शहरं
Join us  
Trending Stories
1
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
2
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
3
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
4
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
5
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
6
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
7
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
8
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
9
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
10
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
11
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
12
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
13
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
14
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
15
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
16
‘मोसाद’चे धाडसी ऑपरेशन्स आणि त्याची खासियत काय?
17
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
18
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री
19
राज्यात १० ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक
20
प्रतिभा अमेरिकेबाहेर पडते आहे? - वेलकम टू इंडिया!

चला घालूया सूर्यनमस्कार

By admin | Updated: January 26, 2015 00:22 IST

‘लोकमत’चा उपक्रम : शहाजी लॉ कॉलेज मैदानावर आयोजन

कोल्हापूर : शारीरिक व्यायामांबाबत जागृती व्हावी या उद्देशाने ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाने सूर्यनमस्कार दिनाचे औचित्य साधून उद्या, मंगळवारी (दि. २७) सकाळी साडेसहा वाजता येथील शाहूपुरीतील शहाजी लॉ कॉलेज प्रांगणात सामुदायिक सूर्यनमस्कार घालण्याचा उपक्रम आयोजित केला आहे. उपक्रमात पतंजली योगपीठाचे तज्ज्ञ साधक मार्गदर्शन करणार आहेत. सर्वांसाठी खुल्या असणाऱ्या या उपक्रमासाठी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.रोजच्या दगदगीच्या जीवनात, कामाच्या व्यापात शारीरिक व्यायामाचा विसर पडू लागला आहे. सततची धावपळ, ताणतणाव, खाण्यातील अनियमितपणा यांमुळे काही ना काही व्याधी जडल्यानंतरच व्यायामाची ओढ लागते. व्यायाम व शरीरसंपदेबाबत अधिकाधिक जागरूकता निर्माण व्हावी, या हेतूनेच ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाने या उपक्रमाचे आयोजन केले आहे. या उपक्रमात भाग घेण्याची संधी शहर व परिसरातील सर्व खेळाडू, विद्यार्थी, व्यापारी, उद्योजक, व्यावसायिक, प्राध्यापक, शिक्षक यांच्यासह कोल्हापुरातील स्त्री-पुरुष नागरिकांना मिळणार आहे. ‘लोकमत सखी मंच’ व बाल विकास मंचच्या सर्व सदस्यांनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या उपक्रमाला शहाजी लॉ कॉलेज व्यवस्थापनाने सहकार्य केले आहे. या उपक्रमात कोल्हापुरातील पतंजली योगपीठाचे शिक्षक चंद्रशेखर खापणे, डॉ. शरद हुन्सवाडकर, सूर्यकांत गायकवाड व दिव्या पालनकर तसेच ट्रस्टचे साधक मार्गदर्शन करणार आहेत. सूर्यनमस्काराचे महत्त्व आणि त्याची शास्त्रशुद्ध पद्धत यांबाबत यावेळी माहिती मिळणार आहे.‘लोकमत’तर्फे आयोजित ‘संकल्प करूया, सूर्यनमस्कार घालूया’ या उपक्रमाचे मुख्य प्रायोजक कोल्हापूर, सांगली, सातारा व कोकण येथील हिरो मोटो क्रॉप शेवरोले, फॉक्स वॅगन, रिनो या चार जगविख्यात कंपन्यांचे अधिकृत डीलर युनिक आॅटोमोबाईल्स हे आहेत. ग्राहक सेवेसाठी ‘युनिक’च्या एकूण १५ शोरूम्स व दहा वर्कशॉप कार्यरत आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त वाहनांची विक्री व पश्चात दर्जेदार सेवेसाठी ‘युनिक’ प्रसिद्ध आहे. वेळ : सकाळी ६:३०स्थळ : शाहूपुरी; शहाजी लॉ कॉलेज क्रीडांगण, सर्वांसाठी खुलेकार्यक्रमाची रुपरेषा तीन वेळा ओंकारसूर्यनमस्काराबद्दलची माहितीरथसप्तमी व सूर्यनमस्काराचा संबंधसूर्यनमस्कार-आध्यात्मिक व शरीरक्रिया शास्त्रीय विश्लेषणसूर्यनमस्काराच्या बारा स्थितींचे वर्ण, योग्य स्थिती व फायदेयोगिक-जॉगिंग१२ सूर्यनमस्कार घालणेउंची संवर्धन योगासने व प्राणायामचे महत्त्वभजन, गीते व शांती पाठयोगपीठाचे शिक्षक चंद्रशेखर खापणे, डॉ. शरद हुन्सवाडकर, सूर्यकांत गायकवाड व दिव्या पालनकर हे सूर्यनमस्कार करवून घेणार आहेत.