शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
4
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
5
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
6
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
7
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
8
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
9
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
10
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
11
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
12
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
13
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
14
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
15
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
16
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
17
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
18
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
19
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
20
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...

Lok Sabha Election 2019 लोकशाही धोक्यात असल्याने आघाडीसोबत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 01:08 IST

हातकणंगले : शेतकऱ्यांच्या सर्वच प्रश्नांवर मोदी सरकारला घेरल्यामुळे दिल्लीवरून आदेश आल्याने शासकीय यंत्रणेला हाताशी धरून माझ्याविरुद्ध गुन्हे दाखल करून ...

हातकणंगले : शेतकऱ्यांच्या सर्वच प्रश्नांवर मोदी सरकारला घेरल्यामुळे दिल्लीवरून आदेश आल्याने शासकीय यंत्रणेला हाताशी धरून माझ्याविरुद्ध गुन्हे दाखल करून भाजपतील नेतेमंडळी माझ्या सर्व हालचालींवर लक्ष ठेवत आहेत. सर्वसामान्य जनता माझ्या पाठीशी आहे. माझी चळवळ वंचित, दलित, शोषित आणि शेतकऱ्यांसाठी आहे. संविधान व लोकशाही धोक्यात असल्यामुळे मी महाआघाडीसोबत आहे, असे मत खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केले.हातकणंगले येथील नेहरू चौकात आयोजित केलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. छत्रपती ग्रुपचे प्रमोद पाटील यांनी सहकाऱ्यांसह राजू शेट्टी यांना पाठिंबा जाहीर केला.खा. शेट्टी यांनी मोदी सरकारने कर्जमुक्ती, शेतकºयांच्या शेतमालाला हमीभाव यासह सर्वच शेतकºयांच्या प्रश्नांवर दिलेली आश्वासने पाळली नसल्यामुळे सर्व शेतकरी संघटना एकत्र करून आवाज उठवला म्हणून दिल्लीवरून आदेश आल्यामुळे भाजप नेते बिथरले आहेत. ते माझ्या चुका आणि हालचालींवर लक्ष ठेवून आहेत. मात्र, ५६ पक्षांची आमची महाआघाडी माझ्या भक्कम पाठीशी आहे असे मत व्यक्त केले.प्रमोद पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी लोकसभेमध्ये प्रथम राजू शेट्टी यांनी आवाज उठवला. शरद पवारांनंतर खासदार शेट्टी यांनीच शेतकºयांसाठी लढा उभा केला. शेतकरी जगला तर देश आहे. शेतकरी चळवळीचा नेता म्हणून आम्ही राजू शेट्टी यांच्याबरोबर राहणार असल्याचे सांगितले.यावेळी काँग्रेसचे राजू आवळे, हातकणंगलेचे माजी सरपंच अजित पाटील, गुंडा इंरकर, रोहीत मलमे, हातकणंगले तालुका काँग्रेस अध्यक्ष भगवान जाधव आदींनी मत व्यक्त केले. यावेळी भगवान काटे, राहुल आवाडे, संदीप कारंडे, अरुण जानेवकर, दीपक वाडकर, सुदेश मोरे, राजेश पाटील, जयकुमार कोले, बाळगोंडा पाटील, बाबासाहेब चौगुले, मिश्रीलाल जाजू, अ‍ॅड. सुरेश पाटील, आप्पा ऐडके, अमित पाटील, वैभव कांबळे आदी उपस्थित होते.भाजप सरकारची केवळ घोषणाबाजीकाँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे म्हणाले, भाजप सरकारविरुद्धजनतेच्या मनात प्रचंड चीड आहे. गोरगरिबांना पाच वर्षे कागदपत्रांसाठी रांगेत उभा केले. त्यामुळे जनता खवळून उठली आहे. हे सरकार घोषणाबाज आहे. थापा मारणारे आहे.सर्व पातळींवर अपयशी ठरलेले हे सरकार आता जाणार आहे. म्हणून जातीयवादी राजकारण सुरू आहे. मात्र, कष्टकºयांच्या चळवळीमध्ये रस्त्यावर उतरणाºया राजू शेट्टींसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडी ताकतीने काम करत आहे. सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये इर्ष्या सुरू आहे ती कोणत्या मतदारसंघात राजू शेट्टींना लिड मिळणार यासाठी.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक