वाचनालये संस्कार केंद्र बनण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:04 IST2021-02-05T07:04:25+5:302021-02-05T07:04:25+5:30
उत्तूर : वाचनालये संस्कार केंद्र बनण्याची गरजेचे असून मराठी भाषेच्या समृद्धीसाठी पोषक उपक्रम राबविण्याची आवश्यक आहे, असे मत साहित्यिक ...

वाचनालये संस्कार केंद्र बनण्याची गरज
उत्तूर :
वाचनालये संस्कार केंद्र बनण्याची गरजेचे असून मराठी भाषेच्या समृद्धीसाठी पोषक उपक्रम राबविण्याची आवश्यक आहे, असे मत साहित्यिक बाबूराव सिरसाट यांनी व्यक्त केले.
झुलपेवाडी (ता. आजरा) येथे दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा कोल्हापूर साने गुरुजी वाचनालय व शिवारबा प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. डॉ. संभाजी जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती.
वाचनालय अध्यक्ष तानाजी पावले यांनी प्रास्ताविक केले.
सिरसाट म्हणाले, खेड्यांनी मराठीचे अस्तित्व टिकवून ठेवले. पण, आर्थिक परिस्थिती चांगली झाली, माणूस शहरात गेला आणि मराठी भाषेची हेळसांड झाली.
दुसऱ्या सत्रात लेखक नंदू साळोखे यांची प्रसिद्ध कवी गोविंद पाटील यांनी मुलाखत घेतली. त्यानंतर कवी संमेलन झाले. रामकृष्ण मगदूम व दत्तात्रय सुतार यांनी सूत्रसंचालन केले.
यावेळी ज्येष्ठ साहित्यिक शि. गो. पाटील, राजन कोनवडेकर, बालसाहित्यक प्रकाश केसरकर, सरपंच नामदेव जाधव यांच्यासह चिकोत्रा खोऱ्यातील साहित्यप्रेमी उपस्थित होते. सचिन दुधाळे यांनी आभार मानले.
-------------------------
फोटो ओळी : झुलपेवाडी (ता. आजरा) येथे लेखक नंदू साळोखे यांचा सत्कार करताना साहित्यिक बाबूराव सिरसाट. शेजारी डॉ. जगताप, तानाजी पावले आदी उपस्थित होते.
क्रमांक : २७०१२०२१-गड-०५