शहरं
Join us  
Trending Stories
1
"होय, छगन भुजबळांचा नावाचा प्रस्ताव होता पण तडजोडीत ही जागा शिवसेनेला गेली"
2
दिल्ली, नोएडात खळबळ! एकाचवेळी ५० शाळांना बॉम्ब ठेवल्याचे मेल; विद्यार्थ्यांना सोडले
3
ठाणे, कल्याणमध्ये शिंदेंचे उमेदवार जाहीर; नरेश म्हस्केंना उमेदवारी, नाशिक अद्याप गुलदस्त्यातच
4
'एकेकाळी मी शरद पवारांना दैवत मानायचो, आता मी वेगळा मार्ग स्वीकारला आहे', अजित पवार यांचं विधान
5
Fact Check : राहुल गांधींनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला?; जाणून घ्या 'त्या' व्हायरल Video मागचं 'सत्य'
6
'सगळं माहिती असताना मोदींनी प्रज्ज्वल रेवन्नासाठी मतं मागितली'; ओवेसींचा आरोप
7
AI च्या माध्यमातून लक्ष्मीकांत बेर्डे परत येणार? महेश कोठारे करणार हा भन्नाट प्रयोग
8
Akhilesh Yadav : "कोरोना लसीवरून वाद, लोकांना येतोय हार्ट अटॅक"; अखिलेश यादव यांचं भाजपावर टीकास्त्र
9
माझं सत्त्व, माझं तत्त्व आणि सर्वस्व 'महाराष्ट्रधर्म', महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंची पोस्ट!
10
Wipro च्या नव्या सीईओंना किती वेतन मिळणार माहितीये? त्यात येतील दोन प्रायव्हेट जेट!
11
नाशिकमध्ये ठाकरे गटात बंड होणार! एक नेता दीड वर्षापासून तयारी करतोय, अर्ज घेतला
12
किंग खान King Kohli ला म्हणाला 'जावई', अनुष्का-विराटच्या नात्याचा शाहरुख होता साक्षीदार
13
बॉलिवूडच्या या अभिनेत्याच्या होत्या ३०८ गर्लफ्रेंड्स, त्यांना घेऊन जायचा कब्रस्तानात, कारण वाचून व्हाल हैराण
14
काँग्रेसमध्ये राज्यात ऐक्याचे चित्र, एकमेकांच्या पाडापाडीला फाटा; आपापले सुभे सांभाळण्यावर भर
15
"विरोधकांकडे आरोपांशिवाय काही उरलेलं नाही"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हुतात्म्यांना वाहिली आदरांजली
16
महाराष्ट्र दिनानिमित्त नरेंद्र मोदींचं मराठमोळं ट्विट; "परंपरा, प्रगती आणि एकता..."
17
वातावरण टाइट ! साखर पेरणी की जातीचा मुद्दा ? 'शेट्टी-सरुडकर-माने' यांच्यामध्येच फाइट
18
‘आधी बूथ कॅप्चर व्हायचं, आता उमेदवारच पळवले जाताहेत’, इंदूरमधील घटनेवरून काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
19
Mutual Fund मधील इन्सायडर ट्रेडिंग काय आहे माहितीये? ज्यावर SEBIनं उचलली कठोर पावलं, जाणून घ्या
20
मुंबईत आगळा सामना! मुलाविरुद्ध प्रचार करणार वडील;रवींद्र वायकरांसाठी गजानन कीर्तिकर उतरणार मुलगा अमोलविरोधात प्रचारात

Maharashtra Assembly Election 2019 : देशाची अर्थव्यवस्था किमान तीन वर्षे रूळावर येणार नाही : यशवंत सिन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2019 11:48 AM

देशाची अर्थव्यवस्था सध्या इतकी गंभीर आहे, की पुढील किमान तीन वर्षे तरी ती रूळावर येईल, अशी कोणतीही चिन्हे दिसत नाहीत, अशी भीती माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी व्यक्त केली. अर्थतज्ज्ञ आणि अर्थमंत्र्यांसह कुणाचेही न ऐकता एकांगी निर्णय घेणारे पंतप्रधान मोदीच या ढासळणाऱ्या अर्थव्यवस्थेला एकटे जबाबदार आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

