शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 16:48 IST

गेल्या अडीच वर्षांपासून काही शेतकरी आणि ग्रामपंचायत यांच्यात पाणंद रस्त्याच्या हद्दीवरून वाद सुरू होता. या प्रकरणी ग्रामपंचायतीकडून तहसीलदार व प्रांताधिकारी राधानगरी यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती.

कसबा वाळवे : चांदेकरवाडी  (ता. राधानगरी) येथील वादग्रस्त पाणंद रस्त्यालगत शनिवारी लिंबू व काळी बाहुली आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. पाणंद रस्ता खुला करण्याच्या प्रशासनाच्या स्पष्ट आदेशानंतर अंधश्रद्धेतून हा प्रकार करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात असून, त्यामुळे गावात भीती व तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

गेल्या अडीच वर्षांपासून काही शेतकरी आणि ग्रामपंचायत यांच्यात पाणंद रस्त्याच्या हद्दीवरून वाद सुरू होता. या प्रकरणी ग्रामपंचायतीकडून तहसीलदार व प्रांताधिकारी राधानगरी यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती. प्रत्यक्ष पाहणीअंती तहसीलदार व प्रांताधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीच्या बाजूने निकाल देत वादग्रस्त पाणंद रस्ता तातडीने खुला करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार दि. २९ डिसेंबर रोजी रस्त्याचे काम सुरू होणार होते.

मात्र, काम सुरू होण्याच्या आधीच रस्त्याच्या उत्तरेकडील बाजूस असलेल्या संजय खोत यांच्या शेतबांधावरील झुडपात लिंबू व काळी बाहुली बांधलेली आढळून आली. प्रशासनाच्या निर्णयाविरोधात अंधश्रद्धेच्या माध्यमातून दबाव टाकण्याचा हा प्रयत्न असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरू आहे. या प्रकाराची प्रशासनाने गंभीर दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

या घटनेमुळे गावात गैरसमज, भीती आणि तणावाचे वातावरण पसरले असून सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न होत आहे. जयवंत खोतअध्यक्ष, तंटामुक्त समिती

English
हिंदी सारांश
Web Title : Lemon, doll on path in Chandekarwadi sparks superstition fear.

Web Summary : Superstition grips Chandekarwadi after lemon and doll found near disputed path. Villagers suspect it's related to recent land dispute ruling, causing fear and tension. Authorities urged to investigate.
टॅग्स :kolhapurकोल्हापूर