गांधीनगरातील रस्त्यासह पाण्याच्या टाकीचा प्रश्न मार्गी लावू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:08 IST2021-02-05T07:08:13+5:302021-02-05T07:08:13+5:30

गांधीनगर : गांधीनगर (ता. करवीर) येथील विविध रस्त्यांसह दहा लाख लिटर पाण्याच्या टाकीचे काम पूर्ण करू, असे आश्वासन कोल्हापूर ...

Let's solve the problem of water tank along the road in Gandhinagar | गांधीनगरातील रस्त्यासह पाण्याच्या टाकीचा प्रश्न मार्गी लावू

गांधीनगरातील रस्त्यासह पाण्याच्या टाकीचा प्रश्न मार्गी लावू

गांधीनगर : गांधीनगर (ता. करवीर) येथील विविध रस्त्यांसह दहा लाख लिटर पाण्याच्या टाकीचे काम पूर्ण करू, असे आश्वासन कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील यांनी माजी ग्रामपंचायत सदस्य धीरजकुमार तेहल्यानी यांच्या नेतृत्वाखालील ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाला दिले. महादेव मंदिर ते साईबाबा मंदिर रस्ता व पोलीस चौकी ते ईगल ग्रुप- कोयना कॉलनी या रस्त्यांची दुर्दशा झाली असून या दोन्ही रस्त्यांचे काँक्रिटीकरण पूर्ण करण्यात यावे व दहा लाख लिटर पाण्याची टाकी मंजूर करावी, अशी मागणी धीरजकुमार तेहल्यानी, सनी चंदवानी व ग्रामपंचायत सदस्य विनोद हुजुराणी आदीं ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने आमदार ऋतुराज पाटील यांच्याकडे केली. त्यावर सहमती दर्शवत आमदार ऋतुराज पाटील यांनी ही कामे ताबडतोब केली जातील, असे आश्वासन गांधीनगर ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाला दिले.

फोटो : ०२ गांधीनगर पाटील

गांधीनगर येथील ग्रामस्थांनी विविध मागण्यांचे निवेदन आमदार ऋतुराज पाटील यांच्याकडे दिले.

Web Title: Let's solve the problem of water tank along the road in Gandhinagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.