कोल्हापूर : वाढती बेरोजगारी आणि सरकारी नोकरी मिळविण्याची संधी असल्याने दोन हजारांवर उच्चशिक्षितांनी पोलिस भरतीसाठी अर्ज केले आहेत. यात पारंपरिक एम.ए., एम.कॉम.सह, डी.एड., बी.एड., बी.टेक., एम.टेक., एम.बी.ए. झालेल्या उमेदवारांचाही समावेश आहे. आज, शुक्रवारी पहाटे पाचपासून ३०० पोलिसांच्या बंदोबस्तात पोलिस परेड ग्राऊंडवर मैदानी चाचणी प्रक्रियेला सुरुवात झाली. अनेक उमेदवारांनी गुरुवारी रात्रीच पोलिस मुख्यालयातील अलंकार हॉलमध्ये हजेरी लावली.जिल्हा पोलिस दलातील पोलिस शिपाई पदाच्या ८८ रिक्त जागांसाठी ६८५३ अर्ज आले आहेत. यात दोन हजारांपेक्षा जास्त उमेदवार उच्चशिक्षित आहेत. पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेऊनही नोकरी न मिळाल्याने ते पोलिस भरतीमध्ये आपले नशीब अजमावत आहेत. अभियांत्रिकी, फार्मसी, बीबीए, बीसीए, एमबीए असे व्यावसायिक शिक्षण घेतलेल्या उमेदवारांची संख्या लक्षणीय आहे. तसेच १२वी उत्तीर्ण उमेदवार सर्वाधिक आहेत.या उमेदवारांची मैदानी चाचणी शुक्रवारी पहाटेपासून सुरू झाली. पहिल्या दिवशी ७०० पुरुष उमेदवारांना मैदानी चाचणीसाठी बोलवले आहे. गुरुवारी सायंकाळपासूनच उमेदवार पोलिस मुख्यालयाकडे पोहोचू लागले होते. उमेदवारांना थांबण्यासाठी मुख्यालयातील अलंकार हॉलमध्ये पोलिसांनी व्यवस्था केली आहे.पोलिस अधीक्षकांकडून मैदानाची पाहणीपोलिस अधीक्षक योगेश कुमार यांनी गुरुवारी रात्री परेड ग्राउंडची पाहणी केली. तसेच बंदोबस्ताबद्दल अधिकाऱ्याना सूचना दिल्या. भरतीदरम्यान कोणताही गैरप्रकार सहन केला जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. बंदोबस्तावरील पोलिसांनाही पारदर्शकतेबद्दल खबरदारी घेण्याच्या सक्त सूचना दिल्या. उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी ११ टेबलांची व्यवस्था आहे. पहाटे पाच ते दुपारी बारापर्यंत प्रक्रिया चालेल, अशी माहिती पोलिस अधीक्षकांनी दिली.
वैद्यकीय मदत सज्जभरती प्रक्रियेदरम्यान उमेदवारांसाठी मैदानावर वैद्यकीय मदत सज्ज ठेवली आहे. उमेदवारांनी आपल्या क्षमता ओळखून सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करावा. मात्र, आपल्या प्रकृतीचीही खबरदारी घ्यावी, असे आवाहन पोलिस अधीक्षकांनी केले आहे. बीड येथे बुधवारी १६०० मीटर अंतर धावताना चक्कर येऊन पडून एका उमेदवाराचा मृत्यू झाला आहे. त्या घटनेच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय मदत सज्ज असल्याचे अधीक्षकांनी सांगितले.असा असेल बंदोबस्त
- पोलिस अधीक्षक - १
- अपर पोलिस अधीक्षक - २
- उपअधीक्षक - ६
- पोलिस निरीक्षक - १२
- सपोनि, उपनिरीक्षक - २८
- अंमलदार - २७०
Web Summary : Thousands of highly educated individuals, including graduates in MA, MCom, and MTech, are applying for police constable positions in Kolhapur due to rising unemployment. Physical tests have commenced with tight security and medical support.
Web Summary : बढ़ती बेरोजगारी के कारण कोल्हापुर में पुलिस कांस्टेबल पदों के लिए एम.ए., एम.कॉम., और एम.टेक. सहित हजारों उच्च शिक्षित उम्मीदवार आवेदन कर रहे हैं। कड़ी सुरक्षा और चिकित्सा सहायता के साथ शारीरिक परीक्षण शुरू हो गए हैं।