शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

'शक्तिपीठ' विरोधात पुन्हा एल्गार; कोल्हापूरसह १२ जिल्ह्यांत सोमवारी महाधरणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2024 12:01 IST

संघर्ष समिती आक्रमक

कोल्हापूर : महायुती सरकार शक्तिपीठ महामार्गाला स्थगिती दिल्याचे सांगत आहे. मात्र, दुसऱ्या बाजूला सरकार मागच्या दाराने पर्यावरण विभागाकडे महामार्गाच्या मान्यतेचा प्रस्ताव पाठवून शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. या विषयात अधिवेशन दरम्यान १५ दिवसांत लोकप्रतिनिधींची बैठक घेणार असल्याचे सरकारने सांगितले होते. मात्र, अजून ती बैठकही झालेली नाही. म्हणून पुन्हा एकदा शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीतर्फे महामार्ग जाणाऱ्या १२ जिल्ह्यांतील जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर १२ ऑगस्टला महाधरणे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. शक्तिपीठ महामार्गासाठी आग्रही असणारा सरकारचा लाडका ठेकेदार कोण ? याचा शोध घ्यावा लागणार आहे, असा इशाराही त्यांनी दिला.संघर्ष समितीतर्फे शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, शक्तिपीठ महामार्ग अनावश्यक आहे. यामुळे १२ जिल्ह्यांतील शेतकरी बाधित होणार आहेत. ठेकेदाराच्या हितासाठी हा महामार्ग रेटला जात आहे. विरोधानंतर सरकार आम्ही शक्तिपीठ महामार्ग लोकांना सोबत घेऊन करणार असल्याचे सांगते. मात्र, प्रत्यक्षात महामार्ग करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला जात आहे. म्हणून बाधित जिल्ह्यातील शेतकरी १२ रोजी समितीच्या नेतृत्वाखाली महाधरणे आंदोलन करतील. शक्तिपीठ महामार्ग रद्द होईपर्यंत आमचा लढा सुरूच राहील. लढ्याची पुढील दिशा निश्चितीसाठी येथे राज्यव्यापी परिषद घेण्यासंबंधी विचारविनिमय सुरू आहे.पत्रकार परिषदेस गिरीश फोंडे, शिवाजी मगदूम, सम्राट मोरे, गोकुळ संचालक प्रकाश पाटील, के. डी. पाटील, शिवाजी कांबळे, प्रकाश पाटील, आनंदा पाटील, युवराज पाटील, नितीन मगदूम, तानाजी भोसले, युवराज शेटे, नवनाथ पाटील, कृष्णा भारतीय, श्रीपाद साळे, अजित बेले, आदी उपस्थित होते.

महाडिक लोकांसोबत नाहीतटोल माफी आंदोलनावरून माझ्यावर टीका करून आपण लोकांसोबत नाही हे दाखवून दिले, अशी टीका धनंजय महाडिक यांचे नाव न घेता आमदार पाटील यांनी केले. किणी टोल नाक्याची कागदपत्रे मिळाली की समजेल तो थर्ड पार्टी कोणाकडे चालवायला आहे, असेही सूचक विधान त्यांनी केले. टोल माफीसाठी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करायचे हे सरकारचे चुकीचे धोरण आहे. आम्ही तिथे होतो आमच्यावर का गुन्हे दाखल केले नाहीत, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरhighwayमहामार्गcongressकाँग्रेसagitationआंदोलन