बोरसेचा पदभार काढून घेण्यासाठी आरोग्य मंत्र्यांना पत्र, यड्रावकर यांची माहिती : कार्यपद्धतीबद्दल अनेक तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:17 IST2021-06-01T04:17:54+5:302021-06-01T04:17:54+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : आरोग्य उपसंचालक हेमंतकुमार बोरसे यांच्या कार्यपद्धतीबद्दल अनेक तक्रारी असून, त्यांच्याकडे असणारा आरोग्य उपसंचालक पदाचा ...

Letter to Health Minister to remove Borse, Yadravkar's information: Many complaints about the procedure | बोरसेचा पदभार काढून घेण्यासाठी आरोग्य मंत्र्यांना पत्र, यड्रावकर यांची माहिती : कार्यपद्धतीबद्दल अनेक तक्रारी

बोरसेचा पदभार काढून घेण्यासाठी आरोग्य मंत्र्यांना पत्र, यड्रावकर यांची माहिती : कार्यपद्धतीबद्दल अनेक तक्रारी

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : आरोग्य उपसंचालक हेमंतकुमार बोरसे यांच्या कार्यपद्धतीबद्दल अनेक तक्रारी असून, त्यांच्याकडे असणारा आरोग्य उपसंचालक पदाचा कार्यभार काढून घ्यावा व त्यांची बदली अन्यत्र करण्यात यावी, अशी मागणी आपण पत्राद्वारे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली असल्याची माहिती आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी सोमवारी पत्रकारांना दिली. यड्रावकर यांनी बोरसे यांना सोमवारी बोलवले होते; परंतु ते आले नाहीत. यड्रावकर यांनी आपण त्यांच्याशी फोनवर बोलल्याचे सांगितले.

यड्रावकर म्हणाले, बोरसे याच्याकडे लातूरसह कोल्हापूरचा आरोग्य उपसंचालक पदाचा कार्यभार असून, त्यांच्याकडे कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी व सिंधुदुर्ग हे जिल्हे येतात. बोरसे याच्या कार्यपद्धतीवर या चार जिल्ह्य़ातील अधिकारी, डॉक्टर व कर्मचारी नाराज असून, ते सर्वांना त्रास देत असल्याच्या तक्रारी आमच्यापर्यंत आल्या असून, ते कर्मचारी वर्गाला नाहक त्रास देतात. विनाकारण कर्मचाऱ्यांची बदली करतात. त्यांची कामे अडवतात, अशी तक्रार असून, याची चौकशी करण्यात येईल.

मी याबाबत त्याचा कार्यभार काढून घ्यावा, असे पत्र आरोग्य मंत्री टोपे यांना दिले असून, मुंबईला गेल्यानंतर त्याच्या कार्यपद्धतीच्या चौकशीचा आदेश देणार असल्याचे आरोग्य राज्यमंत्री यड्रावकर यांनी सांगितले.

-------

औषध भांडारातून कामकाज

बोरसे हे सोमवारी कार्यालयात न जाता दुपारपर्यंत औषध भांडारगृहात बसून होते. तेथूनच त्यांनी कार्यालयीन कामकाच पाहिले. तिथेच त्यांनी फाइलवर सह्या केल्या. दुपारनंतर त्याचे स्वीय सहायक अशोक बन्ने यांच्या निरोप समारंभास कार्यालयात उपस्थिती लावली.

-----‐

Web Title: Letter to Health Minister to remove Borse, Yadravkar's information: Many complaints about the procedure