शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur- एएस ट्रेडर्स फसवणुकीचा मुख्य सूत्रधार लोहितसिंग सुभेदार अखेर जेरबंद, गुंतवणूकदारांना सुमारे तीन हजार कोटींचा घातला गंडा

By उद्धव गोडसे | Updated: September 19, 2023 18:43 IST

गणपतीच्या दर्शनासाठी येताच पोलिसांच्या जाळ्यात अडकला, आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई

कोल्हापूर : गुंतवणूकदारांची सुमारे तीन हजार कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेला एएस ट्रेडर्स कंपनीचा प्रमुख आणि फसवणुकीचा मुख्य सूत्रधार लोहितसिंग धर्मासिंग सुभेदार (रा. पलूस, जि. सांगली) याला अखेर पोलिसांनी जेरबंद केले. आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने मंगळवारी त्याला कोल्हापूर जिल्हयातून अटक केली. या कारवाईमुळे गुन्हे दाखल असलेले अन्य संचालक आणि एजंटचे धाबे दणाणले आहेत.कमी कालावधीत भरघोस परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूक करून घेतलेली कोट्यवधी रुपयांची रक्कम ए एस ट्रेडर्स कंपनीने गुंतवणूकदारांना परत केली नाही. ऑक्टोबर २०२२ पासून परतावे मिळणे बंद झाल्याने गुंतवणूकदारांनी पोलिसात धाव घेतली. नोवहेंबर २०२२ मध्ये शाहूपुरी पोलिस ठाण्यात ए एस ट्रेडर्स कंपनीसह २७ संचालक आणि एजंटवर गुन्हे दाखल झाले. तेव्हापासून कंपनीचा प्रमुख आणि फसवणुकीच्या मुख्य सूत्रधार लोहितसिंग सुभेदार अटक टाळण्यासाठी धावपळ करीत होता. सर्वोच्च न्यायालयानेही त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्याने स्वतःहून पोलिसात हजार होणार असल्याची माहिती ऑनलाइन मीटिंगद्वारे गुंतवणूकदारांना दिली होती. मात्र, त्यानंतरही तो पोलिसांपासून पळ काढत होता. गणपतीचे दर्शन घेण्यासाठी तो मंगळवारी कोल्हापूर जिल्हयात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेने गेल्या चार महिन्यांपासून या गुन्ह्यांतील नऊव्या संशयितास अटक केली. मुख्य सूत्रधाराच्या अटकेमुळे आता अन्य संचालक आणि संशयितही लवकरच हाती लागतील अशी माहिती पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस