नरगेवाडीतील सख्खा भावाच्या खूनप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा

By Admin | Updated: March 9, 2017 18:52 IST2017-03-09T18:52:03+5:302017-03-09T18:52:03+5:30

गवत कापण्याच्या कारणावरुन वादातून प्रकार

Life imprisonment for murder of brother in Narnavwadi | नरगेवाडीतील सख्खा भावाच्या खूनप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा

नरगेवाडीतील सख्खा भावाच्या खूनप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा

नरगेवाडीतील सख्खा भावाच्या खूनप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा
गवत कापण्याच्या कारणावरुन वादातून प्रकार
कोल्हापूर : नरगेवाडी (ता. करवीर) येथे गवत कापण्याच्या कारणावरुन झालेल्या वादातून सख्या भावाचा कुऱ्हाड, खुरप्याने व काठ्याने खून केल्याप्रकरणी एकास जन्मठेपेची शिक्षा गुरुवारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. जी. अवचट यांनी सुनावली. मधुकर बापू कराळे (वय ४५) असे जन्मठेप झालेल्याचे नांव आहेत.
या खटल्याची पार्श्वभूमी अशी , नरगेवाडी येथे दगडू बापू कराळे (वय ६०) व त्यांचा सख्खा भाऊ मधुकर बापू कराळे यांची एकत्र जमीन आहे. या जमिनीत गवताच्या कारणावरुन त्यांच्यात वाद होता. दोन डिसेंबर २०१३ ला दगडू कराळे यांना मधुकर कराळे, त्याची पत्नी रंजना, निलेश व त्याचा भाऊ असे चौघांजणांनी गवत कापण्याच्या कारणावरुन रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास भांडणे काढली. त्यावेळी रंजनाच्या हातात चटणीच्या पाण्याचे पातेले व खुरपे आणि निलेश व त्याच्या भावाकडे काठ्या होत्या. मधुकरने दगडू कराळे यांच्यावर कुऱ्हाडीने वार केला. पण, त्यांनी तो डाव्या हाताने आडविला. त्यानंतर ही झोंबाझोंबी गावातील मुख्य रस्त्यावर आली. त्याठिकाणी दगडाचा ढिग पडला होता. याचवेळी मधूकरने दगडू कराळे यांच्या छातीवर कुऱ्हाडीने वार केला तर रंजनाने डोक्यावर खुरपे मारले. ही भांडणे सोडविण्यासाठी आलेले दगडू कराळे यांची सुभाष व प्रकाश व त्यांची आजी यांना मारहाण केली. या ठिकाणी असलेल्या गणपती सदाशिव सावंत, कृष्णात सावंत, गोविंद सावंत व इतर लोकांनी भांडणे सोडवून जखमी झालेले दगडू कराळे यांना सीपीआरला उपचारासाठी आणले. याठिकाणी दगडू कराळे यांचा मृत्यु झाला.
याबाबत दगडू यांचा मुलगा सुभाष कराळे यांनी करवीर पोलिसांत फिर्याद दिली. त्यानूसार मधुकर कराळे याच्यावर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. गुरुवारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.जी.अवचट यांनी दगडू कराळे यांच्या खून प्रकरणी मधुकर कराळेला जन्मठेपेचे शिक्षा व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली तर मधुकरची पत्नी रंजनी (वय ३५) व मुलगा निलेश उर्फ सरदार मधुकर कराळे (२७ दोघे राहणार नरगेवाडी) या दोघांना ३२५ कलमाखाली दोषी ठरवून प्रत्येकी दोन हजार रुपये दंड व अटकेपासून भोगत असलेली कैदीची शिक्षा सुनावली.
या खटल्यात १५ साक्षीदार तपासण्यात आले. त्यापैकी प्रत्यक्ष घटना पाहणारे सुभाष कराळे यांचा भाऊ प्रकाश, शेजारील कृष्णा सावंत, तपासी अधिकारी संभाजी गायकवाड, गजेंद्र पालवे, अंजुम शेख यांची साक्ष ग्राह्य आणि सरकारी वकील अ‍ॅड. अशोक रणदिवे यांच्या तक्रारी ग्राह्य मानून अवचट यांनी शिक्षा सुनावली.

Web Title: Life imprisonment for murder of brother in Narnavwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.