शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे पिता-पुत्राला जेलमध्ये पाठवण्याची तयारी संजय राऊत करतायत”; शिंदे गटाचा दावा
2
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
3
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
4
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
5
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
6
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
7
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
8
Gold Silver Price: अक्षय तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
9
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
10
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
11
धकधक करने लगा! अंकिताने केला माधुरीसारखाच हुबेहुब लूक, युझर्स म्हणाले, 'प्रयत्नही करु नको'
12
ज्या Naresh Goyal यांना मिळाला जामीन, एकेकाळी होता त्यांचा बोलबाला; होते देशातील १६वे श्रीमंत 
13
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.५५ टक्के मतदान
15
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
16
किती कमाई होते?; अयोध्येत कपाळाला टिळा लावणाऱ्या पोराचं उत्तर ऐकून व्हाल हैराण
17
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
18
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
19
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
20
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट

रेन हार्वेस्टिंग केल्यास घरफाळ्यात सूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2019 11:42 PM

अतिरिक्त जागा वापर बंद करण्यासाठी बाजार कर वसुलीमध्ये वाढ करणे तसेच संभाजी उद्यान व सरसेनापती जाधव उद्यान दैनंदिन देखभालीचा ठेका देण्याचा निर्णय पालिका सभेत घेण्यात आला.

ठळक मुद्देपेठवडगाव नगरपालिका सभेत निर्णय : १0 टक्के मिळणार लाभ, विविध विषयांवर चर्चा

पेठवडगाव : अतिरिक्त जागा वापर बंद करण्यासाठी बाजार कर वसुलीमध्ये वाढ करणे तसेच संभाजी उद्यान व सरसेनापती जाधव उद्यान दैनंदिन देखभालीचा ठेका देण्याचा निर्णय पालिका सभेत घेण्यात आला. सोमवारी वडगाव पालिकेच्या सभागृहात सर्वसाधारण सभा झाली. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष मोहनलाल माळी होते. यावेळी उपनगराध्यक्ष संतोष गाताडे, गटनेत्या प्रविता सालपे प्रमुख उपस्थित होत्या.

विषयपत्रिकेचे वाचन सुरेश भोपळे यांनी केले. तसेच भविष्यातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी रेन हार्वेस्टिंग सिस्टीम करणाऱ्या मालमत्ता धारकांस घरफाळ्यामध्ये १० टक्के सूट देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय यावेळी घेण्यात आला. वारणा नदीतून येणारे अतिरिक्त पाणी थेट महालक्ष्मी तलावात सोडण्याचे नियोजनही करण्यात आले आहे. या सभेत विषयपत्रिकेवरील वीस व ऐनवेळच्या विषयांवर चर्चा होवून निर्णय घेण्यात आले.

सभेत पालिकेस १ कोटी ५० लाखांचा निधी प्राप्त होणार आहे. यामधून रि.स.नं. १४० मधील जमीन खरेदी करण्याचे प्रशासनाने नियोजन केले आहे. यास स्वीकृत नगरसेवक गुरूप्रसाद यादव यांनी हरकत घेत म्हणाले, उपलब्ध निधी ज्या कामासाठी आला आहे. त्यासाठी खर्च करावा, अशी सूचना केली. अजय थोरात यांनी ही जागा घेण्यासाठी शासनाकडून निधी आणावा, असे मत मांडले.

यावर बोलताना मुख्याधिकारी अतुल पाटील यांनी संबंधित जागा मालकाने पालिकेस १२७ कलमाखाली नोटीस दिली आहे. त्यामुळे पालिकेला कोणत्याही परिस्थितीत जागा खरेदी करावी लागणार आहे. अन्यथा आरक्षणे रद्द होतील. यासंबंधी भूसंपादन प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे रक्कम जमा करावी लागणार आहे. मात्र, या सभेत निधी वर्ग करण्याचा किंवा जागा खरेदी करण्याचा निर्णय स्थगित ठेवत पुढील सभेत निर्णय घेण्याचे ठरले.

वृक्ष लागवडीचे सहा हजारांचे उद्दिष्ट ठरविले आहे. यावरही सभेत चर्चा झाली. गत वर्षाची किती झाडे जगली? असा खोचक प्रश्न नगराध्यक्ष माळी यांनी प्रशासनास विचारला. यावर चाचपडत अभियंता बळवंत बोरे यांनी ९० टक्के असे उत्तर दिले. यामध्ये हस्तक्षेप करत मुख्याधिकारी पाटील यांनी मी स्वत: देखरेख करतो. किमान ८० टक्के पेक्षा अधिक झाडे आम्ही जगविली आहेत.

यावर बोलताना विद्या पोळ यांनी शहरातील विविध शैक्षणिक संकुलाला झाडे जगविण्याचे आवाहन करावे. यातील ३ हजार झाडे शाहू शिक्षण प्रसारक सेवा संस्था पाच वर्षे जबाबदारी घेईल, असे सांगितले. तर प्रविता सालपे यांनी प्रत्येक नगरसेवकास झाडे लावण्यासाठी उद्दिष्ट देण्याची मागणी केली.

अनेक व्यापारी रस्त्यावर खिळे तसेच सांडपाणी टाकतात. त्यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच भूईभाडे प्रती चौरस मीटर दहा रुपये करण्यात आले आहे. तसेच हातगाड्यावर विक्री करणे २५ रुपये, तीन चाकी वाहनांना ५० तर चार चाकी वाहनांना दररोज १०० रुपये भुईभाडे आकारण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला.चर्चेत कालीदास धनवडे, संतोष चव्हाण, संदीप पाटील, आदींनी भाग घेतला. यावेळी सुनिता पोळ, मैमुन कवठेकर, शबनम मोमीन, अलका गुरव, सावित्री घोटणे, नम्रता तार्इंगडे, अनिता चव्हाण, आदी उपस्थित होते.कर्मचारी फोन उचलत नाहीतकेडरवरील कर्मचारी लोकप्रतिनिधींचा फोन उचलत नाहीत. हा मुद्दा थेट नगराध्यक्ष माळी यांनीच मांडला. यापुढेही असाच प्रकार घडल्यास दिवसाचा पगार कपात करण्याचा आदेश प्रशासनास देण्यात आला. यावेळी आमचाही फोन उचलत नाही. काय कारवाई करणार, असा प्रश्न अन्य नगरसेवकांनी उपस्थित केला.

टॅग्स :government schemeसरकारी योजनाTaxकरMuncipal Corporationनगर पालिका