शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Lokmat Kolhapur Maha Marathon 2018 : अंध अमरजितसिंग यांचा शतकोत्तर मॅरेथॉन धावण्याचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 18:26 IST

दोन्ही डोळ्यांनी पूर्णत: दिसत नसतानाही नाशिक, औरंगाबाद व नागपूर येथे आयोजित केलेल्या लोकमत महामॅरेथॉनमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झालेले ६२ वर्षांचे अमरजितसिंग चावला हे  रविवारी होणाऱ्या महामॅरेथॉनमध्ये २१ किलोमीटरच्या स्पर्धेत धावणार आहेत.

ठळक मुद्देअंध अमरजितसिंग यांचा शतकोत्तर मॅरेथॉन धावण्याचा निर्धार८३ अर्धमॅरेथॉन सहजरीत्या पूर्ण चावला यांचे १०१ अर्धमॅरेथॉन पूर्ण करणे लक्ष्य

कोल्हापूर : दोन्ही डोळ्यांनी पूर्णत: दिसत नसतानाही नाशिक, औरंगाबाद व नागपूर येथे आयोजित केलेल्या लोकमत महामॅरेथॉनमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झालेले ६२ वर्षांचे अमरजितसिंग चावला हे  रविवारी होणाऱ्या महामॅरेथॉनमध्ये २१ किलोमीटरच्या स्पर्धेत धावणार आहेत.मूळचे मुंबईकर असलेल्या अमरजितसिंग चावला यांनी नागपूर येथे झालेली २१ किलोमीटर अर्धमॅरेथॉन पूर्ण करीत उपस्थितांचे लक्ष वेधले होते. वयाच्या ४९ व्या वर्षी अर्धमॅरेथॉनमध्ये सहभागी झाल्यापासून त्यांनी आतापर्यंत ८३ अर्धमॅरेथॉन सहजरीत्या पूर्ण केल्या आहेत. यासह दहावेळा पुणे मॅरेथान व तीनवेळा अल्ट्रा रन (दीर्घ धावणे) पूर्ण तसेच ४९ वेळा १० किलोमीटर शर्यत पूर्ण करणारे चावला यांचे लक्ष्य १०१ अर्धमॅरेथॉन पूर्ण करणे हे आहे.बीब कलेक्शनसाठी आलेले चावला एस्कॉर्ट असलेले युवा लाझर नाडर व डॉ. अमितसिंग माने यांच्यासह कोल्हापुरात दाखल झाले. याबाबत बोलताना धावपटू चावला म्हणाले, कोल्हापुरातील ‘लोकमत’ची ही माझी ८४ वी मॅरेथॉन आहे. वयाच्या तेराव्या वर्षी ‘मॅकेलर डिजनरेशन’ या असाध्य आजाराने माझी दृष्टी कमी आली. त्यानंतर ४०व्या वर्षी मला दोन्ही डोळ्यांना दिसणे पूर्णत: बंद झाले. यावर मी जीवनात हरलो नाही.

आयुष्यात काहीतरी करण्यासाठी माझे मन मला काही स्वस्थ बसू देईना. २००५ साली वयाच्या ४९व्या वर्षी मी एका शर्यतीत सहभाग घेतला आणि ती पूर्णही केली. त्यानंतर मी मागे बघितले नाही. ‘लोकमत सर्किट रन’च्या रूपाने हा उपक्रम सर्वांना धावण्याची सवय लावण्यासारखा आहे. तुम्हीही सवय लावून घ्या. मला शंभरपेक्षा अधिक मॅरेथॉनमध्ये धावायचे आहे.

 

रन फॉर लाईफमाणसाच्या शरीराला व्यायाम नसेल तर त्याचे जीवन व्यर्थ आहे. परिणामी त्या व्यक्तीला अनेक व्याधींना सामोरे जावे लागते; म्हणून प्रत्येकाने जीवनात व्यायाम करणे आवश्यक नव्हे, तर सक्तीचे आहे. त्यात धावणे हा स्वस्तातील व्यायाम आहे. स्वास्थ्य उत्तम तर सर्व जीवन सुरळीत होते. त्यामुळे जगण्यासाठी धावणे आवश्यक आहे. ‘लोकमत महामॅरेथॉन’ ही करवीरकरांना मोठी पर्वणी ठरली आहे. हीच ‘लोकमत’ची क्रीडासंस्कृती चिरकाल राहो.-तिरूपती काकडे,अतिरिक्त पोलीस अधीक्षक 

 

टॅग्स :Lokmat Kolhapur Maha Marathon 2018लोकमत कोल्हापूर महामॅरेथॉन २०१८kolhapurकोल्हापूर