संकटातून महाराष्ट्राची सुटका होऊ दे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:25 IST2021-07-30T04:25:40+5:302021-07-30T04:25:40+5:30
कोल्हापूर : शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना व महापुरातून महाराष्ट्राची सुटका करावी, असे साकडे शहर ...

संकटातून महाराष्ट्राची सुटका होऊ दे
कोल्हापूर : शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना व महापुरातून महाराष्ट्राची सुटका करावी, असे साकडे शहर शिवसेनेच्या वतीने ठिकठिकाणी दैवतांना घालण्यात आले.
राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या नियोजनाखाली शहर शिवसेना कार्यकारिणीच्या वतीने शहरातील प्रमुख मंदिरांत महाअभिषेक घालण्यात आले. शुक्रवार पेठ, उत्तरेश्वर पेठ यांच्या वतीने पूरबाधित भागांतील नागरिकांसाठी अल्पोपाहार वाटप करण्यात आला. अंबाबाई मंदिरात शहरप्रमुख जयवंत हारूगले, राजू पाटील, किशोर घाटगे, कपिल सरनाईक, योगेश चौगले, पीयूष चव्हाण, अविनाश कामते, शैलेश साळोखे, दिनेश साळोखे, किरण पाटील, यशवंत पाटील, राज अर्जुनीकर यांनी महाअभिषेक करून साकडे घातले. ज्योतिबा मंदिर, उभा मारुती मंदिर, कसबा बावडा येथील हनुमान मंदिर, राजारामपुरी आग्नेयमुखी मारुती मंदिर, वटेश्वर महादेव मंदिर, सिद्धिविनायक मंदिर, पितळी गणपती, आदी ठिकाणी अभिषेक घालण्यात आले.
फोटो ओळी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवारी कोल्हापूर शहर शिवसेनेच्या वतीने विविध मंदिरात अभिषेक घालण्यात आले. (फोटो-२९०७२०२१-कोल-राजेश)
290721\29kol_6_29072021_5.jpg
फोटो ओळी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवारी कोल्हापूर शहर शिवसेनेच्या वतीने विविध मंदिरांत अभिषेक घालण्यात आले. (फोटो-२९०७२०२१-कोल-राजेश)