‘गोकुळ’च्या वैभवात आणखी भर घालू - रवींद्र आपटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:22 IST2021-03-18T04:22:46+5:302021-03-18T04:22:46+5:30

कोल्हापूर : दूध उत्पादक, कर्मचारी, वितरण व ग्राहकांच्या स्तंभावर उभे असून सर्वांच्या प्रामाणिक कार्यावर ‘गोकुळ’च्या वैभवात आणखी भर घालू, ...

Let's add more to the glory of 'Gokul' - Ravindra Apte | ‘गोकुळ’च्या वैभवात आणखी भर घालू - रवींद्र आपटे

‘गोकुळ’च्या वैभवात आणखी भर घालू - रवींद्र आपटे

कोल्हापूर : दूध उत्पादक, कर्मचारी, वितरण व ग्राहकांच्या स्तंभावर उभे असून सर्वांच्या प्रामाणिक कार्यावर ‘गोकुळ’च्या वैभवात आणखी भर घालू, असे गौरवोद्गार संघाचे अध्यक्ष रवींद्र आपटे यांनी काढले.

‘गोकुळ’ दूध संघाच्या ५८ व्या वर्धापन दिनानिमित्त गुणवंत कामगार, ‘गोकुळ श्री’ स्पर्धा विजेते व क्रियाशील वितरकांच्या गुणगौरव समारंभात ते बोलत होते. यावेळी वर्षात संघाच्‍या विविध विभागामध्‍ये उत्कृष्ट काम केलेल्‍या गुणवंत कामगार, “गोकुळ श्री” स्‍पर्धेमधील विजेत्या दूध उत्पादकांचा सपत्‍निक व मुंबई, पुणे, कोल्‍हापूर, कोकण येथील जास्‍तीत जास्‍त दूध वितरण करणाऱ्या वितरकांचा सत्‍कार संघाचे अध्यक्ष रवींद्र आपटे यांच्याहस्‍ते करण्यात आला.

ज्येष्ठ संचालक अरुण नरके, रणजितसिंह पाटील, विश्वास पाटील, अरुण डोंगळे, विश्वास जाधव, धैर्यशील देसाई, दीपक पाटील, पी. डी. धुंदरे, उदय पाटील, आमदार राजेश पाटील, बाळासाहेब खाडे, अमरिश घाटगे, सत्यजित पाटील, विलास कांबळे, अनुराधा पाटील, बाबा देसाई, रामराजे कुपेकर आदी उपस्थित होते.

फोटो ओळी :

‘गोकुळ’च्या वर्धापन दिनानिमित्त ‘गोकुळ श्री’ स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार अध्यक्ष रवींद्र आपटे यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी अरुण डोंगळे, राजेश पाटील, विश्वास पाटील, अरुण नरके, रणजितसिंह पाटील, विश्वास जाधव, धैर्यशील देसाई आदी उपस्थित होते.

(फोटो-१७०३२०२१-कोल-गोकुळ)

Web Title: Let's add more to the glory of 'Gokul' - Ravindra Apte