शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
2
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
3
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
4
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
5
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
6
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
7
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
8
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
9
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
10
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
11
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
12
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
13
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
14
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
15
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
16
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
17
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
18
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
19
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
20
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी

‘चला होऊया जंतमुक्त’

By admin | Published: February 11, 2015 11:45 PM

जंतनाशक दिन : आरोग्य विभागाचा उपक्रम, शाळांमध्ये मोफत औषधे

म्हालसवडे : राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेनिमित्त अंगणवाडी, तसेच सर्व शाळांमध्ये जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे जंत उच्चाटन कार्यक्रम सुरू करण्यात आला. १९ वर्षांपर्यंतच्या विद्यार्थ्यांना जंतनाशकासाठी ‘एल्बेंडेझॉल’ हे औषध मोफत देण्यात येत आहे. शुक्रवार (दि. १३) पर्यंत ‘राष्ट्रीय जंतनाशक दिना’निमित्त हे औषध दिले जाणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार भारतात १ ते १४ वयोगटांतील किमान २४१ दशलक्ष बालकांमध्ये जंतदोष आढळला. त्यामुळे अंगणवाडी व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शासनाच्यावतीने आरोग्य विभागामार्फत जंतनाशक औषध देण्याचा सुरक्षित मार्ग आहे. या औषधाचे दुष्परिणाम कमी आहेत. आरोग्य केंद्रामध्ये या प्रकारच्या औषधोपचारांच्या दुष्परिणामांचे पुरेशे उपचार त्वरित करण्याच्या सोयी उपलब्ध आहेत. नुकत्याच केलेल्या संशोधनाद्वारे जंतनाशक औषधोपचारांमुळे शाळेतील गैरहजेरीचे प्रमाण २५ टक्क्यांनी कमी झाले आहे.जंतनाशक गोळीच्या वाटपाची नोंद शाळेतील हजेरीपटात करण्यात येणार असल्याने गैरहजर विद्यार्थ्यांनाही हे औषध दिले जाणार आहे. याकरिता आशा स्वयंसेविका, अंगणवाडी, शाळा व आरोग्य विभाग कार्यरत असल्याने करवीर तालुक्यासहित संपूर्ण जिल्ह्यात या उपक्रमाला प्रतिसाद मिळत आहे.औषधाने बालकांचा शारीरिक, बौद्धिक विकासहा आतड्याचा कृमी दोष अस्वच्छतेतून व मातीतून संसर्ग होतो. उघड्यावर शौचाला बसण्यामुळे या आजाराचे प्रमाण वाढते. जंताच्या तीव्र संसर्गामुळे अतिसार, पोटदुखी, अशक्तपणा व मंदावलेली भूक, अशी लक्षणे आढळतात. बालकांचा शारीरिक व बौद्धिक विकास खुंटतो. कुपोषण व रक्ताशय होतो व नेहमी थकवा येतो. जंतनाशकासाठी ‘एल्बेंडेझॉल’ हे औषध घेतल्याने रक्ताक्षय कमी होऊन आरोग्य सुधारते. बालकांची वाढ होऊन ती निरोगी बनतात. त्यांच्यात अन्य संसर्गाना प्रतिकार करण्याची क्षमता वाढते.जंतनाशक गोळी : एल्बेंडझॉल ४००डोस : १ ते २ वर्षे अर्धी गोळी २०० मि. ग्रॅ.२ ते १९ वर्षे : पूर्ण गोळी ४०० मि. ग्रॅ.बालक व पालकांमध्ये सामाजिक जागरूकता.शालेय व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायतीचे सहकार्यआजारी विद्यार्थ्यांना औषध नंतर देण्यात येणार, आपत्कालीन मदतीची सुविधाआशा स्वयंसेविका, अंगणवाडी, शाळा व आरोग्य विभाग करवीर१३ फेब्रुवारीपर्यंत उपक्रम सुरू, शाळाबाह्य मुला-मुलींनाही औषधे देण्यात येणार