कोल्हापूर : गोंधळ वाढताच जिवाच्या आकांताने बिथरलेला बिबट्या मंगळवारी ताराबाई पार्कातील महावितरण परिसरातील ड्रेनेजच्या वापरात नसलेल्या मोठ्या टाकीत घुसला. त्याला असलेल्या दोन होलपैकी एकातून त्याची शेपटी बाहेर दिसत होती. त्यानंतर वन, पोलिस, अग्निशमन विभागाच्या पथकाने त्याला पकडण्याचे नियोजन केले. दोनपैकी एका होलवर जाळी टाकण्यात आली. दुसऱ्या होलवर लाकडी रुंद फळी टाकून बंद करताच बिबट्या वायुवेगाने बाहेर झेपावला. जाळ्यात जेरबंद झाला. त्याला बेशुद्ध करून वनविभागाने पिंजऱ्यात घातले.दुपारी १२ वाजता बिबट्या नागाळा पार्कातील हॉटेलच्या परिसरात कर्मचाऱ्यावर हल्ला करताच जोरदार गोंधळ सुरू झाला. तो घायाळ होऊन हॉटेलच्या मागील बाजूस महावितरणच्या परिसरात उडी मारून लपण्यासाठी जागेचा शोध सुरू केला. चेंबरच्या एका होलमधून तो प्रवेश करून लपून बसला. त्याला पाहण्यासाठी चारही बाजूंनी प्रचंड गर्दी वाढली. जवळच्या इमारतीच्या टेरेसवर बघ्यांनी गर्दी केली. चेंबरच्या दिशेने मोबाइलचे आणि माध्यमांचे कॅमेरे रोखले होते. सुमारे दीड तासाहून अधिक वेळ तो चेंबरमध्ये बसूनच राहिला.
वाचा : जखमी वडिलांना पाहताच मुलीने मिठी मारली अन् हंबरडा फोडलागोंधळ होताच बिथरून तो हालचाल करताच त्याची शेपूट दिसत होती. चेंबरमध्येच बिबट्याने तळ ठोकल्याची खात्री झाल्यानंतर त्याला पकडण्याच्या मोहिमेला गती आली. परिसरात बांधलेल्या जाळ्या सोडून वनकर्मचाऱ्यांनी बिबट्याला पकडण्याचे नियोजन केले. चेंबरच्या होलमधून कोणत्याही क्षणी बाहेर येऊन हल्ला करण्याची भीती असल्याने कोणीही पहिल्यांदा तेथे जाण्याचे धाडस करत नव्हते.पोलिस अधीक्षक योगेशकुमार, उपअधीक्षक प्रिया पाटील, पोलिस निरीक्षक संतोष डोके यांच्यासह वन, अग्निशमन विभागाचे पथक त्याला पकडण्यासाठी जाळी कोठून लावयाची, याचे नियोजन करीत होते. दुपारी दोन वाजता अखेर वन्यजीव अभ्यासक देवेंद्र भोसले यांनी जीवाचा बाजी लावून रुंद फळी घेऊन धाव घेतली. चेंबरचे एक होल पूर्णपणे बंद केले. दुसऱ्या होलला लावलेल्या जाळीत बिबट्या अडकला. त्याच्यावर अक्षरश: पोलिस, वनकर्मचारी तुटून पडले. त्याच्या अंगावर बसून जमिनीवर थांबवून धरले. तातडीने त्याला बेशुद्ध होण्याचे इंजेक्शन दिले. बेशुद्ध होताच तो निपचीत पडला. त्याला उचलून पोलिस, कर्मचाऱ्यांनी वनविभागाच्या सापळ्यात घातले.चेंबर नसते तर..चेंबरला दोन मोठे होल होते. ते त्याला दिसले नसते तर तो नागरी वस्तीत घुसून सुरक्षित ठिकाणी लपून बसला असता. चारही बाजूंनी बंदिस्त नसलेल्या ठिकाणी गेला असता तर त्याला सुरक्षितपणे पकडणे आव्हानात्मक झाले असते. चेंबरमध्ये गेल्याने त्याला सुरक्षितपणे पकडणे सोपे झाले, असे वन प्रशासनाचेही म्हणणे आहे. वापरात नसलेले चेंबर त्रासाचे असते; परंतु या घटनेत मात्र ते उपयुक्त ठरले.
