शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
2
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
3
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
4
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
5
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
6
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
7
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
8
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
9
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
10
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
11
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
12
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
13
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
14
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
15
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
16
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
17
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
18
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
19
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
20
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...

शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावू :जयंत आसगावकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 18:42 IST

MLA Teacher Kolhapur- आगामी ५ वर्षात शिक्षकांचे प्रलंबित सर्व प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचे आमदार प्रा. जयंत आसगावकर यांनी दिले. गडहिंग्लज तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघटनेतर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष बचाराम काटे होते. यावेळी पंच्याहत्तरीबद्दल काटे यांचा सत्कार झाला.

ठळक मुद्देशिक्षकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावू :जयंत आसगावकरगडहिंग्लजमध्ये यशवंत विद्यार्थी, आदर्श मुख्याध्यापकांचा गौरव

गडहिंग्लज : आगामी ५ वर्षात शिक्षकांचे प्रलंबित सर्व प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचे आमदार प्रा. जयंत आसगावकर यांनी दिले. गडहिंग्लज तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघटनेतर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष बचाराम काटे होते. यावेळी पंच्याहत्तरीबद्दल काटे यांचा सत्कार झाला.आसगावकर म्हणाले, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्यांची जाण असणारा मी कार्यकर्ता आहे. त्यामुळे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत. यावेळी आर. वाय. पाटील, डी. एस. घुगरे, सी. एस. मठपती, रमेश देसाई, ईश्वर स्वामी व काटे यांचीही भाषणे झाली.कार्यक्रमास संदीप पाथरे, समीर घोरपडे, विनोद नाईकवाडी, हिंदूराव नौकुडकर, सुरेश थरकार, सतीश पाटोळे, रवींद्र शिऊडकर, सुरेश मगदूम, आनंदा वाघराळकर, नारायण घोलप, जोमाकांत पाटील, डी. व्ही. चव्हाण, अंजना घुळाण्णावर, आप्पासाहेब मटकर, विजय चौगुले, एस. एन. देसाई, टी. बी. चव्हाण, अजित कुलकर्णी, शमा कुरणे, आर. एस. पाटील, एन. एल. कांबळे, जयवंत वडर, दिलावर वाटंगी आदी उपस्थित होते.तालुकध्यक्ष राजेंद्र खोराटे यांनी स्वागत केले. सचिव जे. डी. पाटील यांनी प्रास्ताविक केले. माजी जिल्हाध्यक्ष के. बी. पोवार यांनी अतिथी परिचय करून दिला. रशिदा शेख यांनी सूत्रसंचलन केले. प्राचार्य गंगाराम शिंदे यांनी आभार मानले.

यशवंत विद्यार्थ्यांचा गौरवहस्ताक्षर व निबंध स्पर्धेतील विजेते शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी, गडहिंग्लज आजरा व चंदगड तालुक्यात दहवी-बारावी परीक्षेतील यशवंत विद्यार्थी व १०० टक्के निकाल लावणाºया शाळा, स्वच्छ सुंदर आदर्श शाळा, नूतन व सेवानिवृत्त मुख्यध्यापकांचा यावेळी सत्कार झाला.

 यांना आदर्श मुख्याध्यापक पुरस्कारगडहिंग्लज तालुक्यातून बाळासाहेब कुपटे (हरळी खुर्द), आजरा तालुक्यातून अनिल देसाई (वाटंगी) तर चंदगड तालुक्यातून ईश्वर स्वामी (माणगाव) यांचा गुरुवर्य बी.जी. काटे आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराने गौरव झाला.

 

टॅग्स :MLAआमदारkolhapurकोल्हापूरTeacherशिक्षक