करंबळीच्या सैनिकांचे हरवलेले सोने भादवणच्या युवकाकडून प्रामाणिकपणे परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:30 IST2021-09-14T04:30:11+5:302021-09-14T04:30:11+5:30
पाटील यांनी सरपंच संजय पाटील यांच्याशी संपर्क साधला. दरम्यान, करंबळी यथील सैनिकाचे सोने पडल्याची चर्चा होती. मात्र, ...

करंबळीच्या सैनिकांचे हरवलेले सोने भादवणच्या युवकाकडून प्रामाणिकपणे परत
पाटील यांनी सरपंच संजय पाटील यांच्याशी संपर्क साधला. दरम्यान, करंबळी यथील सैनिकाचे सोने पडल्याची चर्चा होती. मात्र, शोधाशोध करूनही मिळाले नाही. त्यानंतर ग्रामस्थांनी करंबळी गावात माहिती दिली. त्यानंतर पन्हाळकर हे भादवण येथे आले. विश्वास सदाशिव पाटील यांनी दाखविलेल्या प्रामाणिकपणाबद्दल भादवण ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात येत आहे. जवान पन्हाळकर हे भारतीय सैन्यदलात नोकरीला आहेत. लडाखमध्ये सध्या त्यांची पोस्टिंग आहे.
ते कालच एक महिन्याच्या सुटीवर आले असून, आलेल्या दिवशी मित्राकडे भादवण येथे आले होते. विश्वास पाटील हे मुंबई येथे नोकरीनिमित असतात. वडील आजारी असल्याने गडहिंग्लज येथे त्यांच्या सेवेसाठी आले होते. ते गावात येत असताना रस्त्यात दागिने पडलेले दिसले. त्यांनी ते प्रामाणिकपणे परत केले. देशाची सेवा करणाऱ्या जवानाला मदत करता आली त्याचे एक वेगळेच समाधान मिळाले आहे असे पाटील यांनी सांगितले.
फोटो ओळी : भादवण (ता. आजरा) येथील विश्वास पाटील यांना सापडलेले सोने करंबळीच्या युवकास प्रामाणिकपणे परत केले. यावेळी सरपंच संजय पाटील.
क्रमांक : १३०९२०२१-गड-३१