शहरं
Join us  
Trending Stories
1
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
3
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
4
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
5
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
6
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
7
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न
8
Road Rage Case: ट्रक चालकाचे अपहरण; पूजा खेडकरच्या वडिलांच्या ड्रायव्हरला अटक, आई- वडील फरार
9
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
10
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
11
सूर्य ग्रहण २०२५: चंद्रग्रहणात केला तोच उपाय सूर्यग्रहणातही, साठवणीच्या अन्न-पाण्यावर ठेवा तुळशीचे पान 
12
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
13
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
14
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
15
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
16
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
17
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
18
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
19
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
20
ठाण्यातील अवजड वाहन बंदीचा ताप! मुंबई अहमदाबाद महामार्गावर देखील अवजड वाहनांना बंदी

थेट पाईपलाईन : एप्रिल २०२१ चा नवा मुहूर्त, महापालिकेचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2020 16:22 IST

मानवनिर्मित तसेच नैसर्गिक कारणांनी रखडलेल्या काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेचे काम पूर्णत्वाच्या मार्गाने जात असून, एप्रिल २०२१ मध्ये ही योजना पूर्ण होऊन कार्यान्वित होईल, असा दावा बुधवारी महानगरपालिका प्रशासन केला. योजनेचे काम मुदतीत पूर्ण केले नसल्यामुळे ठेकेदारास रोज ५0 हजार रुपयांचा दंड करण्यात येत असून, तो बिलातून वसूल केला जात असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

ठळक मुद्देथेट पाईपलाईन : एप्रिल २०२१ चा नवा मुहूर्त, महापालिकेचा दावापदाधिकारी, अधिकाऱ्यांनी केली कामाची पाहणी

कोल्हापूर : मानवनिर्मित तसेच नैसर्गिक कारणांनी रखडलेल्या काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेचे काम पूर्णत्वाच्या मार्गाने जात असून, एप्रिल २०२१ मध्ये ही योजना पूर्ण होऊन कार्यान्वित होईल, असा दावा बुधवारी महानगरपालिका प्रशासन केला. योजनेचे काम मुदतीत पूर्ण केले नसल्यामुळे ठेकेदारास रोज ५0 हजार रुपयांचा दंड करण्यात येत असून, तो बिलातून वसूल केला जात असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.गेल्या दोन वर्षांपासून रखडलेल्या आणि राजकीय आरोप-प्रत्यारोपामुळे चर्चेत राहिलेल्या थेट पाईपलाईन योजनेच्या कामाची बुधवारी महानगरपालिका पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष धरणक्षेत्रात जाऊन पाहणी केली. सत्तारूढ कॉँग्रेस, राष्ट्रवादी बरोबरच भाजपचे पदाधिकारीही या पाहणी दौºयात सहभागी झाले होते.यावेळी धरणक्षेत्रातील इनटेक वेल, इन्स्पेक्शन वेल क्र. १ व क्र. २, जॅकवेल, ब्रेकप्रेशर टॅँक, आदी कामांची पाहणी करण्यात आली. धरणक्षेत्रात जेथे काम केले जाणार आहे, तेथे सध्या पाणी असून, ते उपसा करण्यात येत आहे. त्याकरिता १२० एचपी क्षमतेच्या सहा मोटारी बसविण्यात आल्या आहेत. आणखी आठ ते दहा दिवस हे काम सुरू राहणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष कामाला पुन्हा सुरुवात होईल.इनटेकवेलचे काम मागच्या वर्षी पूर्ण झाले आहे. इन्स्पेक्शन वेल क्र. १ चे काम पूर्ण झाले आहे. क्र. २ चे राफ्टचे काम बाकी आहे. ते पुढील महिन्यात पूर्ण केले जाणार आहे. ब्रेकप्रेशर टॅँकचे काम मे महिन्याच्या अखेरीस पूर्ण होईल. जॅकवेलची कामे युद्धपातळीवर करण्याचे नियोजन केले आहे. यंदाच्या पावसाळ्यापूर्वी जर जॅकवेलचे काम पूर्ण झाले, तर एप्रिल २०२१ पासून योजनेचे पाणी मिळेल, असे अधिकारी, तसेच ठेकेदाराच्या प्रतिनिधींनी सांगितले.पावसाळा सुरू झाला की, योजनेचे काम बंद पडते. हा अनुभव लक्षात घेऊन यापुढील कामांचे दिवसागणीक नियोजन केले असून, त्यावर अतिरिक्त आयुक्त, सहायक आयुक्त दर्जाचे अधिकारी प्रत्येक दिवशी नियंत्रण ठेवणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

