शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
3
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
4
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
5
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान
6
विशेष लेख: उपराष्ट्रपतिपदाच्या खुर्चीत 'खेळात न उतरणारा खेळाडू'
7
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
8
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?
9
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
10
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
11
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
12
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
13
ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग
14
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
15
Apple चे नवे AirPods Pro 3 लाँच; किंमत मोठी, पण फीचर्स खुश करणारे!
16
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
17
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
18
Asia Cup T20 Fastest Fifty : वादळी खेळीसह ओमरझाईचं विक्रमी अर्धशतक; सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडला
19
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
20
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?

माजी पालकमंत्र्यांकडून माझ्यावर हल्ल्याचा प्रयत्न, राजेश क्षीरसागर यांचा आरोप

By समीर देशपांडे | Updated: November 21, 2024 18:10 IST

'मी परिस्थिती पाहून शांत राहण्याचा निर्णय घेतला'

कोल्हापूर: शहरामध्ये ज्या पध्दतीने काल, बुधवारी दुपारपर्यंत पेठापेठांमधून मला भरघोस पाठबळ मिळाले. त्यामुळे ‘काय करू आणि काय नको’ अशी अवस्था झालेले माजी पालकमंत्र्यांनी आपल्यावर दोन वेळा हल्ल्याचा प्रयत्न केला असा आरोप राज्य नियोजन म्ंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत केला. सुदैवाने मी वाचलो. परंतू या घटनांचा निषेध करत या प्रकरणी निवडणूक आयोग आणि जिल्हा पोलिस प्रमुखांकडे तक्रार करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. यावेळी आमदार जयश्री जाधव,सत्यजित कदम, भाजपचे महेश जाधव, राष्ट्रवादीचे आदिल फरास उपस्थित होते.ते म्हणाले, शहरात चांगल्या पध्दतीने मतदान सुरू हाेते. टाकाळ्यातील काही जणांनी मला फोन केला की आमच्याकडे विकासकामे झाली नाहीत. आम्ही मतदान करणार नाही. म्हणून त्यांची समजूत घालण्यासाठी मी गेलो. यावेळी २०/२५ गुंड हातात दांडकी घेवून होते. हे नियोजनबद्ध होते. परंतू मी परिस्थिती पाहून शांत राहण्याचा निर्णय घेतला. तर उलट आमच्या पायाखालची वाळू सरकली म्हणून हा प्रकार करून आमचीच बदनामी करण्यात आली. माझा अंगरक्षक पोलिसही जखमी झाला आहे. तो देखील तक्रार करणार आहे.पुढे क्षीरसागर म्हणाले, दुपारी कसबा बावड्यात ठाकरे गट आणि आमचे सुनील जाधव यांच्यात वादावादी झाली. ती मीच पुढे होवून शांत केली. परंतू आम्ही हॉटेलमध्ये मिसळ खात असताना १०० /१५० चा जमाव या ठिकाणी जमला. हे सर्व नियोजनपूर्वक होते. परंतू मसीहा असल्यासारखे ते तिथे आले आणि भाषण करून गेले. हे सर्व षडयंत्र होते. यांची काळी कृत्ये कधी बाहेर येत नाहीत. माझ्या वैयक्तिक बदनामीबाबतही मी कायदेशीर सल्ला घेत आहे. या सर्व प्रकारांविरोधात दाद मागणार आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४kolhapur-north-acकोल्हापूर उत्तरRajesh Vinayakrao Kshirsagarराजेश विनायकराव क्षीरसागरSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024