वडगाव बाजार समितीत समझोता एक्स्प्रेस सुसाट, सर्व जागा जिंकल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2021 12:20 PM2021-12-22T12:20:30+5:302021-12-22T19:55:44+5:30

सोसायटी गटातील ११ जागेवर विजयी संपादन करण्यास माजी आमदार महादेवराव महाडिक,आमदार डॉ. विनय कोरे, आमदार प्रकाश आवाडे यांच्या राजर्षी शाहू आघाडीस यश आले आहे

Mahadik ruling party in the Wadgaon market committee is on its way to victory | वडगाव बाजार समितीत समझोता एक्स्प्रेस सुसाट, सर्व जागा जिंकल्या

वडगाव बाजार समितीत समझोता एक्स्प्रेस सुसाट, सर्व जागा जिंकल्या

googlenewsNext

पेठवडगाव/सुहास जाधव 

बहुचर्चित वडगाव बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत पुन्हा एकदा महाडिक, कोरे,आवाडे यांच्या राजर्षी शाहू आघाडीने निर्विवाद सत्ता हस्तगत केली.या आघाडीचे सर्वच्या सर्व १८ जागेवर विजय संपादन केला.तर बाजार समितीवर प्रशासकीय मंडळ नेमणूकी पासून एकत्र आलेल्या महाविकास आघाडीने झुंज दिली.

तालुका कार्यक्षेत्र असलेल्या वडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची अटीतटीची निवडणूक झाली. बाजार समितीसाठी मंगळवारी ८० टक्के मतदान झाले होते. आज  महालक्ष्मी मंगलधाम येथे निवडणुक निर्णय अधिकारी डाॅ.प्रगती बागल, सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी मक्सुद शिंदी यांच्या मार्गदर्शना खाली सकाळी दहा टेबल वर मतमोजणीस सुरवात झाली.

मतमोजणीमध्ये पहिल्यांदा कृषी ,पंतसंस्था व बहुउद्देशीय सहकारी गटातील अकरा जागेसाठी मतमोजणीस सुरवात झाली.यामध्ये वडगाव, हातकणंगले,इचलकरंजी केंद्रांवरील १४९० मताची मोजणी करण्यात आली.यातील उमेदवार हे सरासरी तीनशे पेक्षा जास्त मताने विजयी झाले.तसे राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीच्या समर्थकांनी गुलाल व फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला.विशेष म्हणजे या आघाडीस पुर्ण बहुमत मिळाले.त्यानंतर मतमोजणीची औपचारिकता राहिली.

राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीचे विजयी उमेदवार असे : विकास सेवा        

संस्था गट - किरण जयसिंगराव इंगवले (९०६),विलास बाबासाहेब  खानविलकर(८९४)  , सुरेश तात्यासो पाटील (८८५),जगोंडा लक्ष्मण पाटील (८८२),शिवाजी पांडुरंग पाटील(८७९), आण्णासो बंडू डिग्रजे(८६५) , बाळकृष्ण गणपती बोराडे(८५६),भारती रावसो चौगुले(८९४),वैशाली राजेंद्र नरंदेकर (८६२),चाॅद बाबालाल मुजावर (८८२),धुळगोंडा आण्णासो डावरे(८६७), 

ग्रामपंचायत गट :  राजू मगदूम (४१०),सुनिता मनोहर चव्हाण (४०२),नितीन पांडुरंग कांबळे(४११),वसंतराव शामराव खोत(४२७), 

 अडते व्यापारी गट :  सागर सुनिल मुसळे(६६२),संजय बाबूराव वठारे(६६२), 

 हमाल व तोलाई गट : नितीन विष्णू चव्हाण (४३) 

महाविकास आघाडीचे पराभूत उमेदवार: 

विकास सेवा संस्था गट - गिरीश अरविंद इंगवले(५३८),श्रीकांत बापूसो चौगुले निकम(५२४),सुनील गणपती देशमुख (५२७),अर्जुन रंगराव पाटील (५११),उदय श्रीधर पाटील (५२३),सुहास महादेव पाटील (५०७),महादेव यशवंत भोसले(४८७), अपक्ष भुपाल विठू बाळाई(१७) यशोदा भगवान चौगुले(५३२),वैशाली शरद पाटील (५२६),सलिम बाबालाल महालदार (५७७),शिवाजी पांडुरंग वाघमोडे(५७८),अपक्ष भुपाल विठू बाळाई(११) 

 ग्रामपंचायत:  संभाजी शामराव पवार (३०५),सुकुमार बाळू चव्हाण (२९१),अपक्ष प्रताप उर्फ बंटी पाटील (७५),विश्वास दशरथ कुरणे(३१२), अपक्ष सुरेखा मनिषकुमार कांबळे(५९), पांडुरंग ज्ञानू पाटील (३५४), 

अडते व्यापारी गट : चंद्रकांत रामचंद्र तेली(५७८),राजेंद्र देवाप्पा मोकाशी (५६१), 

हमाल व तोलाई गट : सुखदेव भगवान माने(११) 


वडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या २५ वर्षात शेतकरी केंद्रबिंदु मानून काम केले आहे. यागोष्टीवरच विश्वास ठेवुन शेतकरी- व्यापारी यांनी मतांच्या रुपात राजर्षी शाहू आघाडीस सत्ता दिली आहे.पुढील काळात शेतक-यांच्या मालाला चांगला भाव  व बाजार समितीचा चांगल्या पध्दतीने विकास साधून शेतक-यांना सोयीसुविधामिळवून देण्यासाठी आमचे प्रयत्न असतील. - माजी आमदार अमल महाडीक(सत्ताधारी राजर्षी शाहु शेतकरी विकास आघाडी)

 


तालुक्यातील सभासद मतदारांनी आम्हाला दिलेला कौल आम्हाला मान्य आहे.तसेच महाआघाडीच्या सर्व सामान्य कार्यकर्त्यांनी दिलेला लढा नक्कीच कौतुकास्पद असून कार्यकर्त्यानी निराश न होवू नये.वडगाव बाजार समितीचा विकास व समितीला गतवैभव हेच आपले उद्दिष्ट आहे.सत्ते आलो नसलो तरी वडगाव बाजार समितीसाठी आम्ही सदैव कार्यरत राहणार - आमदार राजू आवळे ,महाआघाडी,पॅनेल

Web Title: Mahadik ruling party in the Wadgaon market committee is on its way to victory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.