शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

महालक्ष्मी एक्स्प्रेस तब्बल सतरा तासांनी पोहोचली मुंबईत, प्रवाशांचे हाल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2023 12:09 IST

रेल्वे प्रशासनाने याची कल्पना प्रवाशांना देणे गरजेचे होते. मात्र, ती दिली न झाल्यामुळे अनेकांना मनस्ताप झाला

कोल्हापूर : कोल्हापूरहून मुंबईकडे मंगळवारी रात्री ८.५० वाजता रवाना झालेली महालक्ष्मी एक्स्प्रेस तब्बल साडेसात तास उशिराने म्हणजेच बुधवारी दुपारी २.३० वाजता मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर पोहोचली. त्यामुळे या रेल्वेतून प्रवास करणाऱ्या नोकरदार व्यावसायिक उद्योजक व अन्य प्रवाशांना मोठ्या मनस्तापासही सामोरे जावे लागले. याबद्दल रेल्वे प्रशासनाकडून काहीच दखल न घेतल्याने प्रवासी संतापले.ही एक्स्प्रेस मुंबईकडे जाण्यासाठी रवाना झाली. लोहमार्गावरील स्थानके करीत ही रेल्वे सातारा ते कोरेगावदरम्यान मध्यरात्री पोहोचली. यादरम्यान दुहेरीकरणाचे काम सुरू असल्याने या ठिकाणी या रेल्वेला क्रॉसिंगसाठी हिरवा सिग्नल मिळाला नाही. त्यामुळे पुढे ही याच कारणामुळे या रेल्वेतून प्रवास करणाऱ्यांना सकाळी नऊ वाजता पुणे स्टेशनला पोहोचता आले. तिथेही या मुळातच उशीर झालेल्या महालक्ष्मी एक्स्प्रेसला सिग्नल लवकर मिळाला नाही. त्यामुळे सकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी मुंबईला पोहोचणारी ही महालक्ष्मी एक्स्प्रेस दुपारी २ वाजता ठाणे रेल्वे स्थानकात पोहोचली आणि तेथून पुढे मुंबईला पोहोचण्यासाठी आणखी ४० मिनिटे म्हणजेच २.४० ही रेल्वे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर पोहोचली.त्यामुळे तब्बल साडेसात तासांहून अधिक या रेल्वेतून प्रवास करणाऱ्या अनेक नोकरदारांना रजा टाकावी लागली. व्यापारी उद्योजकांचे ठरलेले व्यवहार न करता आल्यामुळे आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले. प्रवासी उपचारांकरिता मुंबईत आलेले त्यांनी घेतलेली डॉक्टरांची अपॉइंटमेंट ही कॅन्सल झाली. अनेकांना उपाशी राहावे लागले. पुणे मार्गस्थ होणाऱ्या रेल्वे या ठिकाणी क्रॉसिंगला हिरवा सिग्नल न मिळाल्यामुळे थांबून ठेवल्या जातात. याबाबत रेल्वे प्रशासनाने याची कल्पना प्रवाशांना देणे गरजेचे होते. मात्र, ती दिली न झाल्यामुळे अनेकांना मनस्ताप झाला.

या मार्गावरील सातारा ते कोरेगाव यादरम्यानची दुहेरीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यानंतर या मार्गावर होणारी वाहतूक मोठ्या प्रमाणावर असल्याने महालक्ष्मी एक्स्प्रेसला सिग्नल मिळण्यास वेळ लागला. आजपासून ही रेल्वे सुरळीत सुरू राहील व प्रवाशांना त्रास होणार नाही, याची काळजी घेऊ. - मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरrailwayरेल्वे