‘लोकमत’ची आज नाईट दुचाकी रॅली; सहभागाचे आवाहन : जागर स्त्रीशक्तीचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2019 01:00 IST2019-10-18T00:59:05+5:302019-10-18T01:00:23+5:30
स्त्रीशक्तीचा जागर करण्यासाठी लोकमत ‘सखी मंच’ने शहरातील सर्व तरुणी, महिला, महिला संस्थांना ‘निर्भया नको - निर्भय बना,’ असे आवाहन केले आहे. यावेळी कोल्हापूर शहरातील विविध क्षेत्रांत कार्यरत असणाऱ्या ‘सखीं’चा सन्मानही करण्यात येणार आहे.

‘लोकमत’ची आज नाईट दुचाकी रॅली; सहभागाचे आवाहन : जागर स्त्रीशक्तीचा
कोल्हापूर : महिलांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी ‘लोकमत’ने आज, शुक्रवारी नाईट दुचाकी रॅलीचे आयोजन केले आहे. या उपक्रमासाठी महिला आणि युवतींचा मोठा प्रतिसाद मिळत असून, इतरांनाही या अनोख्या उपक्रमामध्ये सहभागी होण्याचे आवाहन ‘लोकमत’ने केले आहे.
प्रत्येक स्त्रीसाठी तिचं शहर सुरक्षित असलं पाहिजे. कुठल्याही वेळी शहरात फिरताना स्त्रीला सुरक्षित वाटलं पाहिजे. यासाठी लोकमत ‘सखी मंच’ने आज, शुक्रवारी सायंकाळी सात ते रात्री नऊ या वेळेत क्रोमा स्टोअर, स्टार बझार येथे महिला व युवतींसाठी नाईट दुचाकी रॅलीचे आयोजन केले आहे. क्रोमा स्टोअर हे या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक आहेत. कार्यक्रमासाठी रेडिओ पार्टनर ९२.७ बिग एफ एम - ‘धून बदल के तो देखो’ हे आहेत.
कोल्हापूर हे आई अंबाबाईचे शक्तिपीठ आहे. स्त्री हे शक्तीचे रूप आहे. स्त्रीला शहरात सुरक्षित व निर्भय वाटण्यासाठी वातावरण तयार करणे, ही प्रत्येक समाजाची जबाबदारी आहे.
स्त्रीशक्तीचा जागर करण्यासाठी लोकमत ‘सखी मंच’ने शहरातील सर्व तरुणी, महिला, महिला संस्थांना ‘निर्भया नको - निर्भय बना,’ असे आवाहन केले आहे. यावेळी कोल्हापूर शहरातील विविध क्षेत्रांत कार्यरत असणाऱ्या ‘सखीं’चा सन्मानही करण्यात येणार आहे. शहरातील प्रमुख मार्र्गांवरून निघणाºया रॅलीला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे नावनोंदणी व अधिक माहितीसाठी ९७३००७४०२२ या क्रमांकावर संपर्क साधावा.
दुचाकी रॅलीचे पायलटिंग करणार ‘डॅग’ पायलट्स
रॅलीतील महिलांच्या मदतीसाठी रॅली मार्गावर पायलट्सच्या वतीने पायलटिंग सुविधा देण्यात येणार आहे. रॅलीमार्गावर अन्य वाहतूक सुरळीत करणे, महिलांच्या वाहनांना वाट मोकळी करून देणे व रॅली नियोजित मार्गावरून शिस्तबद्ध जावी यासाठी ते दिशा देणार आहेत. यासाठी ‘डॅग’तर्फे १५ पायलट्स रॅलीमार्गावर सज्ज राहणार आहेत. यामुळे रॅलीत सहभागी होणाºया महिलांचा हा प्रवास सुखकर होणार आहे.
‘सहस्रम’चा रॉक बॅँड
रॅलीपूर्वी ‘सखी’ सदस्यांसाठी कलाविष्कार कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. रॅलीमध्ये सहभागी न होणाºया ‘सखी’ या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकतात. चंद्रकांत पाटील आणि ग्रुपच्या कलाकारांचा नृत्याविष्कार, ढोलपथक, आकर्षक आतषबाजी असे या कार्यक्रमाचे आकर्षण राहणार आहे.
भेटवस्तू जिंकण्याची संधी !
क्रोमा स्टोअरला आज सकाळी १० ते ५ या वेळेत भेट द्या, गेम खेळा व जिंका आकर्षक भेटवस्तू !
रॅलीचा मार्ग
नाईट बाईक रॅलीला क्रोमा स्टोअर, स्टार बझार येथून सुरुवात होईल. तेथून ताराराणी पुतळा, दाभोळकर कॉर्नर, व्हीनस कॉर्नर, टायटन शोरूम,
उमा टॉकीज चौक, पार्वती मल्टिप्लेक्स, जयराज पेट्रोल पंप, शाहू मिल चौक, आग्नेयमुखी मारुती मंदिर, खरे मंगल कार्यालय, टाकाळा चौक, क्रोमा स्टोअर, स्टार बझार असा रॅलीचा मार्ग राहील.