महाडिक समर्थकांचे कोल्हापुरात प्रत्युत्तर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 00:29 IST2019-01-29T00:29:01+5:302019-01-29T00:29:07+5:30

कोल्हापूर : कागलच्या सभेत खासदार धनंजय महाडिक यांचे भाषण आमदार हसन मुश्रीफ यांच्या समर्थकांनी रोखल्याचे पडसाद सायंकाळी मुस्कान लॉनमध्ये ...

Mahadik supporters of Kolhapur reply | महाडिक समर्थकांचे कोल्हापुरात प्रत्युत्तर

महाडिक समर्थकांचे कोल्हापुरात प्रत्युत्तर

कोल्हापूर : कागलच्या सभेत खासदार धनंजय महाडिक यांचे भाषण आमदार हसन मुश्रीफ यांच्या समर्थकांनी रोखल्याचे पडसाद सायंकाळी मुस्कान लॉनमध्ये झालेल्या सभेत उमटले. या सभेत महाडिक समर्थकांनी त्यांचा जयघोष केला. त्याबद्दल पक्षाचे नेते अजित पवार व विरोधी पक्षनेते धनंजय महाडिक यांनीही समर्थकांना तराटणी दिली.
खासदार महाडिक यांचे समर्थक सभास्थळी दोन्ही बाजूला होते. व्यासपीठाच्या उजव्या बाजूला खासदार पुत्र पृथ्वीराज महाडिक यांच्या समवेत पन्नासभर कार्यकर्ते उभे होते. सभा सुरू झाल्यापासूनच त्यांच्या घोषणा सुरू होत्या. ‘कुठं बी हुडिक..मुन्ना महाडिक...’,‘कोण म्हणतंय येत नाही, आल्याशिवाय राहात नाही..’, ‘एकच खासदार मुन्नासाहेब...’, ‘आवाज कुणाचा.. मुन्नासाहेबांचा’, अशा घोषणांनी व शिट्ट्यांनी परिसर दणाणून गेला होता.
महाडिकांच्या भाषणावेळीही घोषणा सुरू राहिल्या. या घोषणा देणाऱ्यांव्यतिरिक्त अन्य कार्यकर्ते मात्र शांतपणे पाहात होते. त्यावेळी आमदार मुश्रीफदेखील उपस्थित होते.
अजित पवार बोलायला उभे राहिल्यावर त्यांनी सुरुवातीलाच मला शिट्ट्या आणि घोषणा दिलेल्या चालणार नाहीत. योग्य उमेदवार देण्याची पक्षाची जबाबदारी आहे. त्यामुळे तुम्ही शांतपणे सभा ऐकावी, अशी तराटणी दिली. त्यानंतर घोषणा बंद झाल्या.
मुंडे यांनीही ठेवले बोट
धनंजय मुंडे यांच्या भाषणावेळीही महाडिक समर्थक घोषणा देत होते. त्यावर त्यांनी एक उदाहरण दिले. ते म्हणाले, सध्या टीव्हीवर शंभुराजेंची मालिका लोकप्रिय झाली आहे. ही मालिका सुरू असताना मध्येच जर जाहिरात आली तर लोकांना त्याचा त्रास होतो. तसे तुमच्या घोषणांचे सुरू आहे, ते बंद करा.

Web Title: Mahadik supporters of Kolhapur reply