शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

बालकाच उन्नतीचा मार्ग म्हणजे साहित्य संमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:52 IST

उत्तूर : साहित्य संमेलनातून विविधांगी माहिती मिळते. साहित्य, कला, वाड्:मय यांची जोपासना ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन बालनाट्य ...

उत्तूर : साहित्य संमेलनातून विविधांगी माहिती मिळते. साहित्य, कला, वाड्:मय यांची जोपासना ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन बालनाट्य लेखक ज्योतिराम कदम (पुणे) यांनी केले. उत्तूर (ता. आजरा) येथे आयोजित चौथ्या त्रिवेणी ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात संमेलनाध्यक्ष म्हणून ते बोलत होते. स्वागताध्यक्षपदी डॉ. प्रकाश तौकरी होते.

त्रिवेणी सांस्कृतिक संस्था, नवजीवन विद्यालय व वसंतरावदादा पाटील विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने साहित्य संमेलन पार पडले. प्रतिमापूजन व स्वागत गीतानंतर साहित्य संमेलनांची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. संमेलनाध्यक्ष कदम यांनी आठ भाकरीची कथा सांगून कष्टाचे महत्त्व सांगितले. साहित्याची गोडी लहानपणी निर्माण झाल्यास संस्कारक्षम वाड्:मय् मुलांच्या हातात पडेल.

यावेळी संमेलनाध्यक्ष, कदम, स्वागताध्यक्ष तौकरी, सरपंच वैशाली आपटे, उपसरपंच सचिन उत्तूरकर, विश्वास देसाई, मारुतीराव झेंडे-पाटील, हर्षदा खोराटे, भिकाजी ढोणुक्षे, महेश करंबळी, टी. के. पाटील, अनिल लोखंडे, अजित उत्तूरकर, प्रकाश भोईटे, सुरेश वड्राळे, अशोक दुधाळे, आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

श्रीकांत नाईक यांनी प्रास्तविक केले. सुरेश कांबळे यांनी स्वागत केले. अस्मिता गुरव व सुरेखा परीट यांनी सूत्रसंचालन केले. रवींद्र येसादे यांनी आभार मानले.

--------------------------

* साहित्यिकांनी रंजकता आणली

साहित्यिक बाबूराव सिरसाठ, नीलम माणगावे, माया कुलकर्णी, स्नेहा वाबळे, वर्षा चौगुले, पुष्पा कुलकर्णी आदींनी दुसऱ्या सत्रात कथा, गोष्टी, कविता, समूहगीते सांगून साहित्य संमेलनात रंजकता आणली.

-----------------

* लेखकांचा गौरव त्रिवेणीच्या साहित्य पुरस्काराने लेखक नंदू साळोखे (बेलेवाडी), जयप्रभू कांबळे (आर्दाळ), अक्षर दालनचे रवींद्र जोशी, माया कुलकर्णी, संपत चव्हाण यांना संमेलनाध्यक्ष ज्योतिराम कदम यांच्या हस्ते गौरविण्यात आले. -------------------------

फोटो ओळी : उत्तूर (ता. आजरा) येथे मराठी ग्रामीण साहित्य संमेलनाचे ज्योतिराम कदम यांनी दीपप्रज्वलन करून उद्घाटन केले. यावेळी विश्वनाथ करंबळी, उमेश आपटे, वैशाली आपटे, विश्वास देसाई, आदी उपस्थित होते.

क्रमांक : ३१०१२०२१-गड-०६