शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
4
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
5
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
6
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
7
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
8
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
9
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
10
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
11
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
12
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
13
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
14
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
15
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
16
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
17
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
18
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
19
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
20
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य

Kolhapur: इचलकरंजीतील नूतन बँकेचा परवाना रद्द, रिझर्व्ह बँकेची कारवाई; ठेवीदारांत खळबळ  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2023 12:20 IST

इचलकरंजी : शहरातील सर्वसामान्यांची बँक म्हणून प्रसिद्ध असलेल्या शंकरराव पुजारी नूतन नागरी सहकारी बँकेचा परवाना भारतीय रिझर्व्ह बँकेने रद्द केला. ...

इचलकरंजी : शहरातील सर्वसामान्यांची बँक म्हणून प्रसिद्ध असलेल्या शंकरराव पुजारी नूतन नागरी सहकारी बँकेचा परवाना भारतीय रिझर्व्ह बँकेने रद्द केला. बँकेत भांडवलीची कमतरता असल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे ठेवीदार व ग्राहकांत खळबळ उडाली आहे.शंकरराव पुजारी यांनी सर्वसामान्यांना आर्थिक पाठबळ देण्याच्या उद्देशाने या बँकेची स्थापना केली होती. त्यामुळे या बँकेला त्यांचे नावही देण्यात आले होते. २०२० पासून आर्थिक संकटामुळे बँकेची परिस्थिती खालावली. त्यानंतर ठेवीदारांनीही ठेवी काढण्यासाठी बँकेत गर्दी केली. १३ मे २०२२ पासून बँकेवर रिझर्व्ह बँकेने निर्बंध लादले. तेव्हापासून व्यवसाय बंद झाला. त्यातूनही बँकेचे अध्यक्ष प्रकाश पुजारी यांनी या अडचणीतून बँक नक्कीच मार्ग काढेल आणि पुन्हा नव्या जोमाने कार्यरत राहील, असे आश्वासन दिले होते. परंतु रिझर्व्ह बँकेच्या या कारवाईमुळे सर्व काही ठप्प झाले. परंतु दिलासादायक बाब म्हणजे बँकेतील साधारण ९९.८४ टक्के ठेवीदार डीआयसीजी विमा योजनेंतर्गत समाविष्ट आहेत. त्यामुळे डिपॉझिट इन्शुरन्स आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन विमा योजनेंतर्गत पाच लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींचा विमा उतरविला गेला आहे.आरबीआयने ४ डिसेंबर २०२३ ला केलेल्या कारवाईत सर्व प्रकारचे व्यवहार बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामध्ये बँकेत भांडवलीची कमतरता आहे. त्यामुळे बँकिंग सेवा देण्यासाठी भांडवल नाही. तसेच भविष्यात कमाईच्या साधनांबाबत कोणतीही ठोस योजना मांडण्यात बँक अपयशी ठरली आहे. अशा परिस्थितीत आरबीआयच्या नियमांचे पालन होऊ शकत नाही, असा ठपका ठेवण्यात आला आहे. या कारवाईमुळे बँकेचे सर्व व्यवहार बंद झाले आहेत.

इचलकरंजी शहरातील दहावी बँकशहरातील कामगार, पीपल्स, महिला, साधना, शिवनेरी, इचलकरंजी अर्बन, शिवम, लक्ष्मी-विष्णू, चौंडेश्वरी या दहा सहकारी बँका आर्थिक नियोजनाच्या अभावामुळे अडचणीत आल्या, या बँकेवरही सुरुवातीला रिझर्व्ह बँकेने निर्बंध घातले होते. मात्र, कालांतराने या बँका अवसायनात निघाल्या. आता नूतन बँकेचाही त्यामध्ये समावेश झाला.

अध्यक्षांसह १९ जणांवर झाली आहे कारवाईपदाचा दुरुपयोग करत व नियमबाह्य कर्जाचे वाटप करत आर्थिक बँकेला आर्थिक हानी पोहोचविल्या प्रकरणी १७ ऑगस्ट २०२३ ला बँकेचे अध्यक्ष प्रकाश पुजारी यांच्यासह पत्नी कांचन पुजारी, शाखाधिकारी मलकारी लवटे, कर्ज प्रमुख राजेंद्र जाधव यांच्यासह १९ जणांवर गावभाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्यावर संगनमताने तीन कोटी ५८ लाख ३७ हजारांचा अपहार व गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरbankबँकReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँक