हिरण्यकेशी प्रदूषणात सीमावाद

By Admin | Updated: November 30, 2014 23:58 IST2014-11-30T23:23:34+5:302014-11-30T23:58:31+5:30

लोकांच्या जिवाशी खेळ : कारवाईचा चेंडू कर्नाटकच्या कोर्टात

Limitations in Hiranyakase pollution | हिरण्यकेशी प्रदूषणात सीमावाद

हिरण्यकेशी प्रदूषणात सीमावाद

राम मगदूम - गडहिंग्लज -नांगनूरनजीक होणाऱ्या हिरण्यकेशी नदीच्या पाणी प्रदूषणाची पडताळणी करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पथकाने घेतलेले पाण्याचे नमुने कर्नाटकच्या हद्दीतील ओढा व नदीपात्रातील आहेत. याप्रश्नी कारवाईचा चेंडूदेखील कर्नाटकच्या कोर्टात ढकलला जाणार आहे. त्यामुळे सुमारे दहा हजार लोकांच्या जिवाशी चाललेला हा खेळ कधी थांबणार? हाच जनतेचा सवाल आहे. (समाप्त)

मळीमिश्रित पाणी कारखान्यातून अजिबात बाहेर सोडले जात नाही. मळीचे प्रमाण अधिक असणाऱ्या पाण्याचा वापर करून कंपोष्ट खत तयार केले जाते. उर्वरित पाणी प्रक्रिया करूनच बाहेर सोडले जाते. सुमारे ८० एकर शेतीसाठी त्याचा वापर होतो. कारखान्याचे सांडपाणी नदीत मिसळण्याचा प्रश्नच नाही. ओढ्यातून नदीत मिसळणारे सांडपाणी गटारीचे आहे.
- अशोक पाटील,
प्र. कार्यकारी संचालक, हिरण्यकेशी सहकारी साखर कारखाना लि., संकेश्वर
नांगनूरच्या दूषित पाणीप्रश्नी संबंधित ओढा व नदीत मिसळणाऱ्या पाण्याचे नमुने प्रत्यक्ष स्थळ पाहणीच्यावेळी घेऊन तपासणीसाठी चिपळूणच्या शासकीय प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. हा भाग कर्नाटकच्या हद्दीत येत असल्यामुळे पाणी तपासणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यासंदर्भात कार्यवाहीबाबत कर्नाटक प्रदूषण मंडळाला कळविले जाईल.
- एस. एस. डोके,
प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, कोल्हापूर.
मळीमिश्रित सांडपाण्यामुळेच नदीचे पाणी प्रदूषित होत असून, नांगनूरसह अरळगुंडी, कडलगे व इदरगुच्ची या चार खेड्यांतील लोकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. कर्नाटक-महाराष्ट्र हद्दीचे कारण पुढे न करता पाणी प्रदूषित करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. जनतेच्या जिवाशी चाललेला हा खेळ थांबवावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.
- दिलीप माने,
शिवसेना तालुकाप्रमुख, गडहिंग्लज्
अरळगुंडी गावालाही दूषित पाण्याचाच पुरवठा होतो. बारमाही पाण्याला दुर्गंधी असते. त्यामुळेच ग्रामस्थ नळाचे पाणी पिण्यासाठी वापरत नाहीत. नळ योजना असूनही त्याचा काहीच फायदा नाही.
- सविता संजय कांबळे,
सरपंच, अरळगुंडी.ा.
इदरगुच्ची गावच्या पूर्वेकडील शेतवडीतील ग्रामस्थ कडलगे गावच्या हद्दीतून हिरण्यकेशी
नदीचे पाणी उपसा करून
शेतीसाठी वापरतात. पिण्यासाठीदेखील तेच पाणी वापरले जाते. त्यामुळे त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
- शांता शिव्वाप्पा नाईक,
सरपंच इदरगुच्च
नांगनूरनजीक दूषित होणारे पाणीच पुढे कडलगेला येते. तेच पाणी जॅकवेलद्वारे जलकुंभात टाकून गावात वितरित केले जाते. नळाच्या पाण्याला वास असल्यामुळे ग्रामस्थ बोअर व विहिरीचेच पाणी प्यायला वापरतात. त्यामुळे पाणी प्रदूषण थांबायला हवे.
- सुशीला सतीश शिरूर,
हिरण्यकेशी नदीच्या पाण्याचे प्रदूषण थांबावे म्हणून नांगनूर ग्रामस्थांचा गेल्या ७/८ वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे; परंतु अजून न्याय मिळालेला नाही. संकेश्वर कारखान्यावर त्वरित कारवाई न झाल्यास जनआंदोलनाबरोबरच न्यायालयातदेखील दाद मागावी लागेल.
- अशोक जाधव,
उपसरपंच, नांगनूर.
सरपंच कडलगे..

Web Title: Limitations in Hiranyakase pollution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.