कामाचा तपशील :- ५२.९७ कि.मी. पाईपलाईनपैकी ४७ कि.मी.चे काम पूर्ण- सुळंबी ते सोळांकूर ३.७० कि.मी.चे पाईप टाकण्याचे काम अपूर्ण- शहरांतर्गत ६००, ८०० व १००० मि.मी. व्यासाची पाईप टाकण्याचे काम पूर्ण- जॅकवेलचे काम ६० टक्के पूर्ण, तर १५ जूनपर्यंत उर्वरित काम पूर्ण करण्याचे टार्गेट- पुईखडी जलशुद्धीकरण केंद्राचे ८५ टक्के काम पूर्ण, मेपर्यंत कार्यान्वित होणार.दंड सुरूच राहणार : आयुक्तठेकेदाराने मुदतीत काम पूर्ण केले नसल्यामुळे त्यांना रोज ५0 हजार रुपये दंड केला जात असून, तो यापुढेही सुरूच राहणार आहे. आतापर्यंत तीन कोटी ८० लाख रुपये दंड झाला असून, तो बिलातून वसूल केला आहे. ठेकेदाराने काम सुरू असल्यामुळे दंड माफ करावा, अशी विनंती केली आहे; परंतु अद्याप आम्ही काहीच निर्णय घेतलेला नाही, असे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी सांगितले.अतिवृष्टीने कॉपरडॅम खचलागतवर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे कॉपरडॅम खचला आहे. त्यामुळे जॅकवेलसाठी खुदाई केलेल्या जागेत पाणी साचले असून, जॅकवेलच्या कामास उशीर होत आहे. मात्र, हे काम १५ जूनपूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन केले आहे. कोणत्याही परिस्थितीत जॅकवेलचे काम पूर्ण करा, अशा सूचना ठेकेदारास देण्यात आलेल्या आहेत, असे महापौर निलोफर आजरेकर यांनी सांगितले.कामाची गती वाढवा : सूर्यवंशीयोजना पूर्णत्वाकडे नेण्याचे प्रयत्न सुरू असले तरीही काही मर्यादा आहेत. म्हणूनच कामाची गती वाढविली तरच ही योजना लवकर पूर्ण होईल. वास्तविक मूळ नियोजनाप्रमाणे आधी धरणक्षेत्रातील कामे पूर्ण होणे आवश्यक होते. त्यानंतर मग जलशुद्धीकरण केंद्र, जलवाहिनी टाकण्याची कामे करायला पाहिजे होती; परंतु ठेकेदाराने उलट दिशेने कामाला सुरुवात केली. दंड करणे म्हणजे योजना पूर्ण करणे नव्हे, तर दंड करण्यापेक्षा योजना पूर्ण होणे महत्त्वाचे आहे, असे विरोधी पक्षनेते विजय सूर्यवंशी यांनी सांगितले.

या पाहणी दौऱ्यात महापौर निलोफर आजरेकर, उपमहापौर संजय मोहिते, आयुक्त कलशेट्टी, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, स्थायी समिती सभापती संदीप कवाळे, शिक्षण सभापती श्रावण फडतारे, महिला बाल कल्याण सभापती शोभा कवाळे, सभागृह नेता दिलीप पोवार, विरोधी पक्षनेता विजय सूर्यवंशी, कॉँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख, भाजपचे गटनेते अजित ठाणेकर,राष्ट्रवादीचे गटनेते सुनील पाटील, ताराराणीचे नगरसेवक ईश्वर परमार, जलअभियंता भास्कर कुंभार, ठेकेदाराचे प्रतिनिधी राजेंद्र माळी सहभागी झाले होते. 

 

टॅग्स :Waterपाणीkolhapurकोल्हापूरMuncipal Corporationनगर पालिका