शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
2
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
3
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
4
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
5
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
6
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
7
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
8
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
9
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
10
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
11
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
12
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
13
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
14
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
15
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
16
पार्थ अजित पवार जमीन प्रकरणात शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “समाजासमोर वास्तव...”
17
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...
18
उपाशी ठेवलं, बेदम मारलं... पोटच्या लेकाने, सुनेने जमिनीसाठी केले जन्मदात्या आईचे हालहाल
19
"वहिनी, तुमची जोडी जमत नाही, हे काका कोण?", रील्सचं वेड, सर्वस्व असलेल्या नवऱ्याच संपवलं
20
Viral Video: मिरची पूड घेऊन ज्वेलर्समध्ये शिरली, पण प्लॅन फसला! दुकानदारानं २० वेळा थोबाडलं

मल्टिप्लेक्सच्या दरात पाहा गैरसोयींचे नाटक..!

By admin | Updated: February 9, 2015 23:57 IST

प्रेक्षकांना वाली कोण? : शासकीय अधिकाऱ्यांकडून नियम बॅकस्टेजला ठेवून परवाने विक्रीस

अविनाश कोळी -सांगली --आलिशान सेवा-सुविधांचा लाभ देणाऱ्या मल्टिप्लेक्सच्या दरातच नाट्यरसिकांना गैरसोयींचे नाटक गेल्या कित्येक वर्षांपासून अनुभवावे लागत आहे. शासनाने प्रेक्षकांच्या सेवा-सुविधांसाठी, सुरक्षेसाठी आखून दिलेले नियम बॅकस्टेजला ठेवून नाट्यगृह व्यवस्थापनांनी सेवा-सुविधांच्या आभासात्मक नाटकाचे प्रयोग सुरू ठेवले आहेत. नियमांच्या पालनाची जबाबदारी ज्यांच्यावर सोपविली आहे, ते अधिकारीही या प्रयोगात महत्त्वाची भूमिका साकारत असल्याने रसिकप्रेक्षकांना वालीच उरला नाही. मस्त वातानुकूलित यंत्रणा, आलिशान व आरामदायी खुर्च्या, सुटसुटीत आसनव्यवस्था, प्रसाधनगृहे, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, अग्निशमन प्रतिबंधक उपाययोजना, उपाहारगृह, प्रशस्त परिसर, स्वच्छता, जागोजागी लावलेले माहितीफलक अशा गोष्टींनी सज्ज असलेल्या मल्टिप्लेक्स थिएटरचा जमाना आपल्याकडे आला आहे. सांगली, मिरजेतील प्रेक्षकांना आता अशा सिनेमागृहांची सवयही झाली आहे. जादा पैसे मोजून सुविधांचा लाभ घेण्याकडे त्यांचा कल दिसून येतो. अशा स्थितीत मल्टिप्लेक्स थिएटरच्या दराएवढेच पैसे मोजून नाटक पाहायला जाणाऱ्या प्रेक्षकांचा अपेक्षाभंग झाला तर नवल वाटणार नाही. केवळ रंगभूमीवरचे प्रेम म्हणूनच रसिकप्रेक्षकांनी गैरसोयींकडे दुर्लक्ष करीत नाट्यगृहांची वाट धरली आहे. रसिकांची सहनशीलता संपली की नाट्यगृहांना रसिकांसाठी ‘जोहार’ घालावा लागेल, हे निश्चित. तिकिटाचा दर हा सेवा-सुविधांवर अवलंबून असायला हवा. सेवा-सुविधांचा अंतर्भाव करूनच मल्टिप्लेक्सचे दर निश्चित केले जातात. दुसरीकडे कमी सुविधा असलेल्या एकपडदा सिनेमागृहांचे तिकीट दर कमी असतात. नाट्यगृहांचे तिकिटाचे गणित हे सेवा-सुविधांवर कधीच अवलंबून नसते.प्रिमायसेस परवान्यापुरतेच नाट्यगृहांचे दुखणे मर्यादित नाही. त्यामुळे या परवान्याच्या नूतनीकरणाअभावी जिल्हा प्रशासनाने दिलेल्या नोटिसा या प्रशासकीय औपचारिकतेचा एक भाग मानला जात आहे. जुजबी उपाययोजनांच्या सूचना देऊन अधिकाऱ्यांनी नाट्यगृहांचे व्यवस्थापन करणाऱ्या संस्थांना पाठबळ दिले आहे.नियम केवळ कागदावरच महाराष्ट्र चित्रपटगृह (विनियमन) नियम १९६0, १९६६ मध्ये परवान्यांसाठीचे निकष, सिनेमागृह, नाट्यगृह, टुरिंग टॉकीज यांच्यासाठीच्या अटी देण्यात आल्या आहेत. त्यांचे पालन होते की नाही, याची पाहणी आजवर कोणीही केली नाही. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर करमणूक कर निरीक्षक आणि सहायक करमणूक कर अधिकारी यांच्या जबाबदाऱ्यांची माहिती दिली आहे. करमणूक केंद्रांना भेट देणे, अनधिकृत करमणूक केंद्रांचा शोध घेऊन कर वसुली करणे, करामध्ये होत असलेल्या नुकसानीची माहिती तयार करणे, अशा अनेक जबाबदाऱ्या त्यांच्यावर सोपविण्यात आल्या आहेत. या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडल्या असत्या, तर अनेक वर्षांपासून नाट्यगृहांचे परवाना नूतनीकरण थांबले नसते.