शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

पोलिस असल्याची बतावणी करून लूटमार; आंतरराज्यीय टोळीस कोल्हापुरात अटक

By उद्धव गोडसे | Updated: September 20, 2023 16:57 IST

१८ गुन्ह्यांची उकल, ३३ तोळे दागिन्यांसह २४ लाखांचा मुद्देमाल जप्त

कोल्हापूर : पोलिस असल्याची बतावणी करून, तसेच जबरी चोरी आणि फसवणूक करणा-या आंतरराज्यीय टोळीस स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली. या टोळीने महाराष्ट्र आणि कर्नाटकात केलेल्या १८ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले असून, ३२८ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि दीड लाखांची रोकड पोलिसांनी हस्तगत केली.बागरअली अहमदअली (वय ३१, रा. परळी वैजनाथ, ता. परळी, जि. बीड), मुजाहीदअली मिस्कीलअली (वय ३४) आणि गुलामअली फरिद्दीन इराणी (वय ४०, रा. दोघे रा. बिदर, राज्य कर्नाटक) अशी अटकेतील तिघांची नावे आहेत. चौथा संशयित मुसौडीअली राजूअली (रा. परळी वैजनाथ) हा पसार झाला, अशी माहिती पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी बुधवारी (दि. २०) पत्रकार परिषदेत दिली.कागल येथील गणेश नगरमध्ये दोन सप्टेंबरला चोरट्यांनी एका वृद्धाला वाटेत अडवून त्यांच्याकडील सोन्याची चेन, अंगठी आणि साडेपाच हजार रुपयांची रोकड पळवली होती. त्याच दिवशी हुपरी येथे एका वृद्धास अडवून पोलिस असल्याची बतावणी करून चोरट्यांनी जबरदस्तीने त्यांच्याकडील अंगठी काढून घेतली होती. या दोन गुन्ह्यांचा तपास करताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला संशयित इराणी टोळीची माहिती मिळाली. या टोळीतील संशयित तावडे हॉटेल परिसरात येणार असल्याची माहिती मिळताच, पथकाने सापळा रचून तिघांना अटक केली. अधिक चौकशीत त्यांनी जिल्ह्यात जबरी चोरीचे सात, पोलिस बतावणीचे सहा, फसवणुकीचे तीन, तर दुचाकी चोरीचे दोन गुन्हे केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीतील दोन दुचाकींसह ३२८ ग्रॅम सोन्याचे दागिने असा सुमारे २४ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. या टोळीकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस