शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर उत्तरमधील उमेदवार बदला; काँग्रेसमध्ये राजेश लाटकर यांच्या उमेदवारीवरुन असंतोष

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2024 12:39 IST

२६ माजी नगरसेवकांचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांना साकडे

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून राजेश लाटकर यांना दिलेल्या उमेदवारीवरुन काँग्रेस पक्षात असंतोष निर्माण झाला आहे. जाहीर झालेला हा उमेदवार लादलेला आहे. तो बदलण्यासाठी फेरविचार करावा या मागणीचे निवेदन पक्षाच्या २६ माजी नगरसेवकांनी जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांच्याकडे रविवारी दिले आहे.माजी नगरसेवक शारंगधर देशमुख यांच्या लेटरहेडवर पक्षाच्या माजी नगरसेवकांनी तसेच माजी पदाधिकाऱ्यांनी ही मागणी केली आहे. या मतदारसंघातून काँग्रेसने शनिवारी राजेश लाटकर यांची उमेदवारी जाहीर केली आहे.या उमेदवाराने काँग्रेसमध्ये तसेच दिलेल्या मतदारसंघात कोणतेही भरीव कार्य केलेले नाही, तसेच त्यांचा लोकसंपर्क नाही, असा आरोप या नेत्यांनी केला आहे. त्यांच्याकडे पक्षाचे प्राथमिक सदस्यत्वही नाही, त्यामुळे मतदारसंघात त्यांच्या उमेदवारीवरून प्रचंड नाराजी असल्याने त्यांना प्रतिसाद मिळणार नाही, असा आम्हाला विश्वास असल्याचे या नगरसेवकांनी या पत्रात म्हटले आहे. या पत्रावर शारंगधर देशमुख, निलोफर आजरेकर, दुर्वास कदम, संजय माेहिते, सचिन चव्हाण, अर्जुन माने, प्रतीक्षा धीरज पाटील, जय पटकारे, संदीप नेजदार, प्रतापसिंह जाधव, इंद्रजित बाेंद्रे, उमा शिवानंद बनछोड, वहिदा फिरोज सौदागर, मधुकर रामाणे, छाया उमेश पोवार, अभिजित चव्हाण, रीना कांबळे, संदीप सरनाईक, शेखर जाधव, दीपा मगदूम, मेहजबीन सुभेदार, अफजल पिरजादे, भूपाल शेटे, नियाज खान, राजाराम गायकवाड, पूजा नाईकनवरे, जयश्री चव्हाण यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.दगडफेक अन् तणावराजेश लाटकर यांना उमेदवारी मिळाल्याने नाराज झालेल्या इच्छुक उमेदवाराच्या समर्थकांनी मध्यरात्रीच्या सुमारास काँगेस कार्यालयावर दगडफेक केली. काल, रविवारी दोन्हा गट आमने-सामने आल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४kolhapur-north-acकोल्हापूर उत्तरcongressकाँग्रेस