शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

महाराणी ताराबाई यांचा शौर्यशाली इतिहास जगासमोर येणे गरजेचे, डॉ. प्रा. जयसिंगराव पवार यांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 12:43 IST

पन्हाळ्यात मोगलमर्दिनी महाराणी ताराबाई विद्वत परिषद

पन्हाळा : महाराणी ताराबाई यांच्या राज्य कारभाराचा, त्यांनी गाजवलेल्या शौर्याचा इतिहास प्रसिद्धीपासून दूर आहे. तो महाराष्ट्रातच नाही, तर जगासमोर येणे गरजेचे आहे, असे मत ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. प्रा. जयसिंगराव पवार यांनी व्यक्त केले. ते राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे पन्हाळगडावर महाराणी ताराबाई यांच्या ३५० व्या जन्म वर्षानिमित्त आयोजित मोगलमर्दिनी महाराणी ताराबाई विद्वत परिषदेत बोलत होते. दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेचे खा. शाहू छत्रपती यांच्या हस्ते उद्घाटन झाले.डॉ. प्रा. जयसिंगराव पवार म्हणाले की, छत्रपती ताराबाई यांचा उपेक्षित इतिहास जनतेसमोर नसल्याने मी तो मांडण्याचा प्रयत्न करत आहे. आठशे पानांचा छत्रपती ताराबाईंचा इतिहास येत्या जानेवारीत न्यू पॅलेसमध्ये खासदार शाहू महाराज यांच्या हस्ते प्रकाशन करणार आहोत. त्यातील प्रसंग सांगताना प्रा. पवार म्हणाले की, अमेरिकेतील रिचर्ड लॅटिन हे भारतीय इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी भारतात आले होते. त्यांच्या भेटीत रिचर्ड लॅटिन म्हणतात की, संपूर्ण जगाच्या इतिहासात मध्ययुगीन काळातील कर्तृत्ववान महिला या एकमेव छत्रपती ताराबाई होत्या, पण त्यांचा इतिहास जगासमोर आला नाही.खासदार शाहू छत्रपती म्हणाले की, छत्रपती ताराबाई यांनी स्वराज्याचे रक्षण केले, हे महत्त्व महाराष्ट्रातील जनतेला अजूनही समजलेच नाही. मग जगासमोर कसे येणार. सांस्कृतिक कार्य संचालनालयाने आयोजित केलेल्या परिषदेबद्दल त्यांचे आभार मानतो. यावेळी शाहीर आझाद नायकवडी आणि सहकाऱ्यांनी पोवड्याचे सादरीकरण करून परिसर शिवमय केला होता.

ताराबाई यांचा पन्हाळगडावर पुतळा उभारावाछत्रपती ताराबाई यांचा पुतळा पन्हाळगडावर उभा करावा, ही मागणी पन्हाळ्यातील जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांनी खासदार छत्रपती शाहू महाराज यांच्याकडे केली. ती तत्काळ मान्य करत, त्यासाठी लागणारे निवेदन तयार करवून घेतले. त्या निवेदनावर पहिली सही त्यांनी स्वतः केली, तर दुसरी सही डॉ. प्रा. जयसिंगराव पवार यांनी केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरhistoryइतिहास