शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
3
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
4
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
5
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
6
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
7
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
8
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
9
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
10
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
11
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
12
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
13
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
14
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
15
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
16
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
17
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
18
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
19
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
20
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"

Lok Sabha Election 2019 : प्रचार लोकसभेचा पेरणी विधानसभेची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 11:41 AM

राजाराम लोंढे कोल्हापूर : जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघांत प्रचाराने गती घेतली असून सभांच्या माध्यमातून वातावरणनिर्मितीही सुरू झाली आहे. लोकसभेच्या ...

ठळक मुद्देLok Sabha Election 2019 : प्रचार लोकसभेचा पेरणी विधानसभेचीविद्यमान आमदारांसह इच्छुक सरसावले : चिन्ह बिंबवण्याची संधी

राजाराम लोंढेकोल्हापूर : जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघांत प्रचाराने गती घेतली असून सभांच्या माध्यमातून वातावरणनिर्मितीही सुरू झाली आहे. लोकसभेच्या रिंगणातील उमेदवार ताकदीने प्रचारात उतरले आहेतच, पण विद्यमान आमदारांसह इच्छुकांनी या प्रचारातून विधानसभेची पेरणी सुरू केली आहे. पावसाळा संपताच विधानसभेचे बिगुल वाजणार असल्याने प्रचारावर मर्यादा येणार आहेत. त्यामुळे आतापासूनच मतदारसंघात वातावरणनिर्मिती करून लोकांच्या मनावर चिन्ह बिंबवण्याची संधी मिळाली आहे.लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी शमते न शमते तीच विधानसभेची तयारी सुरू होणार आहे. २३ मेला लोकसभेचा निकाल लागून मे महिन्याच्या अखेरीस केंद्रातील सरकार सत्तेवर बसेल. महिन्याभरात विधानसभेची तयारी सुरू होईल आणि साधारणता आॅगस्टच्या शेवटच्या आठवड्यात विधानसभेची आचारसंहिता लागेल.

आपल्याकडे तीन महिने जोरदार पाऊस असल्याने प्रचारयंत्रणेवर मर्यादा येतात. ‘घर टू घर’ संपर्क ठेवता येत नाही, विशेषत: दुर्गम वाड्या-वस्त्यांवर राबता ठेवता येत नाही. त्यामुळे लोकसभेच्या प्रचाराच्या माध्यमातून आतापासूनच संपर्क ठेवला तर पुढे थोडे सोपे जाईल, असा व्होरा असल्याने विद्यमान आमदारांसह इच्छुकांनी मतदारांपर्यत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून पक्षाचे ‘चिन्ह’ मतदारांपर्यंत पोहोचवण्याची संधी त्यांना मिळाली आहे.चंद्रदीप नरके, प्रकाश आबिटकर, राजेश क्षीरसागर, सत्यजित पाटील, उल्हास पाटील, सुजित मिणचेकर या शिवसेनेच्या तर हसन मुश्रीफ, संध्यादेवी कुपेकर या राष्ट्रवादीच्या आमदारांची ही रंगत तालीमच राहणार आहे. थेट पक्षाचे चिन्ह घेऊन ही मंडळी लोकांसमोर जाणार असल्याने येथे कोण किती पाण्यात आहे, याचा अंदाज येणार आहे तर सुरेश हाळवणकर, अमल महाडिक, शिवाजीराव नाईक, जयंत पाटील यांचे सध्याचे प्रचाराचे चिन्ह आणि विधानसभेचे वेगळे असल्याने केवळ संपर्क हाच त्यांचा फायदा होणार आहे.

या संपर्क मोहिमेचा फायदा उठवण्यासाठी याच मतदारसंघांतील विरोधी इच्छुकांनीही कंबर कसली आहे; पण मित्रपक्षाच्या उमेदवाराचे चिन्ह एक आणि आपले विधानसभेचे चिन्ह दुसरे, असे त्रांगडे पी. एन. पाटील, सतेज पाटील, भरमूअण्णा पाटील, राजू आवाळे, राजीव आवळे, राजेंद्र पाटील-यड्रावकर, विनय कोरे, मानसिंगराव नाईक, प्रकाश आवाडे यांचे झाले आहे तर के. पी. पाटील, ए. वाय. पाटील यांना चिन्ह पोहोचवण्याची चांगली संधी मिळाली आहे.

यांना होणार थेट फायदा- चंद्रदीप नरके, प्रकाश आबिटकर, राजेश क्षीरसागर, सत्यजित पाटील-सरूडकर, उल्हास पाटील, डॉ. सुजित मिणचेकर, हसन मुश्रीफ, संध्यादेवी कुपेकर.यांचे झाले त्रांगडे - सुरेश हाळवणकर, अमल महाडिक, जयंत पाटील, शिवाजीराव नाईक, पी. एन. पाटील, सतेज पाटील, भरमूअण्णा पाटील, राजू आवाळे, राजीव आवळे, राजेंद्र पाटील-यड्रावकर, विनय कोरे, मानसिंगराव नाईक, प्रकाश आवाडे. 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकkolhapurकोल्हापूर