शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सरोगसीसाठी हवी स्थानिक समिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2016 00:40 IST

व्यावसायिकीकरण रोखण्यासाठी धोरण : गरजूंवर अन्याय होण्याची शक्यता

कोल्हापूर : सरोगसीद्वारे होणारे मातृत्वाचे व्यावसायिकीकरण रोखण्यासाठी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या धोरणात ‘सरोगेट मदर’ ही नात्यातील असावी व एक मूल असलेल्या दाम्पत्यांना सरोगसीद्वारे दुसरे मूल जन्माला घालता येणार नाही, अशी तरतूद आहे. मात्र या तरतुदीमुळे अपत्याची गरज असलेल्या व्यक्तींवर अन्याय होण्याची शक्यता आहे. तो होऊ नये यासाठी स्थानिक पातळीवर शासकीय समितीची नेमणूक होणे गरजेचे आहे. जाहीर केलेल्या धोरणानुसार फक्त स्त्री किंवा पुरुष अशा एकल पालकत्वाला परवानगी नाही. परदेशी दाम्पत्यांना अपत्यप्राप्तीसाठी भारतीय महिलांचा पर्याय वापरता येणार नाही. मातृत्वाचे व्यावसायीकरण रोखण्याच्या दृष्टीने हे नियम केले गेले ंआहेत. एक मूल झाल्यानंतर काही वेळा महिलेच्या गर्भाशयात दोष निर्माण होणे, दुर्धर आजार होणे अशा अडचणी येऊ शकतात. त्यावेळी सरोगसी हा पर्याय असू शकतो. मात्र नव्या धोरणानुसार दुसऱ्या अपत्यासाठी सरोगेट मदर वापरता येणार नाही; त्यामुळे पालकांना दुसऱ्या अपत्यापासून वंचित राहावे लागेल. सरोगेट मदर ही नात्यातील असावी, अशी एक तरतूद या धोरणात आहे. मात्र दरवेळी नात्यातील महिला सरोगसीसाठी उपलब्ध असू शकेलच, असे नाही. त्यामुळे बाहेरच्या महिलेला सरोगसीसाठी अनुमती मिळणे गरजेचे आहे. व्यावसायीकरण रोखण्यासाठी दाम्पत्याची पालकत्वाची गरज, त्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र आणि सरोगसीसाठीची अनुमती यासाठी स्वतंत्र स्थानिक समिती नियुक्त करण्यात यावी, असे मत वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केले. कोल्हापुरात स्थिती समाधानकारक मोठ्या शहरांमध्ये ‘सरोगेट मदर’ हा व्यवसाय झाला असला तरी कोल्हापुरात अद्याप अशी स्थिती नाही. अपत्य नसलेल्या दाम्पत्यांना पालकत्वाचा आनंद देण्यासाठी म्हणूनच सरोगेट मदरचा पर्याय वापरण्यात आला आहे. कोल्हापुरात आई, बहीण, जाऊ अशा नात्यातील महिलाच सरोगेट मदर झाल्याची उदाहरणे आहेत. याशिवाय बाहेरच्या महिलेशी नियमानुसार ठरावीक रकमेचा करार करून अनेक दाम्पत्यांना पालकत्वाचा आनंद मिळाला आहे. व्यावसायिकीकरण रोखण्यासाठी सरोगसी मातृत्वावर काही बंधने आणली गेली असली तरी त्यातील काही तरतुदी अडचणीच्या ठरणार आहेत. सुदैवाने कोल्हापुरात सरोगसीचा व्यवसायासाठी वापर केला जात नाही. उलट यामुळे अनेक दाम्पत्यांना पालकत्वाचा आनंद मिळाल्याचा अनुभव आहे. - डॉ. सतीश पत्की