शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात 'वंदे मातरम्'वर 10 तास चर्चा; PM मोदी सहभागी होणार...
2
“आमच्याकडे झालेल्या निवडणुका सर्वांत निष्पक्ष होत्या”; राहुल गांधींना मित्र पक्षाचा घरचा अहेर
3
डिजिटल अरेस्टवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; देशभरातील सर्व प्रकरणे CBI कडे सोपवली
4
“आयोगाने पारदर्शी, प्रामाणिकपणे...”; निवडणुका स्थगित होताच असीम सरोदेंनी केली मोठी मागणी
5
पोर्टेबल लॅब, टॉयलेट, पाणी, अदृश्य सेना...; कुठल्याही देशात जाताना काय काय सोबत घेऊन फिरतात पुतिन?
6
Video: Kiss घेण्याचा मोह...; प्रेमी जोडप्याचे मालगाडी खाली बसून 'नको ते' चाळे अन् अचानक... 
7
हृदयद्रावक! शेतीसाठी घेतलं १५ लाखांचं कर्ज पण पुराने पीक उद्ध्वस्त, शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळलं
8
Travel : मुंबईजवळची 'ही' ठिकाणं पाहिल्यावर गोवाही विसराल! न्यू इअर सेलिब्रेशनसाठी बेस्ट रोमँटिक डेस्टिनेशन्स
9
मामला 'गंभीर' है...! वारंवार बोलावूनही विजयाच्या जल्लोषात सहभागी झाला नाही कोहली, नेमकं घडलं काय? बघा Video
10
इम्रान खानवर पाकिस्तान सरकारची मोठी कारवाई! न्यूज चॅनेल्सना दिले आदेश, नेमकं काय घडतंय?
11
बाजार विक्रमी पातळीवरून घसरला! सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगाग बंद; ऑटो शेअर्सची मात्र कमाल!
12
“मतदानाला ४८ तास असताना निवडणुका स्थगित करणे अनाकलनीय, निवडणूक आयोग...”; काँग्रेसची टीका
13
VPN वापरताय? थांबा! आताच सावध व्हा; गुगलने दिलीय 'रेड अलर्ट' वॉर्निंग, बँक खातं होऊ शकतं रिकामी
14
“मीरा-भाईंदर मेट्रोचे डोंगरी कारशेड रद्द, लवकर अधिसूचना”; प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती
15
दत्त जयंती २०२५: तुम्ही ‘श्रीदत्त अथर्वशीर्ष’ म्हणता का? कायमची कृपा होते; पुण्य लाभते!
16
GST दरात कपात होऊनही तिजोरीत वाढ! नोव्हेंबरमध्ये १.७० लाख कोटी रुपये संकलन, पण, 'या' क्षेत्रात घट
17
नवरदेव नेसला साडी अन् नवरीची शेरवानी; आगळ्या-वेगळ्या लग्नाने वेधलं लक्ष, रंगली तुफान चर्चा
18
शेख हसीना पुन्हा बांगलादेशच्या पंतप्रधान होणार? मृत्यूदंडाची शिक्षा असतानाच हालचालींना वेग
19
सामन्यानंतर विराटला एक प्रश्न विचराला गेला, त्यानं बोलता बोलता BCCI अन् गौतम गंभीरवरच निशाणा साधला, स्पष्टच बोलला
20
VIRAL VIDEO : पाकिस्तानी व्लॉगरनं रशियन तरुणींना विचारला एक प्रश्न! त्यांनी जे उत्तर दिलं ऐकून फटक्यात झाला गप्प
Daily Top 2Weekly Top 5

‘महाआघाडी’त अध्यक्षपदाची लालसा आडवी

By admin | Updated: March 4, 2016 01:07 IST

गडहिंग्लज कारखाना निवडणूक : बैठकीत शिंदे-शहापूरकरांत चकमक; एकमेकांची उणीदुणी काढल्याने तणाव; सोमवारी पुन्हा बैठक

कोल्हापूर : गडहिंग्लज तालुक्यातील हरळी येथील आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या विरोधातील महाआघाडीच्या रचनेत गुरुवारी ‘अध्यक्ष’पदाची लालसा आडवी आली. त्यामुळे विरोधी महाआघाडीची रचना अपूर्ण राहिली. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सात, सात, पाच हा जागावाटपाचा दिलेला फॉर्म्युला झुगारून माजी अध्यक्ष अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे व डॉ. प्रकाश शहापूरकर हे बहुमतासाठीच्या जागेसाठी ठाम राहिले. परिणामी या दोघांत जागावाटपावर एकमत झाले नाही. या दोन मातब्बर नेत्यांना कारखान्याचे अध्यक्षपद आपल्याकडे हवे आहे. त्यामुळे बहुमत आपल्याकडेच असावे असे त्यांना वाटते. परिणामी सगळ््या घडामोडी बहुमताच्या आकड्याभोवतीच फिरत राहिल्या. येथील शासकीय विश्रामगृहात ही बैठक झाली. बैठकीदरम्यान अ‍ॅड. शिंदे व डॉ. शहापूरकर यांनी कारखान्याच्या राजकारणाच्या इतिहासातील एकमेकांची उणीदुणी काढली. कुरघोडी करीत टोलेबाजी केली. त्यामुळे दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. सुमारे तीन तास बैठक चालूनही शेवटी एकमत झाले नाही; त्यामुळे महाआघाडीची रचना आणि जागावाटप यांच्यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी सोमवारी (दि. ७) पुन्हा पालकमंत्री पाटील यांच्या उपस्थितीमध्ये येथील शासकीय विश्रामगृहात बैठक होणार आहे. कारखान्याच्या १९ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. २७ मार्चला मतदान होणार आहे. सध्या कारखाना राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांच्या ताब्यात आहे. मुश्रीफ यांना रोखण्यासाठी महाआघाडी करण्यासाठी शिवसेनेने पुढाकार घेतला आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीच्या सुरुवातीला पालकमंत्री पाटील म्हणाले, कारखान्यांच्या राजकारणात मला रस नाही. मात्र, सध्याची कारखान्यातील मुश्रीफ प्रवृत्ती रोखण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. त्यामुळे डॉ. शहापूरकर व अ‍ॅड. शिंदे यांनी प्रत्येकी सात जागा घ्याव्यात. उर्वरित पाच जागा शिवसेना, भाजप, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांना सोडाव्यात. या फॉर्म्युल्यावर एकमत करून महाआघाडी करावी. मी पूर्ण ताकदीनिशी मदत करीन. तुम्ही एकमेकांत भांडत बसला तर अडचणीत याल. पालकमंत्री पाटील यांनी हा फॉर्म्युला दिल्यानंतर अ‍ॅड. शिंदे व डॉ. शहापूरकर यांनी काहीवेळ जागांसंबंधी स्पष्टपणे आपली भूमिका उघड केली नाही. डॉ. शहापूरकर ‘ये नहीं चलेगी,’ ‘मागचा इतिहास वाईट आहे,’ अशी सूचक टोलबाजी करीत होते. एकमत न झाल्याने अर्ध्या तासाने पालकमंत्री पाटील हे ‘तुम्हीच जागावाटपाचे गणित जुळवा’ असे म्हणून उठून गेले. काही वेळानंतर मध्येच उठून गेलेले पालकमंत्री पाटील पुन्हा आले. त्यावेळी डॉ. शहापूरकर यांनी ‘माझ्या गटाला बारा जागा हव्यात,’ असे सांगितले. शिंदे यांनी किती जागा हव्यात हे स्पष्ट केले नाही तरी बहुमताची संख्या हवी, असे सुचविले. एकत्र बसून एकमत झाले नाही. त्यामुळे पालकमंत्री पाटील यांनी शहापूरकर, शिंदे, शिवसेनेचे विजय देवणे, संग्राम कुपेकर, भाजपचे बाबा देसाई, काँग्रेसचे (कै. राजकुमार हत्तरकी गट) उदय देसाई, वरदशंकर वरदापगोळ, मलगोंडा पाटील यांच्यासोबत स्वतंत्र बैठक घेतली. त्यानंतरही शहापूरकर आपल्या भूमिकेवर ठाम राहिले; पण जाता-जाता शहापूरकर यांनी बारामधील दोन जागा घटकपक्षांना सोडण्याची तयारी दर्शविली. कोणत्याही ठोस निर्णयाविनाच बैठक संपली.बैठकीस जिल्हा परिषदेचे सदस्य संजय मंडलिक, माजी आमदार संजय घाटगे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य गणपतराव डोंगरे, सुभाष शिरकोळे, अ‍ॅड. बाळासाहेब पाटील, वरदशंकर वरदापगोळ, अनिल खोत, विजय मगदूम, दिलीप माने यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.