चला, बालकांना बालपण देऊ...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:50 IST2020-12-11T04:50:18+5:302020-12-11T04:50:18+5:30
कोल्हापूर : शहरातील बसस्थानक, दाभोळकर चौक, रेल्वे स्टेशन, रंकाळा तलाव, भवानी मंडप तसेच सिग्नल, आदी गर्दीच्या परिसरात भीक मागण्यासाठी ...

चला, बालकांना बालपण देऊ...
कोल्हापूर : शहरातील बसस्थानक, दाभोळकर चौक, रेल्वे स्टेशन, रंकाळा तलाव, भवानी मंडप तसेच सिग्नल, आदी गर्दीच्या परिसरात भीक मागण्यासाठी काही महिलांकडून बालकांचा वापर केला जात आहे. यातून एक वर्षापेक्षा लहान मुलांचे शोषण केले जात आहे. असे प्रकार घडू नयेत यासाठी ‘चला, बालकांना बालपण देऊ...’ याबाबत जनजागृतीचा फलक अवनि संस्थेतर्फे शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या आवारात उभारला.
या लक्षवेधी फलकाचे अनावरण करवीरचे पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या हस्ते झाले. फलकावर बालकांचे शोषण करणाऱ्यांविरोधात शिक्षेच्या व दंडाच्या तरतुदीबाबतचीही माहिती दिली आहे. यावेळी संस्थेच्या अनुराधा भोसले, शिवकिरण पेटकर, साताप्पा मोहिते, अमर कांबळे, वनिता कांबळे, पुष्पा शिंदे, जयश्री कांबळे आदी उपस्थित होते.
फोटो नं. १०१२२०२०-कोल-अवनि
ओळ : कोल्हापुरातील शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या आवारात उभारण्यात आलेल्या ‘चला, बालकांना बालपण देऊ...’ याबाबत जनजागृतीच्या फलकाचे उद्घाटन गुरुवारी करवीरचे पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी अवनि संस्थेच्या अनुराधा भोसले, आदी उपस्थित होते.
(तानाजी)