शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

प्रसंगी कर्ज काढू, पण बळीराजाला मदत करू : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2020 18:21 IST

coronavirus, gadhinglaj, Hasan Mushrif , kolhapurnews कोरोनामुळे राज्य आर्थिक अडचणीत असतानाही महाराष्ट्राला जीएसटीची रक्कम द्यायला केंद्र सरकार तयार नाही.त्यामुळे प्रसंगी कर्ज काढू, पण नैसर्गिक संकटात सापडलेल्या बळीराजाला मदत करू, असा विश्वास ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी शेतकऱ्यांना दिला.

ठळक मुद्देप्रसंगी कर्ज काढू, पण बळीराजाला मदत करू  : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफगडहिंग्लज येथील बैठकीत पीक नुकसानीच्या पंचनाम्याचे दिले आदेश

गडहिंग्लज : कोरोनामुळे राज्य आर्थिक अडचणीत असतानाही महाराष्ट्राला जीएसटीची रक्कम द्यायला केंद्र सरकार तयार नाही.त्यामुळे प्रसंगी कर्ज काढू, पण नैसर्गिक संकटात सापडलेल्या बळीराजाला मदत करू, असा विश्वास ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी शेतकऱ्यांना दिला.गडहिंग्लज पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित कोरोना आढावा बैठकीत ते बोलत होते.त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चंदगड व आजरा तालुक्यांचाही आढावा घेतला. पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे आदेशही त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले.जि.प.उपाध्यक्ष सतीश पाटील,नगराध्यक्षा स्वाती कोरी यांची प्रमुख उपस्थिती होती.मुश्रीफ म्हणाले, अवकाळी आणि परतीच्या पावसामुळे भात, भुईमुग, सोयाबीन आदी खरीप पिकांसह ऊसाचेही नुकसान झाले आहे.त्याचे पंचनामे तातडीने करून घ्यावेत. कोरोनाचे संकट अजूनही पूर्णत: टळलेले नाही. गणेशोत्सवानंतर वाढलेली रुग्णसंख्या कमी झाली असली तरी नवरात्रीनंतर रुग्णसंख्या पुन्हा वाढण्याचा धोका आहे.त्यासाठी सर्वांनी खबरदारी घ्यायलाच हवी .कोरोनावर मात केल्याबद्दल मंत्री मुश्रीफ व प्रांताधिकारी विजया पांगारकर यांचा पंचायत समितीतर्फे गटविकास अधिकारी शरद मगर यांच्या हस्ते सत्कार झाला. बैठकीस आमदार राजेश पाटील, भुदरगडचे प्रांताधिकारी डॉ. संपत खिलारी, पोलीस उपअधीक्षक गणेश इंगळे, गडहिंग्लजचे तहसिलदार दिनेश पारगे, चंदगडचे तहसिलदार विनोद रणावरे,सहाय्यक गटविकास अधिकारी आनंद गजगेश्वर व संबंधित सर्व अधिकारी उपस्थित होते. अधिकाऱ्यांचे कौतुक...!कोल्हापूर जिल्ह्यात अन्यत्र कोरोनाचा कहर सुरू असताना गडहिंग्लज,आजरा व चंदगड तालुक्यात कोरोना नियंत्रणात आहे. 'माझं कुटुंब माझी जबाबदारी' ही मोहीम येथील अधिकाऱ्यांनी यशस्वीपणे राबवली आहे,अशा शब्दांत मुश्रीफ यांनी अधिकाऱ्यांचे विशेष कौतुक केले.पोस्ट कोविड सेंटर प्रयत्नशील !कोरोनावर मात केलेल्या रूग्णांची काळजी घेण्यासाठी गडहिंग्लजमध्ये पोस्ट कोविड सेंटरची गरज आहे. त्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचेही मुश्रीफ यांनी यावेळी सांगितले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHasan Mushrifहसन मुश्रीफkolhapurकोल्हापूर