ठळक मुद्देदेशाची अर्थव्यवस्था किमान तीन वर्षे रूळावर येणार नाही : यशवंत सिन्हाकोल्हापूर दौऱ्यात माध्यमांशी संवाद

कोल्हापूर : देशाची अर्थव्यवस्था सध्या इतकी गंभीर आहे, की पुढील किमान तीन वर्षे तरी ती रूळावर येईल, अशी कोणतीही चिन्हे दिसत नाहीत, अशी भीती माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी व्यक्त केली. अर्थतज्ज्ञ आणि अर्थमंत्र्यांसह कुणाचेही न ऐकता एकांगी निर्णय घेणारे पंतप्रधान मोदीच या ढासळणाऱ्या अर्थव्यवस्थेला एकटे जबाबदार आहेत, असा आरोपही त्यांनी केला.सातारा दौऱ्यावर आलेले सिन्हा हे बुधवारी अल्पकाळासाठी कोल्हापुरात आले होते. पहिल्यांदा कोल्हापुरात आलेल्या सिन्हा यांनी माध्यमांशी संवाद साधत देशातील अर्थव्यवस्थेविषयी चिंता व्यक्त केली. प्रचारासाठी आलो नाही, हे स्पष्ट करून अर्थशास्त्राचे नियम अतिशय कठोर आणि निष्ठूर असतात, ते कुणाची छाती किती इंचाची आहे, हे बघत नाही, असा टोलाही लगावला.सिन्हा म्हणाले, ‘देशातील अर्थव्यवस्थेवर १९९१, १९९८ आणि २00८ असे तीनवेळा संकट आले, पण ते देशांतर्गतपेक्षा जागतिक पातळीवरील घडामोडींमुळे आले होते. याउलट २0१९ मध्ये आलेली परिस्थिती मात्र देशांतर्गत असून, सरकारच्या वैयक्तिक धोरणामुळे ओढवली आहे.

नोटाबंदी, जीएसटी या दोन धोरणांनी अर्थव्यवस्थेचे कंबरडेच मोडून टाकले आहे. यातून बाहेर काढण्यासाठी कठोर पाऊले उचलण्याऐवजी कार्पोरेट क्षेत्राला करसवलतीचा तकलादू उपाय केला जात आहे. यातून मोजक्याच श्रीमंतांना फायदा झाला.

एक लाख ३0 हजार कोटींची रक्कम कृषी आणि रिअल इस्टेटकडे वळवली असती, तर आज जो विकासदर आणि बेरोजगारीने निचांक गाठला आहे, त्यात काही प्रमाणात सुधारणा झाली असती; पण पंतप्रधानपदी बसलेल्या मोदींना हे करायचेच नाही. त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांना कोणतेही अधिकार राहिलेले नाहीत, त्यांची मते विचारात घेतली जात नाहीत; त्यामुळे अर्थव्यवस्थेच्या वाईट परिस्थितीबाबत अर्थमंत्र्यांना दोष देऊन उपयोग नाही. भीती असल्यामुळे आणि निर्णयाविषयी अज्ञान असल्यामुळे त्यांचे मंत्री काय वाटेल ते बरळत सुटले आहेत.म्हणून ३७0 कलमएक देश एक निवडणूक हा भाजपचा अजेंडा आहे. महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन राज्यांतील निवडणुका ही त्याचीच चाचणी आहे. ३७0 कलमाचा काश्मीर वगळता इतर राज्यांशी काही संबंध नसतानाही मुद्दा पुढे आणण्यामागे हेच राजकारण आहे. संवेदनशील मुद्द्यांचे पूर्णपणे राजकारण केले आहे, अशी टीकाही सिन्हा यांनी केली.विरोधकांचे खच्चीकरणलोकसभा निवडणुकीनंतर विरोधी पक्षांचे खच्चीकरण झाले असून, त्यांची ताकदही विस्कळीत झाली आहे. विरोधकांचा आवाज बाहेर येऊच नये, आला तरी तो जनतेपर्यंत पोहोचू नये, याची पद्धतशीर व्यवस्था भाजपकडून केली जात आहे. अर्थव्यवस्थेचे खरे आकडे लपविले जात आहेत, असा आरोपही सिन्हा यांनी केला. 

 

टॅग्स :Yashwant Sinhaयशवंत सिन्हाkolhapurकोल्हापूर