शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

बेळगावात सावत्र आईकडून चिमुरडीचा खून, आजी-आजोबांनी केली पोलिसांत तक्रार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2024 12:20 IST

बेळगाव : तालुक्यातील कंग्राळी खुर्द येथे वास्तव्यास असणाऱ्या बालिकेचा तिच्याच सावत्र आईने खून केल्याचा आरोप मृत बालिकेच्या आजी-आजोबांनी केला ...

बेळगाव : तालुक्यातील कंग्राळी खुर्द येथे वास्तव्यास असणाऱ्या बालिकेचा तिच्याच सावत्र आईने खून केल्याचा आरोप मृत बालिकेच्या आजी-आजोबांनी केला आहे. सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली असून, आजी-आजोबांनी सावत्र आईच्या विरोधात येथील एपीएमसी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.समृद्धी रायण्णा हंपन्नवर (वय ४) असे या निरागस मुलीचे नाव आहे. समृद्धी ही सोमवारी सकाळी सातच्या सुमारास घरामध्ये खेळत असताना अचानक कोसळली. तेव्हा बरे वाटत नसेल म्हणून उपचारासाठी तिला तातडीने जिल्हा रुग्णालयाकडे घेऊन जात असताना वाटेतच तिचा मृत्यू झाला. समृद्धीच्या मृत्यूची बातमी मिळताच तिचे आजोबा-आजी आणि नातेवाइकांनी जिल्हा रुग्णालयाकडे धाव घेतली.यावेळी मृत समृद्धीच्या नातेवाइकांनी या मृत्यूला तिची सावत्र आई सपना रायण्णा हंपन्नवर कारणीभूत असल्याचा गंभीर आरोप केला. दोन वर्षांपूर्वी २०२१ मध्ये हुंड्यासाठी समृद्धीची आई भारती हंपन्नवर हिचा खून झाला होता. आता सावत्र आई सपना हिने चार वर्षांच्या समृद्धीचा खून केला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. मयत समृद्धीच्या एका नातेवाइकाने तिला रविवारी रात्री उलटी आणि शौचाला झाले होते. त्यानंतर सोमवारी सकाळी बरे वाटू लागल्याने घरात खेळत असताना ती अचानक खाली कोसळली आणि उपचारासाठी हॉस्पिटलला नेत असताना तिचा मृत्यू झाल्याचे सांगितले. याप्रकरणी एपीएमसी पोलिस ठाण्यात तक्रार नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :Karnatakकर्नाटकbelgaonबेळगावCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस