्या निवडणूक प्रचार प्रमुखपदाची धुरा सोपवली होती. तथापि,यावेळी 'चंदगड'ची जागा  राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे गेली.त्यामुळे त्यांनी 'महायुती'चे विद्यमान आमदार राजेश पाटील यांच्याविरूध्द बंड केले.पंचरंगी निवडणूकीत त्यांनी आमदार राजेश पाटील यांचा तब्बल २४ हजार मतांनी पराभव केला.'चंदगड'मध्ये 'शिवा'भाऊ !'अपक्ष उमेदवार' म्हणून निवडणूक लढवताना देखील शिवाजीराव पाटील यांनी उपमुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो लावूनच प्रचार केला." महाराष्ट्रात 'देवा'भाऊ, 'चंदगड'मध्ये शिवाभाऊ"अशीच त्यांची 'टॅगलाईन' होती. निवडणूकीच्या निकालानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी 'भाजप'ला बिनशर्त पाठिंबा दिला आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024BJPभाजपाwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024