ब्राह्मण महासंघाच्यावतीने महामृत्युंजय जप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:23 IST2021-05-15T04:23:33+5:302021-05-15T04:23:33+5:30

कोल्हापूर : अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्यावतीने परशुराम जयंतीचे औचित्य साधून संध्याकाळी चार ते पाच ...

Mahamrityunjaya chanting on behalf of Brahmin Federation | ब्राह्मण महासंघाच्यावतीने महामृत्युंजय जप

ब्राह्मण महासंघाच्यावतीने महामृत्युंजय जप

कोल्हापूर : अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्यावतीने परशुराम जयंतीचे औचित्य साधून संध्याकाळी चार ते पाच या वेळेत महामृत्युंजय जपाचे पठण करण्यात आले. झूमच्या माध्यमातून राज्यातील जिल्हे आणि तालुका पातळीवरील कार्यकर्ते यामध्ये सहभागी झाले होते.

शुक्रवारी सकाळी चित्पावन संघ व अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्यावतीने श्री भगवान परशुरामाची पूजा करण्यात आली. यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष शामराव जोशी, जिल्हाध्यक्ष विवेक जोशी, पुरोहित आघाडीचे अध्यक्ष नंदकुमार मराठे, माधव करंदीकर, गिरीश जोग, प्रसाद भिडे, शोमा मराठे, केदार जोशी, रोहिणी कुलकर्णी उपस्थित होते. संपूर्ण मानवजातीवर आलेले हे कोरोनाचे संकट दूर व्हावे अशी प्रार्थना यानिमित्ताने करण्यात आली.

१४०५२०२१ कोल ब्राह्मण महासंघ

परशुराम जयंतीनिमित्त ब्राह्मण महासंघ आणि चित्पावन संघाच्यावतीने नंदकुमार मराठे यांच्या हस्ते परशुराम यांचे पूजन करण्यात आले. यावेळी शामराव जोशी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Mahamrityunjaya chanting on behalf of Brahmin Federation