जेरबंद झाल्यानंतर स्पर्धा, ढकलाढकली...बिबट्या जाळीत जेरबंद झाल्यानंतर आणि बेशुद्ध झाल्यानंतरही त्याला जाळीसकट धरण्यासाठी, त्याच्या अंगावर जाण्यासाठी काही पोलिस, वनकर्मचारी, अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांमध्ये स्पर्धा लागली होती. यातून ढकलाढकलीही झाली. त्यावेळी पोलिस, वनविभागाच्या वरिष्ठांनी येत हस्तक्षेप केला.
कोल्हापुरात आला तिसऱ्यांदा बिबट्याकोल्हापूर शहरात अगदी नागरी वस्तीत बिबट्या येण्याची ही तिसरी वेळ आहे. यापूर्वी १ जानेवारी २०१५ रोजी रुईकर कॉलनी परिसरात बिबट्या शिरला होता. त्यावेळी त्याला पकडण्याच्या प्रयत्नात तो मृत झाला होता. डिसेंबर १९९५ मध्ये कसबा बावडा येथील जय भवानी गल्लीत बिबट्या शिरला होता. त्याच्या हल्ल्यात एका मुलीला जीव गमवावा लागला आणि त्यानंतर पोलिस परवानगीने त्या बिबट्याला ठार करण्यात आले होते. गायकवाड वाड्याजवळही एका तरुणीवर १९९० च्या सुमारास वाघाने हल्ला केला होता.येथून आला असावा बिबट्यावनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या मते, हा बिबट्या पन्हाळा किंवा जोतिबा टेकडी परिसरातून वडणगे, पंचगंगा नदी परिसरातून शिकार शोधण्यासाठी शहरी भागात आला असावा. सोमवारी उशिरा रात्री आणि मंगळवारी सकाळी नागाळा पार्कमधील न्यू पॅलेस, मेरी वेदर मैदान परिसरात बिबट्याचे दर्शन झाल्याचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहेत.
जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक घटनास्थळीकोल्हापुरात बिबट्या आल्याची बातमी आली, त्याला पकडण्यासाठी वनविभाग आणि पोलीस शर्थीचे प्रयत्न करत असल्याचे जिल्हाधिकारी अमाेल येडगे यांना समजताच ते घटनास्थळी निघाले. दुसरीकडून पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्तादेखील दाखल झाले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ देखील होते. दुपारी २ वाजता बिबट्या जेरबंद झाला, पण तो पळण्याच्या प्रयत्नात होता. त्यामुळे सगळ्यांना पांगवापांगवी झाली. पोलीस उपअधीक्षक तानाजी सावंत यांनी बिबट्या जेरबंद झाल्याची माहिती देत दोन्ही अधिकाऱ्यांना सुरक्षिततेसाठी जवळच्या घरात थांबायला सांगितले. अधिकारी पत्रकार तेथे थांबले.
{{{{facebook_video_id####https://www.facebook.com/reel/1149661940626789/}}}}
Web Summary : A leopard, after attacking a worker, hid in a drainage chamber in Kolhapur. Forest, police, and fire departments collaborated, using nets and planks to trap it. The animal was sedated and safely relocated, averting potential danger.
Web Summary : कोल्हापुर में एक तेंदुए ने एक कर्मचारी पर हमला करने के बाद एक ड्रेनेज चैंबर में छिप गया। वन, पुलिस और अग्निशमन विभागों ने जाल और तख्तों का उपयोग करके इसे फंसाने के लिए सहयोग किया। जानवर को बेहोश कर दिया गया और संभावित खतरे को टाल दिया गया।