विधायक कार्यास सहकार्य हवे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:24 IST2021-01-23T04:24:13+5:302021-01-23T04:24:13+5:30
कळंबा : बेरोजगारी, वाढती लोकसंख्या, अस्ताव्यस्त वाढणाऱ्या नागरिकरणामुळे पोलीस प्रशासनास कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यात अतिरिक्त ताण सहन करावा ...

विधायक कार्यास सहकार्य हवे
कळंबा : बेरोजगारी, वाढती लोकसंख्या, अस्ताव्यस्त वाढणाऱ्या नागरिकरणामुळे पोलीस प्रशासनास कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यात अतिरिक्त ताण सहन करावा लागत आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनासाठी राबविण्यात येणाऱ्या समाजविधायक उपक्रमास नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांनी केले.
प्रभाग क्रमांक ८१, क्रांतिसिंह नाना पाटील नगर - जीवबानाना पार्क येथे माजी नगरसेविका मनीषा कुंभार यांच्या स्वखर्चातून पंधरा सिसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले असून, त्याचा शुभारंभ कोळेकर यांच्या हस्ते झाला. रिंगरोडवरील वाढत्या गुन्हेगारीवर जरब बसवण्यासाठी आपला प्रभाग सुरक्षित प्रभाग मोहिमेंतर्गत सीसीटीव्ही बसविल्याचे मनीषा कुंभार यांनी सांगितले.
फोटो २२ कळंबा सीसीटीव्ही कॅमेरे
ओळ प्रभाग ८१ जीवबानाना पार्क येथे माजी नगरसेविका मनीषा कुंभार यांच्या स्वखर्चातून उभारण्यात येणाऱ्या सिसीटीव्हीच्या शुभारंभाप्रसंगी करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर, यावेळी उपस्थित माजी नगरसेविका मनीषा कुंभार व मान्यवर.