लोटस केअर सेंटरसाठी सर्वते सहकार्य करू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:17 IST2021-07-18T04:17:55+5:302021-07-18T04:17:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क उचगाव : लोटस मेडिकल फाउंडेशन, लोटस केअर सेंटरचे एचआयव्ही संसर्गितासाठीचे समाजकार्य आदर्शवत आहे. लोटस केअर सेंटरमध्ये ...

लोटस केअर सेंटरसाठी सर्वते सहकार्य करू
लोकमत न्यूज नेटवर्क
उचगाव : लोटस मेडिकल फाउंडेशन, लोटस केअर सेंटरचे एचआयव्ही संसर्गितासाठीचे समाजकार्य आदर्शवत आहे. लोटस केअर सेंटरमध्ये कोविड लसीकरण सेंटरसाठी सहकार्य करण्याचे आश्वासन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लोटस मेडिकल फाउंडेशनच्या ए.आर.टी.व केअर सेंटरला सदिच्छा भेट देऊन येथील कार्याची माहिती घेतली. यावेळी संस्थेच्या चेअरमन उषा थोरात यांनी त्यांचे स्वागत केले. भेटीदरम्यान आरोग्य मंत्र्यांनी येथील आय.पी.डी. व ओ.पी.डी.विभागाची पाहणी केली. डॉ. किमया शहा यांनी एच.आय.व्ही.संसर्गित रुग्णांवर येथे मोफत औषधे व उपचार देण्यात येतात याची माहिती दिली. तसेच एच.आय.व्ही. संसर्गित मुलांसाठी चाईल्ड ॲडाॅप्शन या प्रकल्पाची तसेच या मुलांसाठी राबविण्यात येणाऱ्या स्पंदन या कार्यक्रमाची महिती दिली. तसेच स्थलांतरित कामगार लक्षगत हस्तक्षेप प्रकल्प आणि एच.आय.व्ही बाधित पालकांकडून मुलांना होणारा HIV प्रतिबंध या प्रकल्पांची माहिती दिली.
यावेळी कोल्हापूर जिल्हा पोलिस प्रमुख शैलेश बलकवडे, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त कादंबरी बलकवडे, संस्थेचे ट्रस्टी व्ही.बी. पाटील रमाकांत भिंगार्डे, सुनील गुंडाळे आणि कर्मचारी उपस्थित होते. आभार डॉ. निरंजन शहा यांनी मानले.
फोटो ओळ : लोटस मेडिकल फाउंडेशन, कोल्हापूर या संस्थेच्या लोटस केअर सेंटरला आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी भेट दिली. यावेळी त्याचा सत्कार संस्थेच्या चेअरमन उषा थोरात यांनी केले. शेजारी डॉ. किमया शहा, ट्रस्टी व्ही. बी. पाटील, डॉ. निरंजन शहा, सुनील गुंडाळे आदी उपस्थित होते.