शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

टँकरमधून मिळणाऱ्या १३४ कोटीसाठीच महाडिकांचे ३:१३:२३ चे तुणतुणे : सतेज पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2021 18:27 IST

GokulMilk Kolhapur : गोकुळच्या टँकरमधून वर्षाला मिळणाऱ्या १३४ कोटी वाचवण्यासाठीच महादेवराव महाडीक संघाच्या निवडणूकीत ३:१३:२३ तारखेचे तुणतुणे वाजवत होते. त्यांचा गोकुळमधील स्वार्थ लोकांसमोर आला असून अनेक वर्षे व्यंकटेश्वरा गुडस मुव्हर्स व कोल्हापूर आईस कोल्ड स्टोरेजच्या माध्यमातून लुटण्याचे काम केल्याचा आरोप पालकमंत्री सतेज पाटील यांनी केला. गोकुळचा आढावा घेतल्यानंतर डोळे चक्रावले असून संघाच्या पुर्वीच्या नेत्यांचा कारभार उत्तर कोरियाचे किंम जोंग उन यांच्यासारखा होता, अशी खरमरीत टीका ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली.

ठळक मुद्देटँकरमधून मिळणाऱ्या १३४ कोटीसाठीच महाडिकांचे ३:१३:२३ चे तुणतुणे : सतेज पाटील यापुर्वीच्या नेत्यांचा कारभार  किंम जोंग उन सारखा - हसन मुश्रीफ

कोल्हापूर : गोकुळच्या टँकरमधून वर्षाला मिळणाऱ्या १३४ कोटी वाचवण्यासाठीच महादेवराव महाडीक संघाच्या निवडणूकीत ३:१३:२३ तारखेचे तुणतुणे वाजवत होते. त्यांचा गोकुळमधील स्वार्थ लोकांसमोर आला असून अनेक वर्षे व्यंकटेश्वरा गुडस मुव्हर्स व कोल्हापूर आईस कोल्ड स्टोरेजच्या माध्यमातून लुटण्याचे काम केल्याचा आरोप पालकमंत्री सतेज पाटील यांनी केला. गोकुळचा आढावा घेतल्यानंतर डोळे चक्रावले असून संघाच्या पुर्वीच्या नेत्यांचा कारभार उत्तर कोरियाचे किंम जोंग उन यांच्यासारखा होता, अशी खरमरीत टीका ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली.गोकुळ शिरगाव येथील प्रकल्पावर सोमवारी गोकुळच्या वीस लाख लिटर अमृतकलश पूजन मंत्री मुश्रीफ व मंत्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

गोकुळचे संस्थापक आनंदराव पाटील-चुयेकर यांना अभिवादन करुन अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेतली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मंत्री मुश्रीफ म्हणाले, मागील संचालक मंडळाने एनडीडीबीचे कर्ज काढून २० लाख लिटरपर्यंत क्षमता वाढवली आणि नोकरभरती केली. हे सगळे पाहून डोळे चक्रावून गेले असून स्वर्गीय आनंदराव पाटील-चुयेकर यांच्या पुतळ्यासमोर शपथ घेऊन २० लाख लिटर दूध संकलनाच शिवधनुष्य उचलले आहे.

दीड वर्षापुर्वी जाता जाता २७५ कर्मचाऱ्यांची भरती केली, कायदा पायदळी तुडवून दोन महिन्याच्या प्रशिक्षणार्थी कालावधीतनंतर त्यांना कायम केले. सामाजिक जीवनात कार्यरत असताना असे उघड्यावर आपण काय करतो, खरेतर याची लाज कशी वाटत नाही. मागील संचालक मंडळ व त्यांच्या नेत्यांचा कारभार हा उत्तर कोरियाचे किंम जोंग उन पेक्षा कमी नव्हता.मंत्री पाटील म्हणाले, उत्पादकांना दोन रुपये जादा दर देणे हा आमचा अजेंडा आहे. संघाचा आर्थिक तोटा कमी करण्यासाठी टँकरचे दर कमी करणार आहे. पशुखाद्य कच्चा माल खरेदीत पारदर्शकता, त्याचे वितरण तालुकास्तरावर कसे होईल, वर्षाला तीन लाख लिटर दूध संकलन वाढ, याचे नियोजन केले आहे. राष्ट्रीय कृषी योजनेचे संघाचे ५० कोटी प्रलंबीत असून तेही लवकर देण्याचा प्रयत्न करु. 

टॅग्स :Gokul MilkगोकुळSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलHasan Mushrifहसन मुश्रीफkolhapurकोल्हापूर