‘लोकमत’चा दणका : राज्यभरातील रेशनवरील धान्य पूर्ववत वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 16:48 IST2019-05-11T16:46:48+5:302019-05-11T16:48:56+5:30
सर्व्हर डाऊनमुळे राज्यातील ५२ हजार ३८३ रेशन दुकानांमधील पॉस मशीन बंद असल्याने रेशनवरील धान्य विक्री गेल्या चार दिवसांपासून बंद होती. याबाबत शनिवारी ‘ राज्यभरातील रेशनवरील धान्य विक्री ठप्प’ या आशयाचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिध्द झाले. यामुळे खडबडून जागे झालेल्या पुरवठा विभागाकडून हालचाली होऊन पॉस मशिन शनिवारपासून पुर्ववत सुरु झाली. सर्व्हरची थोडी गती कमी असली तरी दोन दिवसात ते वाढण्याची शक्यता आहे.

गेल्या चार दिवसांपासून बंद असलेली पॉस मशिन शनिवारपासून पुर्ववत सुरु झाल्याने रेशनवर धान्य घेण्यासाठी कोल्हापूरातील राजारामपुरी, राजेंद्रनगर येथील दुकानांमध्ये झालेली ग्राहकांची गर्दी.
कोल्हापूर : सर्व्हर डाऊनमुळे राज्यातील ५२ हजार ३८३ रेशन दुकानांमधील पॉस मशीन बंद असल्याने रेशनवरील धान्य विक्री गेल्या चार दिवसांपासून बंद होती. याबाबत शनिवारी ‘ राज्यभरातील रेशनवरील धान्य विक्री ठप्प’ या आशयाचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिध्द झाले. यामुळे खडबडून जागे झालेल्या पुरवठा विभागाकडून हालचाली होऊन पॉस मशिन शनिवारपासून पुर्ववत सुरु झाली. सर्व्हरची थोडी गती कमी असली तरी दोन दिवसात ते वाढण्याची शक्यता आहे.
पॉस मशिन बंद असल्याने गेल्या चार दिवसांपासून ग्राहकांना रेशनवर गहू, तांदूळ, डाळ मिळालेली नाही. त्यामुळे ग्राहकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. धान्य मिळत नसल्याने गैरसमजातून ग्राहक व रेशन दुकानदार यांच्यामध्ये वादावादीचे प्रकारही घडले. त्यामुळे दुकानदारसंघटनांच्या प्रतिनिधींनी थेट राज्याच्या पुरवठा विभागाशी संपर्क साधला, परंतु तेथूनही प्रतिसाद मिळाला नाही.
परंतु ‘लोकमत’मधील वृत्तानंतर खडबडून जागे झालेल्या पुरवठा विभागाने हालचाली गतीमान करुन ही मशिन सुरु केली. राज्यातील सर्वच ठिकाणी शनिवारपासून पॉस मशिन सुरु होऊन रेशनवर धान्य पुरवठा पुर्ववत सुरु झाल्याने ग्राहकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. असे असली तरी काही ठिकाणी सर्व्हरची गती अजूनही धिमी आहे. येत्या दोन दिवसात ती ही वाढून पुर्ववत होईल, असे सुत्राकडून सांगण्यात आले.
सर्व्हर डाऊनमुळे राज्यभरातील पॉस मशीन बंद असल्याने रेशनवरील धान्य विक्री पूर्णपणे बंद होती. याबाबत पुरवठा विभागाशी संपर्क साधूनही त्यांनी याकडे कानाडोळा केला. परंतु ‘लोकमत’मधून राज्यस्तरीय वृत्त प्रसिध्द झाल्याने खडबडून जागे झालेल्या पुरवठा विभागाने ही मशिन सुरु केली आहेत. त्यामुळे शनिवारपासून राज्यातील पॉस मशिन सुरु होऊन रेशन दुकानांमधून धान्य वितरण सुरु झाले आहे.
-चंद्रकांत यादव,
राज्य प्रवक्ते, रेशन बचाव समिती